संस्कृती परंपरा

कंबरेला करगुटा का बांधतात?

करगोटा म्हणजेच करदोरा बांधावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.  महाराष्ट्रात कमरेला करदोरा बांधण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला करदोरा देते. करगोटा हा काळ्या रंगाचा असतो. हा का बांधतात याचे ठोस कारण सांगता नाही येणार. पण माझ्या तर्कानुसार याची २-३ करणे असू शकतात. पुरुष करगोटा बांधतात. शरीरावर काळ्या रंगाचे काही असेल तर त्याकडे पाहणार्यांची पहिली नजर जाते आणि नजर लागत नाही असा एक प्रचलित समज आहे. म्हणूनच पुरुषाला नजर लागू नये म्हणून करगोटा बांधत असतील. पहिलवानाचे शरीर पिळदार आणि आकर्षक असते म्हणून नजर लागू नये म्हणून हि प्रथा पडली असावी. 

तसेच लहान बाळ गोंडस असते म्हणून नजर लागू नये म्हणून करदोरा बांधत असतील. 

तसेच पूर्वी राजे महाराजे कमरपट्टा दागिना वापरायचे. हे हि करदोरा वापरसाम्गचे एक कारण असू शकते.

दुसरी गमतीशीर बाजू म्हणजे सैल पॅन्ट असेल तर बेल्ट नसेल तर करगोट्याचा बेल्ट सारखा वापरही खेड्यात केला जातो. तसेच खेड्यात विहिरीत पोहायला शिकवताना लहान मुलाला करगोट्याला धरून पोहायला शिकवतात. थोडक्यात करदोरा का बांधावा हे नक्की सांगू शकत नाही पण त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. 
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

कंबरेला करगुटा का बांधतात?

Related Questions

पंढरपूरला जाताना वारकरी पांढरे कपडे का घालतात?
वारकरी नेहमी पांढऱ्या रंगाचा पोशाख का घालतात?
महिलांसाठी उखाणे कोणते?
उंबरठा म्हणजे काय?
कुलाचार म्हणजे काय?
होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र काय आहे?
आंब्याचे पान शुभ कार्यात का वापरले जाते?