फळ

फळाचा राजा कोण?

2 उत्तरे
2 answers

फळाचा राजा कोण?

3
आंबा हा फळांचा राजा आहे


‎आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.


उत्तर लिहिले · 13/10/2020
कर्म · 6750
0

आंब्याला फळांचा राजा म्हणतात.

आंबा चवीला खूप गोड असतो आणि तो उन्हाळ्यामध्ये येतो.

आंब्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

भारतामध्ये आंब्याच्या अनेक प्रकारच्या जाती आढळतात.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 960

Related Questions

या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील?
आजोबांच्या नावावर विहीर आहे, सामाजिक क्षेत्रफळांमध्ये वाटून घेण्यासाठी काय करावे लागेल?
काही फळांमध्ये एकच बी तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात, असे का?
वनस्पतीच्या बिया म्हणजे धान्य, कडधान्य, फळांतील बिया यांमध्ये वनस्पतीचा जीव असतो, मग धान्य, कडधान्य हे शाकाहारी अन्न कसे काय?
कोणती फळं व कोणत्या भाज्या वात वाढवतात?
कोणती फळे खाल्ली असता कफ होण्याचा त्रास होऊ शकतो? (मला कफ होण्याचा त्रास आहे).
फळे खाणे चांगले की फळांचा ज्यूस पिणे चांगले? रोज किंवा एक दिवसाआड ज्यूस पिणे योग्य आहे का? कोणत्या फळांचा ज्यूस नियमित/एक दिवसाआड प्यावा? खोकला व कफ याचा त्रास असल्यास कोणत्या फळाचा ज्यूस घेऊ नये?