रक्त गट रक्तपेढी आरोग्य

माझ्या पत्नीला रक्ताची गरज आहे, तर मला रक्त कुठे मिळेल? मी 2 वेळा रक्तदान केले आहे.

4 उत्तरे
4 answers

माझ्या पत्नीला रक्ताची गरज आहे, तर मला रक्त कुठे मिळेल? मी 2 वेळा रक्तदान केले आहे.

8
*रक्तदान* :

एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते.

तसेच थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यता त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.

स्वस्थ व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते.

*रक्तदान कोण करु शकतो* –

◦ ज्यांचे वय 18 ते 65 वर्षा पर्यंत आहे अशा व्यक्ती रक्तदान करु शकतात,

◦ वजन 48 किलो पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती,

◦ ज्यांनी मागील तीन महिन्यापासून रक्तदान केले नाही अशा व्यक्ती,

◦ क्षयरोग (TB), फिरंग, हिपाटायटिस, मलेरिया, मधुमेह आणि एड्स ह्या विकारांनी पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करु शकतात.

तर गर्भावस्था आणि स्तनपानकाळ सुरु असणाऱ्या स्त्रियांमधील रक्तदान घेतले जात नाही. प्रसुतीनंतर सहा महिन्यानंतर स्त्रिया रक्तदान करु शकतात.

*किती रक्त घेतले जाते*–

दररोज आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी 350 ml रक्त घेतले जाते. तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पुर्ति करत असते.

*कोठे कराल रक्तदान*–

रक्तदान कोणत्याही लाईसेन्स युक्त ब्लड बँकेमध्ये करता येते. याशिवाय सरकारी रुग्णालयांमध्येही रक्तदानाची सुविधा उपलब्द असते. याशिवाय मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था जसे रोटरी क्लब, लायंस क्लब इ. द्वारा वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.

*रक्त दिल्यानंतर केले जाणारे परिक्षण*–

रक्त घेतल्यानंतर ब्लड बँकेमध्ये देण्यापुर्वी रक्ताच्या प्रत्येक युनिटचे परिक्षण करुन ते मलेरिया, सिफलिस, हिपेटाइटिस आणि एड्स (HIV) पासून संक्रमित नसल्याची खात्री केली जाते.

कारण सुरक्षीत रक्तचं रुग्णास मिळाले पाहिजे ह्यासाठी हे परिक्षण केले जाते.

ब्लड बँक रेफ्रिजरेटर मध्ये रक्त 4 ते 5 आठवड्यापर्यंत रक्त सुरक्षीत ठेवले जाते.

*रक्तदानावेळी कोणता त्रास होतो का*–

नाही, रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही.

◦ रक्तदान करण्यासाठी 5 ते 10 मिनिटांपर्यंत वेळ लागतो.

◦ रक्तदान केल्यानंतर आपण आपली दररोजची कार्ये अगदी दररोज प्रमाणेच करु शकता.

◦ रक्तदाताच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम रक्तदानाने होत नाही.

*रक्तदाता कार्ड*–

स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तिंना रक्तदान केल्यानंतर लगेच रक्तदाता प्रमाणपत्र दिले जाते.

यामुळे रक्तदान केल्यानंतर 12 महिन्यापर्यंत रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास ब्लड बँकेतर्फे एक युनिट रक्त दिले जाते.

*मग चला आपण रक्तदान करुया आणि अनेकांना जीवनदान देऊया*.

धन निरंकार जी एवं प्रणाम!👏
उत्तर लिहिले · 25/8/2018
कर्म · 3835
3
तुम्हाला जास्तच रक्ताची गरज असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट no. आणि गाव किंवा शहर  Share करा.

कदाचित या ग्रुप वरच कोणीतरी ब्लड डोनोर आपल्याला भेटू शकेल.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 5415
0
तुमच्या पत्नीला रक्ताची गरज आहे हे ऐकून मला वाईट वाटले. तुम्ही रक्तदान केले आहे हे जाणून आनंद झाला, रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही.
तुम्ही खालील ठिकाणी रक्त मिळवण्याचा प्रयत्न करू शकता:
  • ब्लड बँक: शासकीय आणि खाजगी ब्लड बँकांमध्ये रक्त उपलब्ध असते. तुमच्या शहरातील ब्लड बँकेची यादी आणि संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही गूगल (Google) सर्च करू शकता.
  • रुग्णालय: काही मोठ्या रुग्णालयांमध्ये ब्लड बँक असते, जिथे तुम्ही रक्त मिळवू शकता.
  • एनजीओ (NGO): अनेक अशासकीय संस्था (NGO) रक्तदानाचे कॅम्प आयोजित करतात आणि रक्त उपलब्ध करून देतात.
  • सोशल मीडिया: सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही रक्तदानासाठी आवाहन करू शकता. अनेक लोक सोशल मीडियावर मदतीसाठी तयार असतात.
रक्तदान करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
  • रक्तदान करण्यापूर्वी तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्या.
  • तुम्ही निरोगी असावे.
  • तुम्ही काही विशिष्ट औषधे घेत असाल, तर डॉक्टरांना सांगा.

टीप: रक्त मिळवण्यासाठी तुम्हाला ब्लड बँकेत किंवा रुग्णालयात काही कागदपत्रे आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन (prescription) सादर करावे लागू शकते.

तुम्ही खालील वेबसाईट आणि हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता:

तुमच्या पत्नीला लवकर रक्त मिळो, यासाठी मी प्रार्थना करतो.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

माणसांना हॉस्पिटलमध्ये जे रक्त लागते ते कुठल्या जातीचे असते? तिथे जातीभेद का होत नाही?
रक्तदान करताना रक्तगट माहिती असणे गरजेचे आहे का?
ब्लड बँक सुरू करण्यासाठी कोणकोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात, अंदाजे किती रक्कम लागते, मनुष्यबळ किती लागते, व कशा प्रकारची इमारत हवी असते?
ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची मागणी करणारे पत्र?
सध्या भंडारा येथे AB+ ब्लड ग्रुपची अत्यंत गरज आहे, कृपया लवकरात लवकर कळवावे.
रक्तपेढ्या त्यांचे कार्य कसे पार पाडतात?
पुण्यात ब्लड बँक कोठे आहे?