3 उत्तरे
3 answers

तोंडाचा घाण वास येण्याची कारणे कोणती?

16
तुमच्या तोंडाचा येतो घाणेरडा वास? हि सरप्राइजिंग कारणे आहेत

अनेक अश्या एक्टीविटीज आहेत ज्या तोडाचा घाणेरडा वास येण्याचे कारण बनते, पण सर्वसाधारण लोकांना या बद्दल माहीती नसते.

बहुतेक लोक असे मानतात की तोंडाची स्वच्छता ने ठेवणे आणि चुकीचीचे फूड हैबिट्स तोंडाची दुर्गंधी येण्याचे कारण असते. हे झाले अनेक कारणांच्या पैकी एक कारण पण अजून काही कारणे आहेत जी तुम्हाला माहीत नाहीत.

◆तोंड उघडे ठेवून झोपणे
जर तुम्ही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर तोंडात कोरडेपणा येते. ज्यामुळे थुंक (लाळ) सुकायला लागते त्यामुळे तीव्र दुर्गंधी येते.

◆जेवणा नंतर च्युइंगम चघळणे
जेवण जेवल्या नंतर लगेच च्युइंगम चघळल्याने किंवा चावल्याने शुगर आणि काब्स दातांवर जमा होते. यामुळे दातांमध्ये बैक्टीरिया बनतात, जे तोंडाच्या दुर्गंधीचे कारण बनू शकतात.
http://aaosairam.blogspot.com
◆वेळेवर जेवण न जेवणे
अमेरिकन डेन्टल एसोसिएशन प्रमाणे वेळेवर जेवण जेवले नाही तर तोंडामध्ये ड्रायनेस येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तोंडाला वाईट वास येऊ शकतो.

◆चुकीच्या वेळी ब्रश केल्यामुळे
सकाळी नाश्ता करण्याच्या अगदी पहिले ब्रश केल्यामुळे अन्न दातांवर जमा होते. यामुळे दातांवर बैक्टीरिया बनतात जे तोंडाची दुर्गंधी चे कारण असते. जर तुमच्या दातांना कीड लागली असेल तर 2 रुपयामध्ये घरातच काढू शकता दातांची कीड, पहा कसे

◆चुकीच्या माउथ वॉश वापरणे
जर आपण असे माउथ वॉश युज करत आहात ज्यामध्ये अल्कोहोल चे प्रमाण आहे तर तुम्हाला ड्राय माउथ प्रोब्लेम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते.

◆जास्त दारू पिणे
रोज जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे तोंडाची लाळ सुकते. यामुळे तोंडात बैक्टीरिया बनण्यास सुरुवात होते आणि घाणेरडा वास येतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║          स्रोत:- आरोग्य मित्र
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
*घरच्या घरी बनवा 'या' पदार्थांपासून माऊथ फ्रेशनर, तोंडाची दुर्गंधी पळवण्याचा खास पर्याय!*

*हेल्थ टिप्स*

अनेकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा किंवा टूथपेस्टचा वापर करतात. काही लोक घरगुती उपायांची मदत घेतात. पण त्यानेही फायदा होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील वस्तूंपासून तयार करण्यात माऊथ वॉथ तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. यांच्या मदतीने तुम्ही प्रभावी माऊथ वॉश तयार करु शकता.

*१) ओवा आणि पुदीना माऊथ वॉश*
हे माऊथ वॉश तयार करण्यासाठी दोन चमचे ओवा, दोन चमचे पुदीना एक कप पाण्यात टाकून चांगलं मिश्रित करा. त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढा. रोज ब्रश केल्यानंतर या माऊथ वॉशने गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधीच जाईल आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल.

*२) लवंग आणि दालचीनी माऊथ वॉश*
हे अनेक दिवस स्टोर केलं जाऊ शकणारं माऊथ वॉश आहे. हे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात दालचीनीच्या तेलाचे १० ते १५ थेंब आणि लवंग तेलाचे १० ते १५ थेंब मिश्रित करा. तयार आहे तुमचं होममेड माऊथ वॉश. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधीही जाईल आणि दातांना किडही लागणार नाही.

*३) पेपरमिंट माऊथवॉश*
हे माऊथ वॉश तयार करण्यासाठी एक कप पाणी आणि बेकिंग सोडा घ्या. ८ ते ९ पुदीन्याची पाने आणि टी ट्री ऑईलचे दोन थेंब टाकून मिश्रण तयार करा. तयार आहे तुमचं पेपरमिंट माऊथ वॉश. आता हे चाळनीने गाळून घ्या. दिवसातून एकदा याचा नक्की वापर करा.
सौजन्य-चावडी
---------------------------------------
😷  *श्वासांचा दुर्गंध दूर करण्यासाठी हे करा*


⬇ *उपाय खालीलप्रमाणे*

▪ तोंडात नेहमी फ्रेश हर्ब चघळा. यामुळे तुमच्या श्‍वासाला दुर्गंधी येणार नाही.

▪ तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी ग्रीन टी अथवा ब्लॅक टी घ्या. यात तोंडाच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांना मारणारे पॉलीफेनॉल असतात.

▪ झिंक असलेल्या माऊथवॉशचा वापर करा.

▪ नेहमी दात घासताना जीभ स्वच्छ करा.

▪ भरपूर पाणी प्या. द्रवयुक्त पदार्थ घ्या.

▪ पोटाची उष्णता वाढविणारे पदार्थ कमी खा.

▪ स्नॅक म्हणून इतर काही खाण्यापेक्षा सफरचंद, गाजर, जिकामा खा.

▪ तोंडाचे आरोग्य चांगले राहील यास अधिक प्राधान्य द्या. नियमितपणे तोंडाची सफाई करा.
उत्तर लिहिले · 10/9/2018
कर्म · 569225
3
तोंडाला वास येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेवर ब्रश न करणे, जास्त मसालेदार आहार असणे, कांदा, लसूनचा जेवणात अति वापर, दारु पिणे तसेच तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ चघळणे अशा अनेक कारणांमुळे तोंडातून घाण वास येऊ शकतो. तोंडाला वास येण्याचं आणखी एक महत्वाचं कारण अपचन हे देखील असू शकतं
तोंड व दातांचे आरोग्य
नुकताच पडलेला दात
दात दुधाचे आणि कायमचे
हलणारा दात
तोंड येणे
गुटखा रोग
हिरडयांना सूज-पू येणे
कृत्रिम दात व कवळया
जबडयाचा अस्थिभंग
तोंडाला घाण वास येणे
दात व हिरडयांची तपासणी
तोंडाला घाण वास येणे
तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो.

दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या अस्वच्छतेमुळे जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते.

म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध येण्याचे हे एक कारण आहे. वारंवार चुळा भरून स्वच्छता ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय आहे.

दात व हिरडयांची तपासणी
 तपासण्यासाठी एक चमचा (जीभ दाबण्यासाठी) व प्रकाशझोत लागतो. तपासताना खालील गोष्टींचे निरीक्षण करा.

दात निरोगी दिसतात ना? (दातावर दंतकवच पूर्ण आहे ना? की टवका गेलेला आहे?)
नवीन दात येतोय का?
दातावर काळसर डाग आहे काय? (काळा दात म्हणजे कामातून गेलेला दात.)
हलणारा दात आहे काय?
कोणत्याही दातावर कीड, पोकळी निर्माण झाली आहे काय?
हिरडया निरोगी आहेत काय? (गुलाबी हिरडया निरोगी असतात, लाल असतील तर दाह आहे असे समजावे.) कधी दातावर पिवळसर किंवा काळसर रंग असतो, तो बहुधा तंबाखू-मिश्रीमुळे येतो.
हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या वर चढलेल्या आणि टोकदार दिसतात.
रोगट हिरडया दातांच्या मुळाशी घडी केल्यासारख्या दिसतात. घडीखाली जंतुदोष टिकून राहतो.
दातांवर अस्वच्छ थर व पिवळे कीटण आहे का पाहा.
दातांचे आरोग्य मोजण्यासाठी एक पध्दत म्हणजे किडलेले  आणि भरलेले  दात मोजणे. याला इंग्रजीत DMF गणना म्हणतात. विशेष करून दातांच्या सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. स्वच्छतेच्या सवयी, खाण्याच्या सवयी, पाण्यातील फ्लोराईड, अनुवंशिकता, इत्यादी घटकांवर  ठरतो.  हे कायमच्या दातांसाठी वापरायचे मोजमाप आहे.  हे दुधाच्या दातांसाठी वापरतात.

 
उत्तर लिहिले · 2/8/2021
कर्म · 121765
0
तोंडाला वास येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • तोंडाची स्वच्छता न राखणे: दात आणि जीभ नियमितपणे न घासल्यास, अन्नकण आणि बॅक्टेरिया तोंडात जमा होतात आणि वासाला कारणीभूत ठरतात.
  • तोंड कोरडे पडणे: लाळ तोंडातील बॅक्टेरिया आणि अन्नकण धुवून नेते. लाळेची कमतरता असल्यास वास येऊ शकतो.
  • दात आणि हिरड्यांचे आजार: हिरड्यांना सूज येणे (gingivitis) किंवा दात किडणे (tooth decay) यामुळे वास येऊ शकतो.
  • संक्रमण: तोंडात बुरशीजन्य (fungal) किंवा इतर प्रकारचे संक्रमण झाल्यास वास येऊ शकतो.
  • औषधे: काही औषधांमुळे तोंड कोरडे पडते किंवा इतर दुष्परिणाम होतात, ज्यामुळे वास येतो.
  • आहार: काही विशिष्ट पदार्थ, जसे की लसूण आणि कांदा खाल्ल्याने वास येऊ शकतो.
  • धुम्रपान आणि तंबाखू: या सवयींमुळे तोंडाला वास येतो आणि दातांचे आरोग्य बिघडते.
  • medical conditions: मधुमेह, किडनीचे आजार, किंवा श्वसनमार्गाचे संक्रमण (respiratory infections) यांसारख्या काही वैद्यकीय स्थितींमुळे तोंडाला वास येऊ शकतो.

उपाय:

  • दिवसातून दोन वेळा दात घासणे.
  • जीभ नियमितपणे साफ करणे.
  • खूप पाणी पिणे.
  • धुम्रपान आणि तंबाखू टाळणे.
  • नियमितपणे दंत तपासणी करणे.

जर वास येण्याची समस्या गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?