राजकारण शब्दाचा अर्थ कायदे

महाभियोग म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

महाभियोग म्हणजे काय?

7
_________________________

📚 *नॉलेज बँक* ✒

*महाभियोग*
*कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर (भारतात - राष्ट्रपती, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश,  इतर देशात- राष्ट्राध्यक्ष आदी) असणाऱ्या व्यक्तीवर ठेवलेल्या आरोपाच्या सुनावणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेस  ‘महाभियोग’ म्हणतात. भारतात हा खटला आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत चालतो. सभागृहाची किमान निम्मी उपस्थिती आणि किमान दोन तृतीयांश बहुमताने महाभियोगात ठेवलेला आरोप सिद्ध झाला असे मानले जाते. महाभियोग प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यावर लोकसभेतील १०० आणि राज्यसभेतील ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. त्यानंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहात तो प्रथम सादर करता येतो. ज्या सभागृहात हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे त्या सभागृहाचे सभापती अथवा अध्यक्षांकडे तो द्यावा लागतो.  प्रस्ताव स्वीकारला गेल्यास आरोपांची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यांची समिती स्थापन केली जाते. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदेतज्ज्ञाचा समावेश असतो.  जर समितीला वाटले की, आरोपांमध्ये तथ्य आहे तर ती संसदेत याबाबतचा अहवाल सादर करते. या अहवालाला जर दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली तर महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला असे समजले जाते.  त्यानंतर राष्ट्रपती सरन्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचे आदेश देतात.*
लाईव्ह मराठी
_________________________
उत्तर लिहिले · 5/10/2018
कर्म · 569245
3
मुख्य मेनू उघडा
 शोधा
संपादन कराया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.
इतर भाषांत वाचा
महाभियोग
कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर (भारतात-राष्ट्रपती, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, इतर देशात-राष्ट्राध्यक्ष आदी) असणाऱ्या व्यक्तीवर ठेवलेल्या आरोपाच्या सुनवणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेस महाभियोग म्हणतात. भारतात हा खटला आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत चालतो. यापूर्वी व्ही.रामस्वामी नावाच्या सरन्यायाधीशांवर असा अभियोग चालला होता. सभागृहाची निदान निम्मी उपस्थिती आणि किमान दोन तृतीयांश बहुमताने महाभियोगात ठेवलेला आरोप सिद्ध झाला असे मानले जाते. ऐतिहासिक काळात तत्कालीन हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्यायावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असा महाभियोग झाला होता.

सध्या(इ.स.२०११) मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्यावर असा सार्वजनिक पैशाच्या गैरवापरासाच्या आरोपावरून महाअभियोग दाखल करण्यात आला आहे. व्ही. रामस्वामींवरील महाअभियोग काँग्रेस सभासदांच्या लोकसभेमधील अनुपस्थितीमुळे बारगळला होता.


उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 80
0

महाभियोग म्हणजे एखाद्या उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्याला, विशेषत: राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी चालवली जाणारी एक प्रक्रिया आहे.

महाभियोगाची प्रक्रिया:

  • महाभियोग ही एक राजकीय प्रक्रिया आहे जी कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत चालते.
  • सामान्यतः, विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात (भारतात लोकसभा) महाभियोगाचा प्रस्ताव मांडला जातो.
  • प्रस्ताव सादर झाल्यावर, त्यावर चर्चा होते आणि मतदान घेतले जाते.
  • जर प्रस्तावाला आवश्यक बहुमत मिळाले, तर तो वरिष्ठ सभागृहात (भारतात राज्यसभा) पाठवला जातो.
  • वरिष्ठ सभागृहात या प्रकरणाची चौकशी केली जाते आणि पुरावे तपासले जातात.
  • त्यानंतर, वरिष्ठ सभागृहात पुन्हा मतदान होते. जर दोन-तृतीयांश (2/3) सदस्यांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले, तर संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर केले जाते.

महाभियोगाची कारणे:

  • घटनेचे उल्लंघन
  • देशद्रोह
  • भ्रष्टाचार
  • इतर गंभीर गुन्हे

उदाहरण: अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन वेळा महाभियोग चालवण्यात आला होता, पण ते दोन्ही वेळेस दोषी ठरले नाहीत.

महाभियोग ही एक गंभीर प्रक्रिया आहे, जी लोकशाही संस्थांचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2200

Related Questions

भारतीय संसदीय विधिमंडळाचे महत्त्व स्पष्ट करा?
विधिमंडळ - न्यायमंडळ तणावाची कारणे सांगा?
कायदे मंडळाची कार्ये स्पष्ट करा?
मुलाचे नाव बदलायचे आहे?
भारतीय कलावंतांना 'इकारागीर' हा कामगार ठरवण्याची कारणमीमांसा काय आहे?
भारतातील पर्यावरण संरक्षणाचे कोणतेही दोन कायदे स्पष्ट करा?
कोणत्या कायद्यामुळे भारतात पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली?