7 उत्तरे
7
answers
मला आत्महत्या करायची आहे, सोपा मार्ग सांगावा ?
14
Answer link
जन्मदात्या आईला विचार, तिने लहानाचा मोठा केला, त्यांच्या तुझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या राहिल्या बाजूला, आणि हा निघालाय आत्महत्या करायला, अडचणीतून रस्ता शोधून पुढे जायचं तर ते राहील बाजूला, तू कोण का असेना, कुणालाही फरक पडत नाही, तू जगला काय आणि मेला काय, पण तुझे सख्खे आई बाप भाऊ बहीण यांना नक्कीच फरक पडेल.
14
Answer link
आत्महत्या करणं हे सर्वात मोठा कायर पणा आहे जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्याला दुःख नाही , सर्वानाच दुःख तुम्ही स्वतः पेक्षा चंगली परिस्थिती असणाऱ्या लोकांना पाहून दुःखी नका होऊ, तुम्ही हे बघा की तुमच्या पेक्षाही किती वाईट परिस्थिती आहे हे बघा मग तुम्हाला जीवनाचं महत्व कळेल तुम्ही हे बघा की तुम्हाला आई वडिलांनी कशाप्रकारे मोठं केलं तुम्ही तुमच्या आई वडील याची मनापासून सेवा करा मग तुम्हला कोणतं गोष्ट छळत आहे ते सांगा तुमचे मन हलके होईल जीवन हे फार मोलाचे असते त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे घडवलं ते तुमच्याच हाती आहे ,जीवनाच्या प्रत्येक क्षणाची आनंद घ्या जे व्यक्ती देशाच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र ड्युटी करत आहे ,वर्षांतून फक्त 2 महिना सुट्टी असते तरी ते 2 महिण्यात पूर्ण वर्ष चे दुःख विसरतात त्यांना किती त्रासदायक जीवन असेल ह्याची कल्पना करा धन्यवाद
12
Answer link
एक फार सुदंर आणी प्रेरनादायी वाचन्यात आलेली कविता आत्महत्या करन्याआधी एकदा वाचाच
घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂
कष्टकर्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧
🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
फक्त हिमतीने लढ👊
मला माहित नाही तुम्ही एवढं टोकाच पाऊल का उचलताय पन एक सांगतो यानी तुमचे problems संपतील पन तुमच्यावर जे अवलंबुन आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात , तुमचे आई वडील यांचा विचार करा . समस्या कोनाच्या आयुष्यात नसतात त्यांच्याशी हार मानुन आत्महत्या करने ही पळवाट आहे
तुम्हाला काही लोकांची थोडी नावे सांगतो जमलं तर त्यांच्याबद्दल वाचाच
१) निक व्हजिकिक: एक माणूस ज्याला हातपाय नाही तो स्काय डाईविंग करतो उत्तम पोहतो आणी प्रेरनादायी वक्ता आहे.
२) नंदो पॅराडो: विमान अपघातानंतर एन्डिसमध्ये 72 दिवस टिकुन राहीले आणि बचावले.
३) जेसिका कॉक्स: हात नसतानाही वैमानिक बनली सिद्ध झाले की आपल्याला उडता येण्यासाठी 'पंख' ची आवश्यकता नाही.
४) रॅन्डी पॉश, संगणक शास्त्रज्ञांचे एक अमेरिकन प्रोफेसर, त्यांना कळले की त्याला स्वादुपिंड कॅन्सर आहे - एक टर्मिनल आजार - सप्टेंबर 2006 मध्ये. त्याला तीन महिने जीवन मिळाले, परंतु ते 3 वर्षे जगले आणि सुमारे लाखो लोकांना प्रेरणा दिली जग त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यासाठी.
५) पॅट्रिक हेन्री ह्युजेस: अंध जन्मला आणि पूर्णपणे हात आणि पाय सरळ करण्याची क्षमता नाही, त्याला चालणे शक्य नाही. याव्यतिरिक्त, स्कोलियोसिसच्या दुरुस्त्यासाठी पॅट्रिक स्पाइनशी दोन स्टीलची रॉड शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी परिस्थिती असूनही, पॅट्रिक यांनी एक संगीतकार आणि विद्यार्थी बनुन दाखवले
जर हे लोकं त्यांच आयुष्य खडतर असतानाही इतके सकारात्मक राहु शकतात तर मग आपन का नाही सकारात्मक राहु शकत बघा विचार करा