2 उत्तरे
2 answers

एनईएफटी म्हणजे काय?

6
एन.ई.एफ.टी. तथा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वित्तीय प्रदान
 (National Electronic Funds Transfer)
हे भारतातील बँकेची सुविधा आहे. याद्वारे भारतातील बँक ग्राहक कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवी शकतात.

■वैशिष्ट्ये■

१) दहा लाख रुपयांपर्यंतच्या रकमा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये प्रदान करण्यासाठी ही सुविधा वापरता येते.

२) सोमवार ते शनिवार सकाळी आठ पासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रदान सूचना देता येतात.

३) कामाच्या वेळेत ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दर तासाला ही प्रणाली तासाभरात घडलेल्या आदान प्रदान व्यवहारांची माहिती घेते, प्रत्येक बँकेला एकूण देय रक्कम किंवा येणे रक्कम किती याचा निव्वळ आकडा काढून त्याप्रमाणे हिशोब ठेवते. एका बँकेचे काही खातेदार इतर बँकातील लोकांना पैसे देऊ शकतात. तसेच इतर बँकातील काही खातेदार या बँकेमधील लोकांना पैसे पाठवू शकतात. थोडक्यात काही पैसे देणे आणि काही घेणे असा एकूण व्यवहार होत असतो. तासाभारातील व्यवहारानंतर प्रत्येक बँकेने पैसे द्यायचे कि घ्यायचे याचा निव्वळ आकडा काढून रिझर्व्ह बँकद्वारेदेवाणघेवाणीचा हिशोब केला जातो.

४) तुम्ही दुसऱ्याला पाठवलेले पैसे साधारणतः एक ते दीड तासात खात्यामध्ये जमा होतात.

५) रक्कम केवळ खाते क्रमांक पाहून जमा होत असल्याने काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा भलत्याच व्यक्तीला पैसे जमा होऊ शकतात.

६) तासाभरात घडलेल्या व्यवहारांची एकच तुकडी (बॅच) करून निव्वळ हिशोब मांडला जातो.

■प्रदान व्यवहाराबरोबर द्यायचा तपशील

१) पाठवण्याची रक्कम

२) लाभकर्त्याचा खाते क्रमांक

३) लाभकर्त्याचा आय एफ एस सी कोड

४) लाभकर्त्याचे नाव

५) पैसे पाठवणाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक किंवा विपत्र पत्ता.

उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 123540
0

NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (National Electronic Funds Transfer). ही भारतातील एक इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर प्रणाली आहे. याद्वारे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवता येतात.

NEFT चे फायदे:

  • पैसे जलद आणि सुरक्षितपणे पाठवता येतात.
  • transaction करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.
  • हे transaction तुम्ही घरबसल्या करू शकता.

NEFT कसे काम करते:

  • NEFT द्वारे पैसे पाठवण्यासाठी, तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांच्या बँकेचे नाव, खाते क्रमांक (Account Number) आणि IFSC कोड (IFSC Code) आवश्यक असतो.
  • NEFT transaction batch मध्ये process केल्या जातात.

NEFT charges:

NEFT charges बँकेनुसार बदलू शकतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5280

Related Questions

एटीएमचे ट्रान्झॅक्शन चालू असताना लाईट गेली, मोबाईलवर पैसे कट झाल्याचा मेसेज आला, पण पैसे मशीनमधून मिळाले नाहीत. काय करावे?
चेक म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
बँक ऑफ महाराष्ट्र सामान्य कर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात पाईपलाईन विहीर दुरुस्ती साठी?
इस्लामपूर, वाळवा नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
इस्लामपूर नगरपालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
नाशिक महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?
मुंबई महापालिकेचे खाते कोणत्या बँकेत आहे?