व्यवसाय मार्गदर्शन शिक्षण भरती पोलीस करिअर मार्गदर्शन

मी दहावीला आहे, मला पोलीस भरतीत जायचे आहे. मी दहावीनंतर काय करावे लागेल?

4 उत्तरे
4 answers

मी दहावीला आहे, मला पोलीस भरतीत जायचे आहे. मी दहावीनंतर काय करावे लागेल?

8
भावा पोलिस भरती साठी 12 वी कर.
पोलीस भरती साठी वय 18 वर्ष पाहिजे.
तु running, pull ups, याची तयारी कर कारण पोरं यातच बाहेर निघत्यात.
पोलीस भरतीत 200 marks ची test असते,म्हणजे 100 marks ची physical आणि 100 marks चा लेखी पेपर.
Physical test ला प्रथम 1600मिटर running असते ते तुम्हाला 5मि.20से. मध्ये पूर्ण कराव लागत.
Running मध्ये बसला तरच पुढ जातात.
मग pull ups,गोळा फेक,लांब उडी याची टेस्ट होते.
ह्या सगळ्याला marks असतात.
मग लेखी परीक्षा असते 100 मार्क्स ची.
50 प्रश्न असतात.1 प्रश्न 2 marks साठी असतो.
मग physical आणि लेखी चे marks मिळून मेरिट लागते त्यावर पुढंच अवलंबून असत.
पुढं medical पण असते.
मी म्हणतोय भावा तू Army साठी बघ.
Army मध्ये बर आहे पोलीस पेक्षा.
धन्यवाद.
जय महाराष्ट्र.
उत्तर लिहिले · 15/7/2018
कर्म · 22320
8
तुम्ही दहावीला आहात आणि एवढ्या लवकर तुम्ही पोलीस भरतीविषयी विचारताय त्याबद्दल तुमचं कौत्तुक आहे.
तुम्ही दहावी नंतर बारावी करावी आणि नंतर पोलीस भरती साठी पूर्णपणे प्रयत्न करावे म्हणजे तुमचे तोपर्यंत पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी वयाची ,शिक्षणाची अट पूर्ण होईल . आणि हो तुम्ही अत्ता पासूनच फिझिकल ची प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला जमेल तशी.
🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 12/7/2018
कर्म · 2530
0

तुम्ही दहावीत असल्यामुळे पोलीस भरतीसाठी तयारी सुरू करू शकता. दहावीनंतर पोलीस भरतीसाठी काय करावे लागेल याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

शैक्षणिक पात्रता:
  • तुम्ही 12वी पास असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
  • पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेमी पेक्षा जास्त असावी.
  • महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेमी पेक्षा जास्त असावी.
  • छाती: पुरुष उमेदवारांसाठी छाती न फुगवता 79 सेमी आणि फुगवल्यानंतर 5 सेमी जास्त असावी.
शारीरिक चाचणी (Physical Test):
  • गोळा फेक
  • लांब उडी
  • धावणे (100 मीटर आणि 1600 मीटर)
लेखी परीक्षा:
  • सामान्य ज्ञान
  • गणित
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
भरती प्रक्रिया:
  1. अर्ज भरणे: भरती निघाल्यावर अर्ज भरा.
  2. शारीरिक चाचणी: शारीरिक चाचणी पास करणे आवश्यक आहे.
  3. लेखी परीक्षा: लेखी परीक्षा पास करणे आवश्यक आहे.
  4. Document Verification: सर्व कागदपत्रे तपासावी लागतात.
आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • 10वी आणि 12वी मार्कशीट
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Domicile Certificate
  • Non-Creamy Layer Certificate (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
इतर माहिती:
  • पोलीस भरतीची जाहिरात वेळोवेळी www.mahapolice.gov.in या वेबसाइटवर येते. त्यामुळे या वेबसाइटला भेट देत राहा. www.mahapolice.gov.in
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1780

Related Questions

12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
करिअर/ नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ कोणती?
मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, काही कारणांमुळे माझ्या अभ्यासात बराचसा गॅप पडला, त्यामुळे मी अभ्यासाला सुरुवात कुठून करावी मला काही कळत नाहीये?
शिक्षक या क्षेत्रात कोणासारखे तुम्हाला बनावेसे वाटते ते सांगा?
८ तास ड्युटी केल्यानंतर काय काम करावे?
बी.ए. नंतर काय? नोकरीच्या संधी काय आहेत?
MBA जर साधारण कॉलेजमधून केले जिथे मोठमोठे पॅकेज नसतात व कोअर स्पेशलायझेशन (HR, फायनान्स) ला कॉलेज प्लेसमेंट लवकर मिळत नाही आणि सेल्सला जास्त जॉब असतात, तिथून करियर कसे चांगले घडवावे?