3 उत्तरे
3
answers
योगा बद्दल माहिती द्या?
25
Answer link
*२१ जुन आंतरराष्ट्रीय योगा दिवस*
➡ *जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे*
■ 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2015 पासून सुरू केली होती. योगात प्राणायामाचे फार महत्त्व आहे, याला योगाचे आठ अंगांमधून चवथा अंग असा देखील म्हटले जाते.
■ हे फारच सोपे आणि फायदेशीर योगासन आहे. ज्याला कुठल्याही वयात, लिंग आणि वर्गाचा व्यक्ती आरामात करू शकतो.
■ प्राणायाम करताना किंवा श्वास घेताना आम्ही तीन क्रिया करतो - पूरक, कुम्भक, रेचक. अर्थात श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. तर तुम्हाला प्राणायामाचे फायदे आणि प्रकार सांगत आहोत ...
🔰 *योगात प्राणायामाचे बरेच प्रकार आहे, पण काही प्रमुख प्रकार या प्रकारे आहे*
■ नाडी शोधन प्राणायाम
■ उज्जयी प्राणायाम
■ कपालभाती प्राणायाम
■ भास्त्रिका प्राणायाम
■ शीतली प्राणायाम
■ डिग्र प्राणायाम
■ बाह्या प्राणायाम
■ भ्रामरी प्राणायाम
■ उद्गित प्राणायाम
■ अनुलोम- विलोम प्राणायाम
■ अग्निसर क्रिया
🔰 *प्राणायामाचे फायदे*
◆ प्राणायाम फारच फायदेशीर योगासन आहे, जो संपूर्ण शरीराला स्वस्थ बनवतो...
◆ प्राणायाम फुफ्फुसाला स्वस्थ आणि मजबूत बनवतो, ज्याने त्याची क्षमता वाढते.
प्राणायाम रक्तचाप सामान्य करतो आणि हृदय संबंधी आजारांना दूर करण्यास मदत करतो.
◆ प्राणायाम पचन क्रियेला दुरुस्त करतो.
◆ प्राणायाम ऑक्सिजनच्या प्रचुरतेद्वारे रक्ताला घट्ट करतो आणि मस्तिष्कच्या क्रियांना उत्तम बनवतो.
◆ प्राणायाम तणाव कमी करण्याचा सर्वात उत्तम साधन आहे.
◆ प्राणायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
*योग शिकवितो 5 गोष्टी*
■ शरीराचा सन्मान करा
■ येणारे विचार सोडून द्या
■ श्वास घ्या व सोडा
■ वर्तमानात जगा
■ तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त मिळवू शकता
*योगाचे फायदे*
■ आरोग्य सुधारते,
■ स्मरणशक्तीत वाढ होते,
■ एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो,
■ ऊर्जेचा स्तर वाढतो
-----------
_🤸🏻♀ *योगाचे प्रकार*_
_🤸🏻♀अष्टांग योगामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. मात्र काही योग प्रकारांचा आरोग्य, साधना किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठीही केला जाऊ शकतो. योगाचे सहा प्रकार मानले जातात._
(1) राजयोग (2) हठयोग (3) लययोग (4) ज्ञानयोग (5) कर्मयोग व (6) भक्तियोग. ज्या क्रमाने त्यांना योगशास्त्रात लिहिण्यात आले आहे, त्या क्रमाने त्यांना दर्जा व महत्व प्राप्त झाले आहे.
(1) राजयोग- यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी, हे पतंजली राजयोगाचे आठ अंग आहेत. त्यांना अष्टांग योग ही म्हटले जाते.
(2) हठयोग - षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी, हे हठयोगाचे सात अंग आहेत. मात्र हठयोगीचा जोर आसन किंवा कुंडलिनी जागृतीसाठी आसन, बंध, मुद्रा व प्राणायमावर अधिक असतो. यालाच क्रियायोग म्हटले जाते.
(3) लययोग - यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत.
(4) ज्ञानयोग - अशुध्द आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग आहे. याला ध्यानयोग असे ही म्हटले जाते.
(5) कर्मयोग - कर्म करणेच कर्मयोग आहे. कर्माने आल्यात कौशल्य आत्मसात करणे, हा त्यामागील खरा उद्देश आहे. याला सहजयोगही म्हटले जाते.
(6) भक्तियोग - भक्ति, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सौख्य व आत्मनिवेदन असे नऊ गुण असणार्या व्यक्तीला भक्त म्हटले जाते. व्यक्ती त्याची आवड, प्रकृत्ती व साधना यांच्या योग्यतानुसार त्याची निवड करू शकतो. भक्ती योगानुसार सौख्य, समन्वय, आपुलकी असे गुण निर्माण होतात.
🤸🏻♀योगाची संक्षिप्त रूपे आपण पाहिलीत. या व्यतिरिक्त ध्यानयोग, कुंडलिनी योग, साधना योग, क्रिया योग, सहज योग, मुद्रायोग, मंत्रयोग व तंत्रयोग आदी अनेक प्रकार आहेत. मात्र वरील सहा प्रकार मुख्य असून योगाचे अनेक प्रकार त्यात समाविष्ठ आहेत.
योगाबद्दल माहिती द्या

13
Answer link
*_आंतरराष्ट्रीय 🤸🏻♂ योग दिन : योग 🚫पळवतो रोग..._*
_संयुक्त राष्ट्र महासभेत मंजुर झालेल्या ठरावानुसार ✍🏻 *२१ जून* हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. भारताच्यावतीने पंतप्रधान मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव महासभेत मांडला होता._
_योगाचा प्रसार हल्ली देशातच नव्हे तर 🌎 जगभरात होतो आहे. योगाचा आरोग्यासाठी 💁🏻♀ योग्य उपयोग कसा करून घेता येईल, हे तज्ज्ञांच्या मदतीनं जाणून घेणं महत्त्वाचं आहे :_
▪ *_आसनं कधी करावीत :_*
योगासनं सकाळी, 🌅 संध्याकाळी 🌟 कधीही करता येतात. मात्र, भरपेट जेवण घेतल्यानंतर तीन-चार तास, अल्पोपहरानंतर एक तास, चहा व ताकासारख्या पेयानंतर अर्धा तास व पाणी प्यायल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरानं आसनं करणं 💯 अधिक चांगलं असतं.
▪ *_योग कोण करू शकतो :_*
तीन वर्षांहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती योग करू ✅ शकते. लहान 👶🏻 मुलांकडं आपण बारकाईनं पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की खेळता-खेळता ती सहज अनेक प्रकारची आसनं करत असतात. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांनी सहजसोपी 🤷🏻♂ आसनं व प्राणायाम करायला हवा. हृदयरोगी व्यक्तींनी योगासनं सुरू करण्याआधी 👩🏻⚕ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
▪ *_कुठे आणि कसा करावा :_*
👉🏻 मोकळ्या हवेत योगासनं करणं अधिक ✅ चांगलं. ते शक्य नसेल तर अन्य कुठंही योग करता येईल. मात्र, त्यावेळी वातावरणात शांतता 💤 असावी. मनाला शांती देणारं संगीत 🎼 सुरू ठेवता येतं.
👉🏻 जमिनीवर चटई 🔻 किंवा चादर घालून योग करावा. आसनं करताना कॉटनचे ढगळ कपडं 👕 वापरणं हिताचं. टी-शर्ट व ट्रॅक पँट घालूनही योग करता येतो.
👉🏻 योगामध्ये श्वासोश्वासाला प्रचंड ✅ महत्त्व आहे. श्वासाचं एक साधं गणित आहे. योग करताना श्वास नाकानं 👃🏻 घ्यावा. तोंडानं 🚫 नाही. शरीर सैल सोडत असताना किंवा मागे वाकताना श्वास भरून घ्यायचा. याउलट, शरीर आक्रसत असताना किंवा पुढील बाजूस वाकण्याची क्रिया 💯 करताना श्वास सोडा.
👉🏻योगा करताना शरीर 👫 स्थीर ठेवा शरीराला झटके बसतील असं काही 🚫 करू नका.
👉🏻 योगा करतान नेहमी ध्यान आणि 😑 मौन धारण केलं पाहिजे .
👉🏻 जर तुम्ही थकला असाल किंवा आजारी 🤒 असाल तर योगा करू नका 🚫.
👉🏻 योगा केल्यानंतर ३० मिनीटानंतरच अंघोळ केली पाहिजे आणि ३० मिनीटानंतरच काहितरी 🍎 खाल्लं पाहिजे.
योगा केल्यानंतर त्याचे फायदे किंवा शरिरात होणारे बदल दिसून यायला वेळ लागतो.
▪ *_१० मिनिटांत करा योग :_*
👉🏻 ५ मिनिटं मान, खांदे, हाथ, कंबर, गुडघा यांच्या सूक्ष्म हालचाली करा.
👉🏻 २ ते ३ मिनिटे सूर्यनमस्कार करा.
👉🏻 ३ मिनिटे एका जागेवरच उभं राहून जॉगिंग करता येऊ शकतं.
▪ *_ऑफिसमध्ये देखील करा योग_*
▫ _ऑफिसमध्ये ७-८ तासांच्या कालावधीत मान, खांदे ,हाथ, कंबर, गुडघा यांच्या सूक्ष्म हालचाली करा._
▫ _ताडासन: आपल्या खुर्चीवर उभं राहून ताडासन करा._
▫ _दीर्घ श्वास: काम करताना थकवा जाणवत असल्यास खुर्चीवर बसून डोळे बंद करा आणि दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास घ्या. असं केल्यामुळं लगेच रिलॅक्स व्हाल._
▪ *_रोज करा ही आसने :_*
_आसने करताना नेहमी सुरुवातीला प्रार्थना 🙏🏻 करा आणि सूक्ष्म हालचाली करत करत योगाची तयारी करा._
*_१. प्रार्थना :_*
_ओम संगच्छध्वम् संवदध्वम्, सम् वो मनांसि जानताम् _
_देवा भागम् यथा पूर्वे सञ्जानाना उपासते ||_
*_२. सूक्ष्म हालचाली :_*
> सूक्ष्म हालचाली बसून किंवा उभं 🕴🏻 राहूनही करू शकता. सर्वप्रथम मानेला पुढे-मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. श्वास 💤 बाहेर सोडताना डोकं हळूहळू पुढे झुकवा आणि हनुवटी आपल्या छातीवर लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेताना डोकं शक्य असेलं तितकं मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. असं कमीत 3⃣ कमी तीन वेळा करा.
> त्याच पद्धतीनं डोकं डाव्या आणि उजव्या बाजूला फिरवा. 😌 श्वास बाहेर सोडताना डोकं डाव्या बाजूला घेऊन जा.
> यानंतर डोकं डाव्या आणि उजव्या ✅ बाजूला फिरवा. ही क्रिया तीनवेळा करा.
▪ *_ताडासन :_*
👉🏻 *_कसे करावे :_*
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडाच्या 🕴🏻 झाडाप्रमाणे ताठ असते. त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे. ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहा. त्यानंतर हळूहळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या 😌 वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहा. मग हाताच्या पंजांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहा.
_*फायदे :* या आसनात संपूर्ण शरीराला 🤸🏻♂ ताण दिला जातो. उंची वाढणे, अतिरिक्त चरबी कमी करणे तसंच एकाग्रता 🎯 वाढण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ✅ ठरते._
▪ *_त्रिकोणासन :_*
👉🏻 *_कसे करावे :_*
दोन्ही पायांमध्ये जास्तीस जास्त अंतर ठेवून सरळ उभे राहा. 🕴🏻 दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला पालथे ठेवा. श्वास आत घेत डावा हात पुढे घेऊन डाव्या पायाच्या 🖐🏻 पंजाजवळ जमिनीवर टेकवा अथवा हात डाव्या टाचेला लावा.उजवा हात वरच्या बाजूला उचला. मान वळवून उजव्या हाताकडे नजर टाका. उजवा हात वर उचलून मग डावीकडे करा व उजव्या कानावर हात ठेवा. मग श्वास 💤 सोडत पूर्वस्थितीत येऊन असाच सराव दुसऱ्या बाजूने करा.
_*सावधानता :* त्रिकोणासन करताना या आसनाचा काळजीपूर्वक 🚨 अभ्यास करा. जलदगतीने किंवा घाईघाईमध्ये शरीरावर अधिक जोर किंवा झटके देऊ नका. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या 🚫 व्यक्तींनी हे आसन करू नये._
_*फायदे :* छातीचे, पोटाचे, मानेचे स्नायू ताणले जातात. पार्श्वभागाची चरबी कमी होते. पृष्ठांगाच्या मांसपेशीवर बळ पडल्याने त्या सशक्त 💯 होतात. पचनसंस्था बळकट होते._
▪ *_वज्रासन :_*
या आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते; म्हणून या आसनाला वज्रासन असे म्हणतात
👉🏻 *_कसे करावे :_*
वज्रासानाच्या स्थितीत बसा. आता टाचा वर करून त्यावर दोन्ही 🙌🏻 हात ठेवा. हात असे ठेवा की अंगठा आत वा बोटे बाहेर असतील. श्वास आत घेऊन डोके 😣 व मान मागे झुकवून कंबर वर उचला. श्वास सोडत टाचांवर बसा. हीच क्रिया ३-४ वेळा करा.
_*फायदा :* या आसनामुळं फुफ्फुसांच्या पेशी कार्यक्षम होतात, ज्यामुळे दम्याच्या रोग्यांना लाभ होतो. तसेच सर्वाइकल, स्पाँडिलायटीस व सायटिका इत्यादी समस्त मेरुदंडाचे रोग दूर होतात. थायरॉइडसाठी लाभदायक आहे._
▪ *_भुजंगासन :_*
शरीर 🤸🏻♂ लवचिक होण्यास भुजंगासन या आसनाची मदत होते. हे आसन करताना श्वासावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असतं. भुजंगासन सूर्यनमस्कारांतर्गत आसनांपैकी ☝🏻 एक आसन आहे. या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.
👉🏻 *_कसे करावे :_*
प्रथम पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात 🙌🏻 सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत. दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्वास सोडा व श्वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्वसन 💤 संथपणे सुरू ठेवा.आसन सोडताना श्वास सोडत सावकाश पूर्ववत स्थितीत या.
_*फायदे :* हे आसन करताना आसनात पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळं पचनांद्रियांवर चांगले 👍🏻 परिणाम दिसून येतात. तसेच पाठीचा कणा लवचिक होतो._
▪ *_उत्तानपादासन :_*
👉🏻 *_कसे करावे :_*
प्रथम जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. तळहात जमिनीवर टेका. पाय सरळ आणि पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. आता श्वास आत घेऊन पायांना एक फूटापर्यंत सावकाश वर उचला व काही वेळ अशाच स्थितीत ठेवा. नंतर मग हळूहळू पाय जमिनीवर परत ठेवा. थोडा विश्राम ✋🏻 केल्यावर हीच क्रिया परत परत 🔁 करा.
_*फायदे :* हे आसन केल्यानं आतडी सशक्त व निरोगी राहतात आणि बद्धकोष्ठता गॅस व लठ्ठपणा इ. दूर होते. _
▪ *_कपालभाती :_*
कपालभातीला प्राणायामात सगळ्यात 🔝 फायदेशीर प्राणायाम मानले जाते.
👉🏻 *_कसे करावे :_*
वज्रासनमध्ये बसून 👇🏻 श्वास बाहेर सोडण्याची क्रिया करावी. श्वास बाहेर सोडताना आपल्या पोटावर अधिक जोर द्यायचा आहे. या क्रियेत श्वास घ्यायचा नसून तो जोरजोराने सोडायचा आहे. या क्रियेत श्वास हा आपोआप घेतला जात असतो.
_*फायदा*: कपालभाती प्राणायाम केल्याने चेहर्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. 👀 डोळ्याखालील काळे वलय दूर होऊन चेहर्यावर तेज निर्माण होते. दात व केसाचे सर्व प्रकारचे आजार दूर होतात. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. कफ, गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्या दूर 🚫 होण्यास मदत होते. शरीर व मनातील सर्व प्रकारचे नकारात्मक ⬇ तत्व व विचार नष्ट होतात._
▪ *_भ्रमरी प्राणायाम :_*
भ्रमरी प्राणायाम हा मनाला एका क्षणात शांत 💤 करण्यासाठी अत्यंत प्रभावी प्राणायाम आहे. मनाची चळवळ, निराशा, 😟 काळजी आणि क्रोधापासून 😡 सुटका मिळवण्यासाठी हा एक सर्वोत्तम 💯 श्वसनाचा व्यायाम आहे.
👉🏻 *_कसे करावे :_*
एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद 😑 करून ताठ बसावे. चेहऱ्यावर मंद हास्य असावे. तुमची तर्जनी तुमच्या कानांवर 👂🏻 ठेवा. तुमचा कान आणि गाल यांच्यामध्ये एक कुर्चा असतो. तुमच्या तर्जनीना या कुर्च्यावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना कुर्चावर किंचित दबाव द्या. भुंग्याचा तार स्वरात आवाज काढीत असताना, तुम्ही कुर्चाला दबलेले ठेवू शकता किंवा तुमच्या बोटाने 🖐🏻 दाब देणे आणि बंद करणे अशी क्रिया करीत राहा. तुम्ही खालच्या स्वरातसुद्धा आवाज काढू शकता. परंतु, चांगल्या परिणामांसाठी एकदम वरच्या स्वरात आवाज काढणे हे चांगले राहील. पुन्हा श्वास घ्या आणि ही क्रिया ६-७ 🕕 वेळा करावा.
_*फायदे :* एकाग्रता 🎯 आणि स्मरणशक्ती सुधारते व आत्मविश्वास निर्माण होतो. तसंच, रक्तदाब कमी ⬇ करण्यास मदत करते._
▪ *ध्यान :*
प्राणायाम झाल्यानंतर ध्यान करावे. आपण सगळेच शांततेच्या 💤 शोधात असतो, कारण आपल्याला आपल्या जीवनात याचीच फार उणीव भासत असते. मानसिक तणाव कमी करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शास्त्रज्ञांनी ध्यान अथवा मेडिटेशनकडे बोट ☝🏻 दाखवले आहे.
_*फायदे :* आपण स्वत:ला खूप काही देऊ शकतो. अध्यात्मिक 😌 स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक 👩🏻⚕ आरोग्य हे फळ आहे. वाईट सवयी नष्ट होतात. मन आनंदी होते, कार्यक्षमता वाढते._

0
Answer link
योगा: एक प्राचीन भारतीय पद्धती
योगा ही एक प्राचीन भारतीय शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धती आहे. 'योग' हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'जोडणे' किंवा 'एकत्र करणे' आहे. योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समन्वय स्थापित होतो.
योगाचे प्रकार:
- हठ योग: शारीरिक आसनांवर लक्ष केंद्रित केले जाते.
- राज योग: ध्यानावर लक्ष केंद्रित केले जाते.
- कर्म योग: निस्वार्थपणे कर्म करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
- भक्ति योग: भक्ती आणि समर्पणावर लक्ष केंद्रित केले जाते.
- ज्ञान योग: ज्ञानाच्या मार्गावर लक्ष केंद्रित केले जाते.
योगाचे फायदे:
- शारीरिक लवचिकता वाढवते.
- तणाव कमी करते.
- मानसिक शांती प्रदान करते.
- एकाग्रता वाढवते.
- रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
योगासने:
- सूर्य नमस्कार
- ताडासन
- वृक्षासन
- त्रिकोणासन
- भुजंगासन
योगा करताना योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
Ministry of Health and Family Welfare - Yoga