3 उत्तरे
3
answers
सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल माहिती मिळेल का?
3
Answer link
सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे.[२]
सिंधुताई सपकाळ जन्म१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्वभारतीयटोपणनावेचिंधीनागरिकत्वभारतीय पेशासामाजिक कार्यकर्त्यापुरस्कार२५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(२०१२)[१]
सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला . घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.
जीवनातील संघर्षसंपादन करा
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार मग सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.
परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.
धन्यवाद 👍

1
Answer link
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर, इ. स. 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव 'चिंधी' ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरचे गुरे राखायला म्हणून सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूलच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले.
0
Answer link
सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल माहिती:
सिंधुताई सपकाळ, ज्यांना 'अनाथांची माय' म्हणून ओळखले जाते, एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या, समाजसेविका आणि अनाथाश्रमा चालवणाऱ्या होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी समर्पित केले.
जन्म: १४ नोव्हेंबर, १९४८, वर्धा, महाराष्ट्र
मृत्यू: ४ जानेवारी २०२२, पुणे
सिंधुताई सपकाळ यांचे कार्य:
- सिंधुताईंनी अनेक अनाथ मुलांचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण दिले आणि त्यांच्या जीवनाला दिशा दिली.
- त्यांनी अनेक अनाथाश्रम उघडले, जिथे मुलांची काळजी घेतली जाते.
- त्यांच्या कार्यामुळे अनेक बेघर आणि अनाथ मुलांना आधार मिळाला.
- सिंधुताईंनी केलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.
पुरस्कार आणि सन्मान:
- महाराष्ट्र शासनाकडून 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार'
- २०१० मध्ये 'मदर तेरेसा पुरस्कार'
- २०१२ मध्ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार'
- २०१६ मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार (PIB)
सिंधुताई सपकाळ यांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले होते, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपल्या कामातून समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.