2 उत्तरे
2
answers
परभणीची राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती द्या?
7
Answer link
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता.
"परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत."
परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे ही एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे. ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
◆जिल्ह्यातील तालुके◆
गंगाखेड
जिंतूर
सेलू
परभणी
पाथरी
पालम
पूर्णा
मानवत(मानवत तालुकयाचे प्राचीन नाव मणिपूर हे होते)
.सोनपेठ
★★★★★★★★★■★★★★★★★★★
परभणी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यामधील४ व जालना जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

0
Answer link
परभणी जिल्ह्याची माहिती
राजकीय माहिती:
परभणी जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात आहे. हा जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. जिल्ह्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ आहेत.
विधानसभा मतदारसंघ: परभणी जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत: परभणी, गंगाखेड, पाथरी, आणि जिंतूर.
लोकसभा मतदारसंघ: परभणी लोकसभा मतदारसंघ असून ह्या मतदारसंघातून संसदेत खासदार निवडले जातात.
ऐतिहासिक माहिती:
परभणी जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. हा जिल्हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता.
- प्राचीन इतिहास: परभणी हे पूर्वी प्रभावती नावाने ओळखले जात होते. सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या राजघराण्यांनी या भागावर राज्य केले.
- मध्ययुगीन इतिहास: मध्ययुगीन काळात हा भाग देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर हा भाग दिल्ली सल्तनत आणि बहमनी सल्तनतच्या ताब्यात गेला.
- निजाम राजवट: 1724 मध्ये परभणी निजामांच्या राजवटीत आले आणि 1948 पर्यंत निजामाच्या राजवटीतच राहिले.
- स्वातंत्र्य आणि त्यानंतर: 1948 मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर परभणी भारत सरकारमध्ये विलीन झाले.
भौगोलिक माहिती:
परभणी जिल्हा मराठवाड्यात असून तो अनेक वैशिष्ट्येपूर्ण भौगोलिक गुणधर्म दर्शवितो.
- स्थान आणि विस्तार: परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात असून तो 19°6′ उत्तर अक्षांश ते 76°46′ पूर्व रेखांशावर स्थित आहे.
- नद्या: गोदावरी नदी जिल्ह्याची प्रमुख नदी आहे, जी जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे.
- हवामान: परभणीमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान असते. उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते, तर हिवाळ्यात तापमान मध्यम असते.
- कृषी: ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस आणि तेलबिया हे येथील प्रमुख कृषी उत्पादने आहेत.