2 उत्तरे
2
answers
गनिमीकावा शब्दाचा अर्थ काय?
5
Answer link
गनिमी कावा ही एक युद्धनीती आहे.
गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.
शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला.

0
Answer link
गनिमी कावा म्हणजे शत्रूंना Haravnyasathi वापरली जाणारी एक युद्धनीती.
गनिमी काव्यामध्ये शत्रूंवर अचानक हल्ला करून त्यांना गोंधळात पाडले जाते. शत्रू सावध होण्याआधीच त्यांच्यावर हल्ला चढवला जातो आणि त्यांना प्रतिकार करायची संधी मिळत नाही.
गनिमी कावा ही युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आणि त्यामुळे ते अनेक युद्धे जिंकू शकले.
गनिमी काव्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- शत्रूंवर अचानक हल्ला करणे.
- शत्रूंना Haravnyasathi वेगवेगळ्या युक्त्या वापरणे.
- शत्रूंना प्रतिकार करायची संधी न देणे.