3 उत्तरे
3 answers

गनिमि कावा म्हणजे काय ?

8
गनिमी कावा म्हणजे युक्ती.यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देता येईल.पुष्कळ वेळा शिवाजी महाराजांच्या सैन्यापेक्षा शत्रूचे सैन्य कित्येक पटीने अधिक असायचे.आणि अशा प्रचंड सैन्याशी समोरासमोर लढाई करायची म्हणजे आपल्या सैन्याला म्रुत्युच्या खाईत जाणूनबुजून ढकलल्यासारखे होईल ही जाणीव महाराजाना होती.स्वत:च्या प्राणापेक्षा आपल्या सैन्यिचे प्राण मोलाचे असत.म्हणून अशावेळी शत्रुशी समोरासमोर न लढता गनिमी काव्याने म्हणजज युक्तीने लढत.म्हणजे शत्रूला दिसले जाऊ नये अशा रितीने लपूनछपून, शत्रूची दिशाभूल करून, शत्रूला बेसावध ठेवून शत्रूवर हल्ला करीत असत.अशा गनिमी काव्याने शत्रू नामोहरम होथ असे.शिवाजी महाराजानी जिंकलेल्या लढाईपैकी पुष्कळशा लढाया गनिमी काव्याने जिंकल्या आहेत.गनिमी काव्यातुन त्यांनी दाखवून दिले की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.असते.
उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 91085
3
गनिमी कावा ही एक युद्धनिती आहे.

       गनीमी कावा अथवा इंग्रजीत गोरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.

      शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.
शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला.

      मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो. म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दप्रयोगात मराठ्यांची अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करताना मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही.

     मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! '

   प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तिने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच शिवरायांचे उद्दिष्ट होते.
उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 1220
0

गनिमी कावा म्हणजे शत्रूला अनपेक्षित वेळेत आणि ठिकाणी हल्ला करून गोंधळात पाडणे. यात अचानक हल्ले करणे, शत्रूवर वेगवेगळ्या दिशांनी तुटून पडणे, आणि कमी साधनसामग्रीतही शत्रूला हरवणे अशा यु strategies्तींचा समावेश असतो.

गनिमी काव्याची वैशिष्ट्ये:

  • हलके सैन्य: गनिमी काव्यात सैन्याची संख्या कमी असली तरी ते चपळ आणि वेगवान असते.
  • दुर्गम भागांचा वापर: डोंगर, जंगल, दऱ्या यांसारख्या भागांचा वापर करून शत्रूंना गोंधळात पाडले जाते.
  • स्थानिक लोकांची मदत: स्थानिक लोकांकडून शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे आणि त्यांच्या मदतीने हल्ला करणे.
  • अनपेक्षित हल्ले: शत्रूंना तयारी करायला वेळ न देता अचानक हल्ला करणे.

शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून आपल्या सैन्याला कमी साधनसामग्रीतही मोठे यश मिळवून दिले. त्यांनी मुघलांसारख्या मोठ्या साम्राज्याला हरवण्यासाठी याच युक्तीचा वापर केला.

गनिमी काव्याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1820

Related Questions

कौटिल्याचे युद्धविषयक तत्वज्ञान कसे स्पष्ट कराल?
शत्रूनीती काय असायला हवी?
शिवरायांच्या युद्धनिती चे नाव?
शिवरायांच्या युद्धनीतीचे नाव काय?
गनिमीकावा शब्दाचा अर्थ काय?
दुर्योधनाने नारायण सेनेऐवजी श्रीकृष्णाला आपला सारथी म्हणून निवडले असते, तर त्याचा परिणाम वेगळा झाला असता का?
जर चीनच्या आर्मीशी आपल्याला लढायची वेळ आली, तर आपण कसे लढाल?