Topic icon

तंत्र

0

MIS मधील सायबर सुरक्षा (Cybersecurity in MIS)

व्यवस्थापन माहिती प्रणाली (Management Information Systems - MIS) ही कोणत्याही संस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण प्रणाली आहे, जी डेटा गोळा करते, प्रक्रिया करते आणि व्यवस्थापकांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती प्रदान करते. MIS मध्ये सायबर सुरक्षा म्हणजे या प्रणालीतील डेटा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला अनधिकृत प्रवेश, वापर, प्रकटीकरण, व्यत्यय, बदल किंवा नाशापासून संरक्षण करणे.

थोडक्यात, सायबर सुरक्षा म्हणजे डिजिटल माहिती आणि प्रणालींना सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि नियंत्रणांचा संग्रह.

सायबर सुरक्षेचे प्रमुख घटक:

  • नेटवर्क सुरक्षा (Network Security): हे घटक नेटवर्कवर होणाऱ्या अनाधिकृत प्रवेशास प्रतिबंध करतात. यात फायरवॉल (Firewall), घुसखोरी शोध प्रणाली (Intrusion Detection Systems - IDS) आणि घुसखोरी प्रतिबंध प्रणाली (Intrusion Prevention Systems - IPS) यांचा समावेश असतो.
  • अ‍ॅप्लिकेशन सुरक्षा (Application Security): सॉफ्टवेअर आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्समधील असुरक्षितता शोधणे आणि दुरुस्त करणे ज्यामुळे हल्ले रोखता येतात.
  • डेटा सुरक्षा (Data Security): गोपनीय आणि संवेदनशील डेटाचे संरक्षण करणे. यात डेटा एन्क्रिप्शन (Encryption), डेटा बॅकअप (Data Backup) आणि डेटा गळती प्रतिबंध (Data Loss Prevention - DLP) यांसारख्या उपायांचा समावेश आहे.
  • एंडपॉइंट सुरक्षा (Endpoint Security): लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्टफोन आणि सर्व्हर यांसारख्या शेवटच्या उपकरणांना मालवेअर (Malware) आणि इतर सायबर धोक्यांपासून वाचवणे.
  • ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन (Identity and Access Management - IAM): योग्य व्यक्तींना योग्य वेळी योग्य संसाधनांपर्यंत पोहोचण्याची परवानगी देणे आणि अनाधिकृत वापरकर्त्यांना बाहेर ठेवणे. यात पासवर्ड धोरणे, मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) इत्यादींचा समावेश असतो.
  • वापरकर्ता शिक्षण आणि जागरूकता (User Education and Awareness): कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा धोक्यांबद्दल आणि चांगल्या सराव पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करणे, कारण अनेक सायबर हल्ले मानवी चुकांमुळे होतात.
  • आपत्कालीन प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती (Incident Response and Recovery): सायबर हल्ला झाल्यास त्याची त्वरीत ओळख करणे, प्रतिसाद देणे आणि पूर्ववत स्थितीकडे परत येण्याची योजना तयार करणे.

MIS मधील सायबर सुरक्षेचे महत्त्व:

MIS साठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे कारण:

  • माहितीचे संरक्षण (Protection of Information): MIS मध्ये संस्थेचा महत्त्वाचा आणि गोपनीय डेटा (उदा. आर्थिक डेटा, ग्राहक माहिती, कर्मचाऱ्यांचा डेटा) असतो. सायबर सुरक्षा हा डेटा चोरी, बदल किंवा नष्ट होण्यापासून वाचवते.
  • व्यवसायाची सातत्यता (Business Continuity): सायबर हल्ल्यामुळे MIS प्रणाली ठप्प होऊ शकते, ज्यामुळे व्यवसायाचे कामकाज थांबते. मजबूत सायबर सुरक्षा व्यवसाय अखंडपणे चालू ठेवण्यास मदत करते.
  • आर्थिक नुकसान टाळणे (Preventing Financial Losses): डेटा चोरी, रॅन्समवेअर हल्ले किंवा प्रणाली बंद पडल्यामुळे संस्थेला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सायबर सुरक्षा हे नुकसान टाळण्यास मदत करते.
  • प्रतिष्ठा आणि विश्वास राखणे (Maintaining Reputation and Trust): डेटा भंग झाल्यास ग्राहकांचा आणि भागीदारांचा संस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो, ज्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा खराब होते. चांगली सायबर सुरक्षा हे टाळते.
  • कायदेशीर आणि नियामक पालन (Legal and Regulatory Compliance): अनेक उद्योगांमध्ये डेटा गोपनीयतेचे आणि संरक्षणाचे नियम (उदा. GDPR, HIPAA) पाळणे बंधनकारक असते. सायबर सुरक्षा या नियमांचे पालन करण्यास मदत करते आणि दंड टाळते.
  • निर्णय घेण्याची क्षमता (Decision-Making Capability): MIS व्यवस्थापकांना अचूक आणि वेळेवर माहिती प्रदान करते. जर ही माहिती सायबर हल्ल्यामुळे बदलली किंवा अनुपलब्ध झाली, तर चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सायबर सुरक्षा माहितीची सत्यता सुनिश्चित करते.

सारांश, MIS च्या यशस्वी कार्यान्वयनासाठी आणि संस्थेच्या एकूण संरक्षणासाठी सायबर सुरक्षा एक अविभाज्य घटक आहे.

उत्तर लिहिले · 27/10/2026
कर्म · 5850
0

ध्यान करताना डोळे उघडे ठेवायचे की बंद, हे ध्यानाच्या प्रकारावर आणि तुमच्या सोयीवर अवलंबून असते. दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे आहेत.

डोळे बंद ठेवून ध्यान करण्याचे फायदे:
  • एकाग्रता वाढते: डोळे बंद केल्याने बाहेरील distractions कमी होतात आणि लक्ष एकाग्र करणे सोपे जाते.
  • शांतता: डोळे मिटल्याने मनाला शांती मिळते.
  • अंतर्मुखता: हे आपल्याला आपल्या आत डोकावण्यास मदत करते.
डोळे उघडे ठेवून ध्यान करण्याचे फायदे:
  • alertness: झोप येण्याची शक्यता कमी होते.
  • वास्तविकता: हे ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यास मदत करते.

शेवटी, तुमच्यासाठी काय चांगले काम करते हे शोधणे महत्त्वाचे आहे. प्रयोग करा आणि तुम्हाला सर्वात आरामदायक आणि प्रभावी काय वाटते ते पहा.

तुम्ही खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता:

  1. ईशा फाउंडेशन: ईशा फाउंडेशन लेख
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5850
3
तीसरा डोळा म्हणजे आज्ञा चक्राची दिव्य दृष्टी वाढवणा-या साधनांमध्ये 'त्राटक' मुख्य आहे. याला बिंदु योग असेही म्हणतात. अस्त-व्यस्त, इकडे-तिकडे भटकणा-या बाह्य आणि अन्तः दृष्टिला एखाद्या बिंदु विशेष किंवा लक्ष्य विशेषवर एकाग्र करण्याला बिंदु साधना म्हणता येऊ शकते. त्राटकचा उद्देश हाच असतो. त्राटकमध्ये बिंदु आणि दिपक सारख्या साधनांचा उपयोग केला जातो. ध्यानाच्या सुरुवातीच्या अभ्यासाच्या दृष्टिने त्राटकला आवश्यक आणि प्रमुख मानले गेले आहे. 
त्राटकच्या स्वरुपाचे वर्णन करत हठयोग प्रदीपिकामध्ये असे म्हटले आहे की -  
निरीक्षे त्रिश्चलदृश्या सूक्ष्म लक्ष्यं समाहितः
अश्रु संपात पर्यन्तं आचार्ये स्त्राटय स्मृतम्॥  
  म्हणजे, जो पर्यंत डोळ्यात अश्रु येत नाही तोपर्यंत एकाग्र होऊन निश्चल दृष्टिने सूक्ष्म लक्षाला पाहत राहा. या साधनेला त्राटक म्हणतात. 
उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 210095
19
एकाग्रता साधण्याची कला - त्राटक!

तुमच्यापैकी बर्‍याच जणांना माहित असेलच की मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे, घरं आणि अशाच इतर बिल्डींगच्या डिझाईन बनवुन देतो, बांधकामाची देखरेख करतो, आणि कॉलेज मध्ये शिकवायला जातो.

पण साडेतीन वर्षांपुर्वी असं नव्हतं, लातुरमध्ये भयानक दुष्काळ पडला होता, नवी बांधकामंच होत नव्हती, आणि चालु बांधकामं, पाण्याअभावी ठप्प झाली होती.

पैसे कमवण्यासाठी मी तेव्हा दुकानदार झालो होतो, मी एक एजन्सी लाईन चालवायचो, त्यामध्ये फार काही काम नव्हते, सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास महत्वाचे काम असायचे, बाकी वेळ टाईपपास!...

दिवस कटायचा नाही, माझ्यासोबत शिकलेले आर्किटेक्ट मित्र कुठल्याकुठे गेले आणि मी दुकानदार झालो, हे शल्य, ही बोच मला खुप व्याकुळ करायची,

निराशा यायची, स्वतःसाठी रडु यायचे!

एकंदरीत टफ पिरेड होता तो माझ्यासाठी, दिवसच कटायचा नाही,

मग काय, कॉम्पुटरवर दिवसभर युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओज चाळत बसायचो,

आणि एका संमोहनासंबंधीच्या व्हिडीओमध्ये मी अचानक ‘त्राटक’ नावाचा शब्द ऐकला.

एक तासाचा व्हिडीओ ऐकुनही मला कळेचना, त्राटक म्हणजे काय ते?

मग त्राटक ह्या शब्दावर कित्येक दिवस माझे संशोधन सुरु झाले, आणि मग मी त्राटक करुन बघु लागलो,

वेळ भरपुर असल्याने, तेव्हा त्राटक करायला खुप गंमत यायची, दिवसा एकदोन तास त्राटक करायचं, आणि पुन्हा घरी जाऊन रात्री अजुन त्राटक करायचो,

त्राटक, ध्यान, स्वसंमोहन आणि व्हिज्वलायजेशन ह्यांच्यामुळेच मी पुन्हा राखेतुन भरारी घेतली.

हे त्राटक नावाचे गौडबंगाल नेमके काय असते?


चला, जाणुन घेऊया!

------------------------------------------------------------------------------------------
त्राटक म्हणजे काय?

- त्राटक म्हणजे काय?

एका सुक्ष्म गोष्टीकडे दिर्घवेळ टक लावुन बघणे, म्हणजे त्राटक!...

एक पांढरा कागद घ्या, त्यावर एक आठ आण्याच्या आकाराचा, काळा ठिपका काढा, बसल्यावर आपल्या नजरेच्या समोर राहील, अशा पद्धतीने हा कागद भिंतीवर चिटकवा.

खोली निवडताना, ती एकांतपुर्ण असावी, अशी निवडा. तिथे शांतता असावी, मंद सुवास असावा, मंद संगीतही चालेल.

सर्व कामे आटोपुन त्या जागी बसा, मोबाईल सायलेंट करा, लॅंडलाईन फोन असेल तर बाजुला काढुन ठेवा, तेवढ्या वेळासाठी जगापासुन डिसकनेक्ट व्हा!..

जवळ एका वाटीत पाणी आणि ओला रुमाल घेऊन बसा.

तुम्हाला अर्धा तास त्राटक करायचं असल्यास, वेळा कळावी, म्हणुन सुरुवातीला अलार्म लावु शकता.

मग टक्क डोळे उघडे ठेवुन, एकाग्रपणे त्या बिंदुकडे पहात रहा.

मनात जे विचार येतील, येवु द्या,

कधी कधी दोन-पाच मिनीटातच खुप कंटाळवाणं वाटु लागेल, चंचळ मनाच्या लोकांचं मन चुळबुळ करु लागेल.

त्राटक सोडण्याची इच्छा होईल.


दोन भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र जागृत होईल, डोकं जड पडेल, काही संवेदना निर्माण होतील.

थोड्या वेळाने डोळ्यातुन पाणी यायची सुरुवात होईल. पाण्यासोबत डोळ्यातुन अस्वच्छताही वाहुन जाईल.


दहा पंधरा मिनीटे जर तुम्ही सस्टेन करु शकलात तर मग खरी मजा सुरु होईल.
सगळे विचार शुन्य होतील, सर्व शरीर शिथील होईल. तुम्ही जागृत असला पण मन अर्धनिद्रीत अवस्थेत पोहचलेलं असेल.

मनाची अल्फा अवस्था असते ती हीच!

शरीराचा आणि मनाचा संबंध तुटतो. इंद्रिये काम करतात पण, आणि सगळ्या इंद्रियांचा ताबा सुटतो पण!

तिचे वर्णन ऐकुन समजणार नाही, ती स्थिती अनुभवावीच लागेल.

एखाद्याला त्या बिंदुकडे पाहत असताना वेगवेगळे भास होवु शकतात. हे सर्व मनाचे खेळ असतात.

त्राटक करुन उठल्यावर विचारांची, काळजीची आणि टेन्शनची शृंखला तुटते.

मन फ्रेश होते.

- त्राटकाचे प्रकार कोणकोणते?

१) बिंदु त्राटक – भिंतीवर असलेल्या ठिपक्याकडे, किंवा कर्व्ह लाईन्स असलेल्या डिझाईनच्या अंतर्भागी असलेल्या बिंदुकडे एकटक पाहणं, याला बिंदु त्राटक म्हणतात.

डिझाईनचे काही प्रकार मी सोबत दिले आहेत.

याला थर्ड आय एक्टीव्हेशन असेही म्हणतात. कागदावर स्थिर असलेली डिझाईन सतत काही मिनीटे एकाग्रतेने पाहील्यामुळे गोल गोल फिरल्याचा आभास होतो.

२) तारा त्राटक - जर तुमच्याकडे एकांत असलेली रुम नसेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन आरामखुर्ची वर झोपा. एक तारा निवडा. आता त्याच्याकडे एकटक बघत रहा.

३) ज्योती त्राटक –

यात मेणबत्तीच्या ज्योतीवर चित्त एकाग्र करतात. खुप मजा येते.

ज्योतीचे तीन भाग असतात, लाल, पिवळा आणि निळा.

प्रत्येक हवेच्या झोताबरोबर तिचे हेलकावे खाणं, बघत रहा!

कित्येक मिनीटांनंतर तर ज्योत वेगवेगळ्या प्रकाराचे आकार धारण करते. सरावाने नंतर वेळ कसा गेला हे कळत नाही.

मी वापरलेला, आणि मला सर्वात जास्त आवडलेला प्रकार आहे हा!

४) प्रतिबिंब त्राटक –

हे आरशात बघुन करायचे असते, स्वतःच्या डोळ्यात एकटक  बघत! हे मी जास्त कधी करुन बघितले नाही. मला माझ्या कडे बघितले की हसु येते. कारण मी पुन्हा कधी सांगेन.

२१ दिवस नियमित त्राटक केल्यास बदल होण्याची सुरुवात होते.

त्राटक केल्याचे फायदे –

- त्राटक केल्याने एकाग्रता वाढते. फोकस डेव्हलप होतो. उदा. वाचलेले चटकन समजते.

- मन निर्मळ होते. जुनी ओझी नष्ट होतात. आतमध्ये आनंदाचे झरे फुटतात.

- डोळे नितळ झाल्याने, चेहरा सुंदर दिसु लागतो. व्यक्तिमत्व प्रभावी बनते.

- डोळ्यात तेज निर्माण होते. जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलतो, तेव्हा आपण दिलेली आज्ञा त्याला नाकारता येत नाही.

- त्राटक करणार्‍या माणसांनी अगदी अनोळखी लोकांच्या डोळ्यात डोळे घालुन मनातल्या मनात आज्ञा दिल्यास सुद्धा ते आपलेसे होतात.

- त्राटक, ध्यान केल्याने ऑरा म्हणजे आपल्या भवतीचे वलय स्वच्छ होतात. आपोआपच आपण शुभ गोष्टींना आकर्षित करुन घेतो. अशुभ, अनिष्ठ घटना आणि माणसं आपल्यापासुन दुर दुर पळतात.

- चिडचिड, निराशा संपते.

- नवनव्या कल्पना सुचु लागतात.

- काही वर्ष त्राटक केल्यावर डोळ्यांमध्ये सुपरपावर येते, असं म्हणतात. चमत्कार घडवता येतात, असेही अनुभव आहेत.

- उदा. मोकळ्या रस्त्यावर आत्मे दिसतात, किंवा तांदळाच्या दाण्याला फक्त नजरेने पाहुन बाजुला सरकवता येते, असे म्हणतात. मला काही अनुभव नाही, आणि आजमवण्याची इच्छाही नाही. आपल्याला ही साधने फक्त मानसिक शांतीसाठी वापरायची आहेत.

ध्यान करणार्‍या लोकांना त्राटक करणे सोपे जाते.

त्राटक, ध्यान, समाधी, कुंडलिनी जागृती, शक्तिपात, स्वसंमोहन, रेकी,एनएलपी किंवा सिल्व्हामेथड ह्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.

एक्सपर्ट माणसं पुर्ण सत्य कधीही सांगत नाहीत, किंवा त्यांना सांगता येत नाही.

तुम्हाला ह्यात इंट्रेस्ट असल्यास स्वतः ह्या टेक्निकचा अभ्यास करा, वापरा, आणि वेगवेगळे अनुभव घ्या.
उत्तर लिहिले · 5/9/2020
कर्म · 6850
5
मोहिनी प्रयोग म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोहित करणे, आपल्या विषयी त्याच्या मनात आकर्षण निर्माण करणे..
मोहिनी विद्येच्या प्रयोगामुळे आपण आपली न होणारी कामे करुन घेऊ शकतो.....
उत्तर लिहिले · 22/12/2017
कर्म · 665
4
त्राटक करने का तरीका
सबसे पहले किसी कंबल या दरी को जीमन पर बिछा लें। और उस पर सुखासन या पद्मासन लगाकर बैठ जाएं।
अब आप अपनी गर्दनए कमर व पीठ और मेरूदण्ड को सीधा रखें।
अपनी सांसो को सामान्य रखें।
और आप शांत होकर बैठें।
इसके बाद आप किसी कागच पर एक निशान बनाएं। जैसे कि कोई चक्र या मूर्ति अथवा गोला आदि।

अब इस कागज को अपनी आखों की उंचाई के बराबर और सामने लगभग दो मीटर के फासले में किसी दीवार पर लटका दें।
अब आप इसे दीवार पर लगे हुए चित्र पर बने हुए आकृति को एक टक लगाकर देखते रहें।
आपकी पलके झपकनी नहीं चाहिए। अपना ध्यान बस उस चित्र पर बनी हुई आकृति पर ही होना चाहिए।
तब तक आप इस चित्र को देखते रहें जब तक आपकी आंखों में जलन ना होने लगे।
बाद में अपनी आंखों को बंद कर दें और फिर उस चित्र की आकृति की कल्पना करें।

इसके अलावा आप त्राटक करने के लिए मोमबत्ती या दीपक की लौ पर भी कर सकते हो।
सबसे पहले आप किसी दीपक या फिर मोमबत्ती को जलाकर इसे किसी टेबल या स्टूल पर रख दें।
यह टेबल आपके आंखों के बराबर या समांतर उंची हो। और यह मोमबत्ती या दीपक की लौ हिले ना। यानि कि इसे किसी शांत कमरे में ही करें।
दीपक या मोमबत्ती को अपनी आंखो से दो फुट की दूरी पर रखें।
और अब इसे बिना पलके झपकाए हुए देखते रहें। यानि की आपकी आंखे लौ पर एकटक लगी हुई हो।
जब तक आंखों से पानी ना आ जाए तब तक इस जलती हुई लौ को देखते रहें।
बाद में धीरे-धीरे अपने अभ्यास को बढ़ाएं। अब अपनी आंखों को बंद कर लें और उस जलती हुई लौ की कल्पना अपनी बंद आंखो में करते रहें।



उत्तर लिहिले · 6/4/2017
कर्म · 35575
5
त्राटक म्हणजे एखाद्या बिंदूवर किंवा दिव्यावरील ज्योतीवर आपलं लक्ष केंद्रित करणे. मांडी मारून बसायचं आणि दिवा लावून त्याच्या ज्योतीकडे एकटक पाहायचं. रोज ५ मिनिटे ह्यामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते आणि फार फायदे होतात. मन एकाग्र असले की उत्तम कार्य करू शकते.
उत्तर लिहिले · 6/4/2017
कर्म · 35575