3 उत्तरे
3 answers

मूळव्याधावर उपचार काय आहेत?

6
मूळव्याधीचा त्रास हा वेदनादायी आणि इम्बॅरेसिंग असल्याने त्याबद्दल खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. खाण्या-पिण्याच्या हानीकारक सवयींमुळे मूळव्याधीचा त्रास अचानक जाणवतो आणि अल्पावधीतच त्रासदायक होऊन जातो. शौचाच्या वेळेस तीव्र वेदना होण्यासोबतचरक्त पडण्याची समस्या वेळीच उपचार न केल्यास अधिक गंंभीर होऊ शकते. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा त्रास सुरवातीच्या टप्प्यांत असल्यास या घरगुती उपयांंनी त्याचा त्रास कमी करा. 

1.  टॉयलेटमध्ये टाईमपास करू नका: 

विनाकारण टॉयलेटमध्ये जाऊन पेपर वाचत शौच  येण्याची वाट पाहत बसू नका. जेव्हा खरंच ती इच्छा होईल तेव्हा टॉयलेटमध्ये जा. 

2. हायड्रोथेरपी :

gastrointestinal आणि hepatobiliary सर्जन  डॉ. अश्विनी मल्ल्या यांच्या सल्ल्यानुसार, वेदनादायी मूळव्याधीच्या त्रासावर  sitz bath हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.  sitz bath  या प्रकारामध्ये गुदद्वाराजवळील भाग एका टबमध्ये गरम पाणी आणि पोटॅशियम परामॅगनेटच्या गोळ्यांच्या मिश्रणाने स्वच्छ केले जाते. गरम पाणी आणि मीठ दाह कमी करण्यास, त्या भागाजवळील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करतात. तुमच्या घरी बाथ टब नसेल तर टॉयलेटसीटच्या आकारामध्ये sitz bath tub सहज उपलब्ध आहे. त्याचा वापर तुम्ही घरच्या घरी करू शकता.

3. आईस पॅक : 

सूज आणि दाह कमी करण्यासाठी बर्फाचा वापर सहज करता येऊ शकतो. तुमच्याकडे आईस पॅक नसल्यास बर्फाचे काही तुकडे फोडून ते प्लॅस्टिकमध्ये गुंडाळा. त्यावर एखादे कापड गुंंडाळा. पाठीवर झोपून किमान 10 मिनिटांसाठी गुद्द्वाराला बर्फाच्या पॅकने शेक द्यावा.

4. फायबरयुक्त पदार्थ अधिक खावेत : 

मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहाराची निवड करावी. त्यासाठी फायबरयुक्त आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ अधिक खावेत. फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. ओट्स,बार्ली, डाळी, पालेभाज्या तसेच संत्रासारखी सायट्र्स फळं यांचा आहारात समावेश करावा.

5. फायबर सप्लिमेंट्सची मदत घ्या :

तुमच्या आहारात फायाबरयुक्त पदार्थांचा समावेश होत नसल्यास फायबर्स सप्लिमेंट घ्यावेत. त्यामुळे 50% समस्या सुधारण्यास मदत होते असा क्लिनिकल रिसर्च आहे. त्यामुळे खाज येणे, वेदना कमी होण्यास मदत होते.

6. फ्लॅवॉनॉईड्सयुक्त पदार्थ खावेत : 

ब्लॅकबेरीज, ब्ल्यूबेरीज, चेरी यासारखी सायट्रस फळं रक्तवाहिन्यांना मजबूत करते तसेच गुद्द्वाराला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. एका मेटा अ‍ॅनॅलिसिसनुसार मूळव्याधींंच्या लक्षणांमध्ये फ्लॅवॉनॉईड्सच्या सेवनामुळे 58% सुधारणा झाली. वेदना कमी होण्यासोबतच रक्त पडण्याची समस्यादेखील कमी झाली.

7. पेट्रोलियम जेली लावा :

मूळव्याधीचा त्रास असणार्‍यांंमध्ये अनेकजण शौचासाठी विशिष्ठ ताण लावतात. यामुळे वेदना वाढतात. तो त्रास कमी करण्यासाठी पेट्रोलियम जेलीसारखे ल्युब्रिकंट फायदेशीर ठरते. गुद्द्वाराच्या ठिकाणी थोडी पेट्रोलियम जेली लावावी.

8. भरपूर पाणी प्या: 

फायबर्सच्या सोबत पचन सुधारण्यासाठी तसेच मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात पिणे गरजेचे आहे. अपुर्‍या पाण्यामुळे शौचाला कडक होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी, डिहायाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी तसेच शौचाला साफ होण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणे फायदेशीर ठरते.

9. पाचक औषधांचा नेहमी वापर करणे टाळा: 

पचक औषधांचा वापर बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शौचाला नरम होते. मात्र नियमित त्याचा वापर केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक बिघडू शकतो. त्याऐवजी केळं, अंजीर, सुकामेवा किंवा बेदाणे खावेत. ते नैसर्गिकरित्या पाचक असतात.  

10. गरोदरपणात काळजी घ्या :

गरोदरपणामध्ये मूळव्याधीचा त्रास होत असल्यास नैसर्गिक उपायांची निवड करण्यापूर्वी काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रेचक औषधं आणि क्रीमची निवड करा. नियमित पोषक आहार घ्या. तिखटाचे पदार्थ टाळा. फार काळ एकाच ठिकाणी बसू किंवा उभे राहू नका.

उत्तर लिहिले · 28/7/2018
कर्म · 5420
2
मूळव्याध

मूळव्याध हा गुदमार्गात होणाऱ्या व्याधींपैकी एक महत्त्वाचा व्याधी आहे. सामान्यत: गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. यांना वैद्यकीय भाषेत Hemorrhoidal Veins म्हणतात. या घड्याळ्याच्या काट्यानुसार ३,७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. चुकीचा आहार व विहार घेतल्याने या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते व त्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स म्हटलं जातं. मूळव्याध झाला आहे की नाही हे अनेकदा रुग्णाला समजण्यास वेळ लागतो. मूळव्याध झाल्याची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. ती दिसल्यास तात्काळ उपचार करावा.

*मूलव्याधाची कारणे --*

बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.

*मूळव्याधाची कारणे काय आहेत*

१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे २. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे 
३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते 
4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. 
५. चुकिची आहार पध्दति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन 
६. बराच काळ एका जागी बसून राहणे. 
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
 ८. अनुवंशिकता
 ९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

*मूलव्याधाची लक्षणे --*

💠शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना

💠शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे

💠गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.

💠गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.

💠पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.

💠अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.

💠भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.

💠रुग्णाचे वजन कमी होते.

💠मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

 @ShareChat_Abhi_Gi 🇮🇳

#मूळव्याध: 
समज, गैरसमज, लक्षणे आणि उपचार

*#लक्षणे* –
* शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
* शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
* शौचाच्या ठिकाणी खाज येणे
* शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे

*कारणे* –
* मलाबष्टंभ अथवा बद्धकोष्ठता (Constipation)
* अती तिखट, अती तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे
* मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन
* सततचे बैठे काम
* अती जागरण
* जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा
* कोरडे आणि शिळे अन्न खाणे
* अनुवांशिक

*#मुळव्याधीचे_प्रकार_आणि_अवस्था*-
सामान्यत: ज्याप्रमाणे गुदमार्गाच्या आत रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे गुदमार्गाच्या बाह्यभागी सुद्धा छोट्या रक्तवाहिन्या असतात. बाह्य भागातील रक्तवाहिन्यांनाही सूज येऊ शकते. यामध्ये दोन प्रकार असतात. Internal Haemorrhoids आणि External Haemorrhoids.

तसंच काही वेळा रुग्णांमध्ये फक्त शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होतो व काही वेळा फक्त वेदना आणि आग असते. या लक्षणांवरुन दोन प्रकार पडतात. Bleeding Haemorrhoids आणि Non Bleeding Haemorrhoids.
मूळव्याध झाल्यानंतर रुग्णामध्ये त्याच्या विविध अवस्था बघायला मिळतात. अवस्थेनुसार त्याचे खालील चार प्रकार पडतात.

– प्रथम अवस्था
ही सुरुवातीची अवस्था असते यामध्ये रक्तवाहिन्यांना थोडी सूज येत. हे लक्षण अनेक रुग्णांना समजून येत नाही.

– द्वितीय अवस्था
यामध्ये सूज वाढत जाते. बऱ्याच वेळा शौचाला गेल्यानंतर कुंथावे लागते. कुंथल्याने शौचास होते किंवा वेदना होतात. बऱ्याचदा गुदमार्गाच्या ठिकाणी खाज येण्यास सुरुवात होते.

– तृतीय अवस्था
वरील दोन्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढलेला मांसाचा भाग हा शौचाच्या वेळी बाहेर हाताला जाणवू लागतो. रक्तस्त्राव वाढतो अथवा वेदना व आग याचे प्रमाण वाढते. वाढलेला मांसत भाग हा शौचानंतर आपोआप आत जातो अथवा ढकलावा लागतो.

– चतुर्थ अवस्था
यामध्ये वाढलेला संपूर्ण मांसत भाग हा गुदरमार्गाच्या ठिकाणी बाहेर येतो व कष्टाने आतमध्ये ढकलावा लागतो. यामध्ये असह्य वेदना होतात. गुदमार्गाचा भाग पूर्ण बंद झाल्यासारखे वाटू लागते. बसणे आणि उठणे कठीण होऊ लागते.

अनेकदा रुग्ण हा तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत डॉक्टरांचा शोध घेताना दिसतो. रुग्णाला स्वत: पाहता येऊ न शकणाऱ्या या आजाराविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे या आजाराचे योग्य निदान व योग्य उपचार होण्यात अडथळे निर्माण होता.

गैरसमज –
* प्रत्येकाला मूळव्याध असतोच
* हा आजार कधीच बरा होत नाही
* ऑपरेशन नंतर खूप असह्य वेदना व रक्तस्त्राव होतो
* ऑपरेशन नंतर शौचावरील नियंत्रण जाते

आयुर्वैदानुसार योग्य आहार, औषधी चिकित्सा आणि उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो.

*मूळव्याध व त्यावरील उपचार*-

*आहार_व_विहार* –
आयुर्वैदामध्ये उपचार करताना पथ्य आणि अपथ्य याचा खोलवर विचार केला जातो. त्यामुळे आहाराच उष्णता वाढवणारे सर्व पदार्थ वर्ज्य करणे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घेणे यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाते.
विहारांमध्ये सतत बैठे काम न करणे, रात्री जागरण न करणे, नियमित व वेळेवर आहार घेणे महत्त्वाचे आहे.

*औषधी_चिकित्सा –*
प्रथम व द्वितीय अवस्थेत आयुर्वैदिक औषधांनी उपचार केल्याने चांगला आराम मिळतो.

क्षारसूत्रबंधन –
तृतीय व चतुर्थ अवस्थेत विशिष्ट भुलेखाली क्षारसूत्रबंधन ही पद्धती वापरली जाते. काही वेळा बाह्य भागातील मुळव्याधीसाठी सुद्धा ही चिकित्सा उपयोगी पडते.

क्षारसुत्र_चिकित्सेचे_फायदे –
– रक्तस्त्राव होत नाही
– कुठलीही कापाकापी नाही
– ऑपरेशननंतर रुग्णालयात राहण्याची गरज नाही
– शौचावरील नियंत्रण जाण्याची शक्यता नाही
– कमी खर्च
अधिक माहितीसाठी आपण आमचा व्हीडिओ पाहू शकता

मूळव्याध- @ShareChat_Abhi_Gi 🇮🇳

*मूलव्याधावरती घरगुती उपचार --*

🔰हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.

🔰सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.

🔰रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.

🔰ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)

🔰रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)

🔰इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.

🔰कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.

🔰झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.

🔰आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.

🔰एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात. 

🔰महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .

🔰कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा. 

🔰नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो . 

🔰रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.

*शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-*

✳️देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो .

✳️रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . ) 

✳️गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा . 

✳️वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.

*
उत्तर लिहिले · 31/8/2021
कर्म · 121765
0

मूळव्याधावर (Piles/Hemorrhoids) उपचार अनेक प्रकारे केले जातात, जे मूळव्याधाची तीव्रता आणि प्रकार यावर अवलंबून असतात. खाली काही सामान्य उपचार पद्धती दिल्या आहेत:

1. जीवनशैलीतील बदल:

  • आहार: आहारात फायबरयुक्त (Fiber-rich) पदार्थांचा समावेश करा. फळे, भाज्या, आणि धान्ये भरपूर खा. यामुळे शौचास पातळ होते आणि मूळव्याधाचा त्रास कमी होतो.
  • पाणी: भरपूर पाणी प्या. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
  • शौचास जास्त वेळ बसू नका: टॉयलेटवर जास्त वेळ बसल्याने गुदद्वाराच्या नसांवर दाब येतो.
  • व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

2. औषधोपचार:

  • क्रीम आणि मलम: गुदद्वाराच्या ठिकाणी लावण्यासाठी अनेक प्रकारची क्रीम आणि मलम बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे खाज आणि वेदना कमी होतात.
  • वेദനशामक औषधे: जास्त वेदना होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घेता येतात.

3. शस्त्रक्रिया (Surgery):

जर मूळव्याध गंभीर असेल आणि औषधोपचाराने बरा होत नसेल, तर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.

  • बँडिंग (Banding): या प्रक्रियेत, मूळव्याधावर रबर बँड बांधला जातो, ज्यामुळे रक्तपुरवठा थांबतो आणि मूळव्याध सुकून गळून पडतो.
  • स्क्लेरोथेरपी (Sclerotherapy): मूळव्याधामध्ये इंजेक्शन देऊन ते आकुंचन पावण्यास मदत करतात.
  • हेमरॉइडेक्टॉमी (Hemorrhoidectomy): या शस्त्रक्रियेत मूळव्याध पूर्णपणे काढून टाकला जातो.

डॉक्टरांचा सल्ला: मूळव्याधाच्या उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते तुमच्या स्थितीनुसार योग्य उपचार निवडण्यास मदत करू शकतात.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5060

Related Questions

आरोग्य संप्रेषण टिपा लिहा?
आरोग्य आणि लोकसंख्या कार्यक्रमांमध्ये माध्यमांचा प्रभाव स्पष्ट करा.
"swaduras che prakar?
कोणते विकार होतात?
तंबाखू सेवनामुळे अवयवांची कार्ये बिघडतात का?
दारूच्या बॉटल मधला सील फोडल्यानंतर पाच दिवसांच्या बंद कर?
ड्युटी संदर्भात मला मानसिक हुशार आहे त्रास होतो डेपो मॅनेजर लोकेशन मध्ये?