शब्दाचा अर्थ तंत्र त्राटक

त्राटक म्हणजे काय, कसे करावे?

3 उत्तरे
3 answers

त्राटक म्हणजे काय, कसे करावे?

19
एकाग्रता साधण्याची कला - त्राटक!

तुमच्यापैकी बर्‍याच जणांना माहित असेलच की मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, घरं आणि अशाच इतर बिल्डींगच्या डिझाईन बनवुन देतो, बांधकामाची देखरेख करतो, आणि कॉलेज मध्ये शिकवायला जातो.

पण साडेतीन वर्षांपुर्वी असं नव्हतं, लातुरमध्ये भयानक दुष्काळ पडला होता, नवी बांधकामंच होत नव्हती, आणि चालु बांधकामं, पाण्याअभावी ठप्प झाली होती.

पैसे कमवण्यासाठी मी तेव्हा दुकानदार झालो होतो, मी एक एजन्सी लाईन चालवायचो, त्यामध्ये फार काही काम नव्हते, सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास महत्वाचे काम असायचे, बाकी वेळ टाईपपास!...

दिवस कटायचा नाही, माझ्यासोबत शिकलेले आर्किटेक्ट मित्र कुठल्याकुठे गेले आणि मी दुकानदार झालो, हे शल्य, ही बोच मला खुप व्याकुळ करायची,

निराशा यायची, स्वतःसाठी रडु यायचे!

एकंदरीत टफ पिरेड होता तो माझ्यासाठी, दिवसच कटायचा नाही,

मग काय, कॉम्पुटरवर दिवसभर युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओज चाळत बसायचो,

आणि एका संमोहनासंबंधीच्या व्हिडीओमध्ये मी अचानक ‘त्राटक’ नावाचा शब्द ऐकला.

एक तासाचा व्हिडीओ ऐकुनही मला कळेचना, त्राटक म्हणजे काय ते?

मग त्राटक ह्या शब्दावर कित्येक दिवस माझे संशोधन सुरु झाले, आणि मग मी त्राटक करुन बघु लागलो,

वेळ भरपुर असल्याने, तेव्हा त्राटक करायला खुप गंमत यायची, दिवसा एकदोन तास त्राटक करायचं, आणि पुन्हा घरी जाऊन रात्री अजुन त्राटक करायचो,

त्राटक, ध्यान, स्वसंमोहन आणि व्हिज्वलायजेशन ह्यांच्यामुळेच मी पुन्हा राखेतुन भरारी घेतली.

हे त्राटक नावाचे गौडबंगाल नेमके काय असते?


चला, जाणुन घेऊया!

------------------------------------------------------------------------------------------
त्राटक म्हणजे काय?

- त्राटक म्हणजे काय?

एका सुक्ष्म गोष्टीकडे दिर्घवेळ टक लावुन बघणे, म्हणजे त्राटक!...

एक पांढरा कागद घ्या, त्यावर एक आठ आण्याच्या आकाराचा, काळा ठिपका काढा, बसल्यावर आपल्या नजरेच्या समोर राहील, अशा पद्धतीने हा कागद भिंतीवर चिटकवा.

खोली निवडताना, ती एकांतपुर्ण असावी, अशी निवडा. तिथे शांतता असावी, मंद सुवास असावा, मंद संगीतही चालेल.

सर्व कामे आटोपुन त्या जागी बसा, मोबाईल सायलेंट करा, लॅंडलाईन फोन असेल तर बाजुला काढुन ठेवा, तेवढ्या वेळासाठी जगापासुन डिसकनेक्ट व्हा!..

जवळ एका वाटीत पाणी आणि ओला रुमाल घेऊन बसा.

तुम्हाला अर्धा तास त्राटक करायचं असल्यास, वेळा कळावी, म्हणुन सुरुवातीला अलार्म लावु शकता.

मग टक्क डोळे उघडे ठेवुन, एकाग्रपणे त्या बिंदुकडे पहात रहा.

मनात जे विचार येतील, येवु द्या,

कधी कधी दोन-पाच मिनीटातच खुप कंटाळवाणं वाटु लागेल, चंचळ मनाच्या लोकांचं मन चुळबुळ करु लागेल.

त्राटक सोडण्याची इच्छा होईल.


दोन भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र जागृत होईल, डोकं जड पडेल, काही संवेदना निर्माण होतील.

थोड्या वेळाने डोळ्यातुन पाणी यायची सुरुवात होईल. पाण्यासोबत डोळ्यातुन अस्वच्छताही वाहुन जाईल.


दहा पंधरा मिनीटे जर तुम्ही सस्टेन करु शकलात तर मग खरी मजा सुरु होईल.
सगळे विचार शुन्य होतील, सर्व शरीर शिथील होईल. तुम्ही जागृत असला पण मन अर्धनिद्रीत अवस्थेत पोहचलेलं असेल.

मनाची अल्फा अवस्था असते ती हीच!

शरीराचा आणि मनाचा संबंध तुटतो. इंद्रिये काम करतात पण, आणि सगळ्या इंद्रियांचा ताबा सुटतो पण!

तिचे वर्णन ऐकुन समजणार नाही, ती स्थिती अनुभवावीच लागेल.

एखाद्याला त्या बिंदुकडे पाहत असताना वेगवेगळे भास होवु शकतात. हे सर्व मनाचे खेळ असतात.

त्राटक करुन उठल्यावर विचारांची, काळजीची आणि टेन्शनची शृंखला तुटते.

मन फ्रेश होते.

- त्राटकाचे प्रकार कोणकोणते?

१) बिंदु त्राटक – भिंतीवर असलेल्या ठिपक्याकडे, किंवा कर्व्ह लाईन्स असलेल्या डिझाईनच्या अंतर्भागी असलेल्या बिंदुकडे एकटक पाहणं, याला बिंदु त्राटक म्हणतात.

डिझाईनचे काही प्रकार मी सोबत दिले आहेत.

याला थर्ड आय एक्टीव्हेशन असेही म्हणतात. कागदावर स्थिर असलेली डिझाईन सतत काही मिनीटे एकाग्रतेने पाहील्यामुळे गोल गोल फिरल्याचा आभास होतो.

२) तारा त्राटक - जर तुमच्याकडे एकांत असलेली रुम नसेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन आरामखुर्ची वर झोपा. एक तारा निवडा. आता त्याच्याकडे एकटक बघत रहा.

३) ज्योती त्राटक –

यात मेणबत्तीच्या ज्योतीवर चित्त एकाग्र करतात. खुप मजा येते.

ज्योतीचे तीन भाग असतात, लाल, पिवळा आणि निळा.

प्रत्येक हवेच्या झोताबरोबर तिचे हेलकावे खाणं, बघत रहा!

कित्येक मिनीटांनंतर तर ज्योत वेगवेगळ्या प्रकाराचे आकार धारण करते. सरावाने नंतर वेळ कसा गेला हे कळत नाही.

मी वापरलेला, आणि मला सर्वात जास्त आवडलेला प्रकार आहे हा!

४) प्रतिबिंब त्राटक –

हे आरशात बघुन करायचे असते, स्वतःच्या डोळ्यात एकटक  बघत! हे मी जास्त कधी करुन बघितले नाही. मला माझ्या कडे बघितले की हसु येते. कारण मी पुन्हा कधी सांगेन.

२१ दिवस नियमित त्राटक केल्यास बदल होण्याची सुरुवात होते.

त्राटक केल्याचे फायदे –

- त्राटक केल्याने एकाग्रता वाढते. फोकस डेव्हलप होतो. उदा. वाचलेले चटकन समजते.

- मन निर्मळ होते. जुनी ओझी नष्ट होतात. आतमध्ये आनंदाचे झरे फुटतात.

- डोळे नितळ झाल्याने, चेहरा सुंदर दिसु लागतो. व्यक्तिमत्व प्रभावी बनते.

- डोळ्यात तेज निर्माण होते. जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलतो, तेव्हा आपण दिलेली आज्ञा त्याला नाकारता येत नाही.

- त्राटक करणार्‍या माणसांनी अगदी अनोळखी लोकांच्या डोळ्यात डोळे घालुन मनातल्या मनात आज्ञा दिल्यास सुद्धा ते आपलेसे होतात.

- त्राटक, ध्यान केल्याने ऑरा म्हणजे आपल्या भवतीचे वलय स्वच्छ होतात. आपोआपच आपण शुभ गोष्टींना आकर्षित करुन घेतो. अशुभ, अनिष्ठ घटना आणि माणसं आपल्यापासुन दुर दुर पळतात.

- चिडचिड, निराशा संपते.

- नवनव्या कल्पना सुचु लागतात.

- काही वर्ष त्राटक केल्यावर डोळ्यांमध्ये सुपरपावर येते, असं म्हणतात. चमत्कार घडवता येतात, असेही अनुभव आहेत.

- उदा. मोकळ्या रस्त्यावर आत्मे दिसतात, किंवा तांदळाच्या दाण्याला फक्त नजरेने पाहुन बाजुला सरकवता येते, असे म्हणतात. मला काही अनुभव नाही, आणि आजमवण्याची इच्छाही नाही. आपल्याला ही साधने फक्त मानसिक शांतीसाठी वापरायची आहेत.

ध्यान करणार्‍या लोकांना त्राटक करणे सोपे जाते.

त्राटक, ध्यान, समाधी, कुंडलिनी जागृती, शक्तिपात, स्वसंमोहन, रेकी,एनएलपी किंवा सिल्व्हामेथड ह्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.

एक्सपर्ट माणसं पुर्ण सत्य कधीही सांगत नाहीत, किंवा त्यांना सांगता येत नाही.

तुम्हाला ह्यात इंट्रेस्ट असल्यास स्वतः ह्या टेक्निकचा अभ्यास करा, वापरा, आणि वेगवेगळे अनुभव घ्या.
उत्तर लिहिले · 5/9/2020
कर्म · 6850
4
त्राटक सगळ्या प्राणायाम मधला एक खुप महत्त्वाचा प्राणायाम आहे. ह्यात आपण वस्तू, प्रतिमा किंवा चिन्ह ह्यावर एकटक पाहतो किंवा लक्ष देतो आणि श्वासांची गती नियमित ठेवतो.

त्राटकाचे किती प्रकार कोणते हे न सांगता जे मी करतो ते सांगतो.

त्राटक म्हणजे टक लावुन पाहणे. ज्या वस्तुकडे आपण पाहतोय ती एकतर शुन्यमिती(० डायमेंशनल) किंवा सकारात्मकमिती(पोसिटिव्ह डायमेंशनल) हवी.

शुन्यमिती वस्तू म्हणजे तिच्याकडे पाहिले तर आपल्या मनात जास्त विचार आले नाही पाहिजे. जसे शब्द "व्हम".. हा शब्द मनात आला की आपले मन ह्याच विल्शेषण करत नाही.. का ? कारण की व्हम म्हणजे काय हे आपल्या मनाला माहीतच नाही मग तो ॲनालिसिस कसले करेल.

तसेच सकारात्मक मितीचे पण.. मनात आलं किंवा पाहिल तर चांगले विचार यायला लागतात. जसे "फुल", "रसगुल्ला", "स्माईल".. नकारात्मक मिती "लादेन", "रक्त", "अपघात".

मिती व्यक्तीनुसार बदलत जाते हे आम्ही जाणतोच म्हणुन त्राटक करतांना आपआपली मिती शुन्य किंवा सकारात्मक असली पाहिजे बस ऐवढेच.

मी त्राटक करतांना माझी मिती एक जळता मातीचा दिवा ठेवलाय. आपण ही करु शकतात.

त्राटकमध्ये एक ठराविक अंतरावर तो दिवा ठेवायचा. आणि त्याच्या ज्योतीच्या अगदी सरळ रेषेत आपण कोणत्याही सोप्या आसनेत बसायचे. दिवा जास्त लांब नको नी जास्त जवळही नको.

आता पुर्णपणे त्या ज्योतीला एकटक पहायचे आणि हळुवारपणे आपले मन रिक्त करत जायचे. डोळे बंद न केल्यामुळे डोळे जळतील, थोडा त्रास होईल पण लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही.

सुरुवातीला ३० सेकंदात डोळे बँद करा.. १ मिनिट तसेच डोळे बंद ठेवा. परत ३० सेकंद टक लावा ज्योतीला. परत १ मिनीट डोळे बंद करा असं ४-५ मिनिटे दिवसाला करा. आणि सरावानुसार एकटक पाहण्याचा वेळ वाढवा.

ह्याने आपले लक्ष देण्याची क्षमता वाढते हो कोनसेंट्रेशन पॉवर. डोळ्यांतून पाणी आल्यामुळे ते स्वच्छ होतात. चष्म्याचा नंबर कमी होतो अथवा वाढतच नाही. मनातली चंचलता कमी होते. ऐखादे काम हाती घेतले तर कामात लक्ष लवकर लागते आणि टिकून राहते. लक्ष कशावर किती द्यायचे हे जमते म्हणजे फोकसवर कंर्टोल यायला लागतो. डोकेदुखी बंद होते. मेमरी अचानक वाढायला लागते कारण एकटक पाहिल्याने लक्ष दिव्यावरच असतं बाकी काही येत नाही मनात. ह्याचे फायदे कोणते आणि कसे हे सांगितले तर मला ह्यावार पुस्तक लिहावे लागेल.

आपण स्वस्तिक, ओम, अक्षर, आईबाबांचा फोटो, देवाची मुर्ती, देवाचा फोटो, दिवा अस कोणतीही वस्तू त्राटकासाठी वापरु शकतात. अशी वस्तू निवडा ज्याला तुम्ही एकटक पाहू शकतात.

त्राटक दिवसातून एकदाच करावे. एकटक पाहण्याचा कालावधी खुप जास्त असु नये. तो वेळ वयानुसार ठरवावा. त्राटक केव्हाही करु शकतात. पण तोच एक ठराविक वेळ असु द्यावा.

मी २ मिनीट एकटक पाहतो आणि ३ मिनीट विश्रांती. असं मी २० मिनीट करतो. बसतांना मी वज्रासनात बसतो. आपण सरळ वज्रासनात बसु नये, हळू हळू सराव करत जावे. माझी मुद्रा बदलत राहते कधी ज्ञान, कधी शंख तर कधी वायु.. आपण सुरुवात ज्ञान मुद्रेने करावी ती मस्त आहे.

शंका असेल तर कमेंटमध्ये विचारावी.

अॉल द बेस्ट :-)

उत्तर लिहिले · 4/9/2018
कर्म · 75305
0

त्राटक ही एक योगिक क्रिया आहे. डोळ्यांच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी ती फार उपयुक्त आहे.

त्राटक म्हणजे काय?

एका विशिष्ट वस्तूवर किंवा बिंदूवर एकाग्रतेने आणि स्थिरपणे पाहणे म्हणजे त्राटक.

त्राटक कसे करावे:

  1. शांत आणि एकांत ठिकाणी आरामदायक আসনে बसा.
  2. डोळे सरळ रेषेत ठेवून समोर एक वस्तू ठेवा (उदाहरणार्थ: दिवा, मेणबत्ती, बिंदू). वस्तू डोळ्यांपासून साधारणतः 2-3 फूट अंतरावर असावी.
  3. वस्तूवर दृष्टी स्थिर करा. वस्तूवर लक्ष केंद्रित करा आणि दुसरीकडे लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्या.
  4. डोळे न blinkवता (blink म्हणजे डोळे मिचमिचवणे) वस्तूवर पाहत राहा. जेव्हा डोळ्यातून पाणी यायला लागेल किंवा डोळे थकल्यासारखे वाटतील, तेव्हा डोळे बंद करा.
  5. डोळे बंद करून काही वेळ विश्रांती घ्या. डोळ्यासमोर दिसणाऱ्या वस्तूच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करा.
  6. हे चक्र 2-3 वेळा पुन्हा करा.

त्राटType text or a website address or translate a document.क करण्याचे फायदे:

  • एकाग्रता वाढते.
  • तणाव कमी होतो.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
  • स्मरणशक्ती सुधारते.

टीप:

  • सुरुवातीला 5 मिनिटे त्राटक करा आणि हळू हळू वेळ वाढवा.
  • ज्यांना डोळ्यांचे गंभीर आजार आहेत, त्यांनी तज्ञांच्या सल्ल्यानेच त्राटक करावे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

डोळे बंद की डोळे उघडे करून ध्यान कसे करावे?
त्राटक म्हणजे काय व त्याचे फायदे काय होतात?
मोहिनी प्रयोग म्हणजे काय आहे?
त्राटक कसे करावे? दिवा समोर ठेवल्यास, तो किती अंतरावर आणि कोणत्या अँगलला ठेवावा? कृपया पूर्ण माहिती द्या.
त्राटक म्हणजे काय आणि ते कसे करायचे? त्याचे फायदे काय आहेत?
गोळाफेक मध्ये गोळा लांब फेकण्यासाठी काय करावे?