सरकारी योजना शासकीय योजना समाज कल्याण

मला कुष्ठरोग आहे तर गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मला कुष्ठरोग आहे तर गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल का?

7
शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत- त्यात संजय गांधी निराधार योजना आहे.

राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.

पात्रतेचे निकष, अटी आणि शर्ती


निराधार, वृद्ध व्यक्ती,  अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्याकिमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यकवय- ६५ वर्षांपेक्षा कमीकुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत

लाभाचे स्वरूप

लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतातएका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य  रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

संपर्क

अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार.

उत्तर लिहिले · 23/6/2018
कर्म · 458560
0
निश्चितपणे, कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत, निराधार आणि दुर्बल घटकांतील व्यक्तींना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
गांधी निराधार योजनेसाठी पात्रता निकष:
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराला कोणताही नियमित उत्पन्नाचा स्रोत नसावा.
  • अर्जदार निराधार, अनाथ, अपंग, कुष्ठरोगग्रस्त किंवा विधवा असावा.
आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • अपंगत्वाचा दाखला (अपंग असल्यास)
  • कुष्ठरोग प्रमाणपत्र (कुष्ठरोग असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मी अपंग आहे, मला आधार केंद्र चालू करायचे आहे, काय करावे लागेल?
अपंग समाज कल्याण खाते सोलापूर संपर्क क्रमांक काय आहे?
अपंग वृद्धाश्रम महाराष्ट्रात कुठे आहे किंवा संपर्क क्रमांक मिळेल का?
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेची माहिती?
ग्रामपंचायत दलित वस्ती योजना काय आहेत?
समाज कल्याण महिला वसतिगृहांमध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा असतात का?
नगर परिषद हद्दीतील दिव्यांगासाठी योजना कोणत्या?