3 उत्तरे
3
answers
सावित्रीबाई फुले यांचा विवाह केव्हा झाला?
12
Answer link
सावित्रीबाई जोतीराव फुले
(जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी १८३१- १० मार्च, १८९७)
या मराठीशिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशीसावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांनापुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

2
Answer link
सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.
0
Answer link
सावित्रीबाई फुले यांचा विवाह इ.स. १८४० मध्ये वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.