Topic icon

समाज कल्याण

0

आता तुम्ही सुरु करु शकता आधार कार्ड सेंटर; पैसे कमावण्याचा हमखास मार्ग

आधारकार्ड तुमच्यासाठी कमाईचा चांगला मार्ग ठरू शकते. | Aadhar card center

आता तुम्ही सुरु करु शकता आधार कार्ड सेंटर; पैसे कमावण्याचा हमखास मार्गया Appचा अजून एक फायदा म्हणजे आधारची एक सॉफ्ट कॉपी कायमस्वरुपी तुमच्या जवळ असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची हार्ड कॉपी कायम सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही.

हल्लीच्या काळात कोणत्याही कामासाठी आधार कार्ड (Aadhar card) ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अगदी बँकेत अकाऊंट उघडण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे आधार कार्ड गरजेचे असते. मात्र, आता हेच आधारकार्ड तुमच्यासाठी कमाईचा चांगला मार्ग ठरू शकते. त्यासाठी तुम्ही एखादे आधार कार्ड केंद्र सुरु शकता. याठिकाणी तुम्ही लोकांच्या आधार कार्डासंबधी तक्रारींचे निवारण करुन पैसे कमावू शकता


आधार कार्ड केंद्र सुरु करून कशी कराल कमाई?
आपल्या देशात सध्या आधारकार्ड धारकांची संख्या खूप मोठी आहे. आधार कार्डमध्ये एखादी दुरूस्ती करावयाची असल्यास प्रत्येकवेळी आधार केंद्रात जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या परिसरात एखादे आधार केंद्र सुरु केल्यास त्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.

आधार केंद्र सुरु करण्यासाठी काय करावे लागते?
तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करायचे असल्यास त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही आधार केंद्र सुरु करू शकता. त्यासाठी सरकारकडून तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाते.


– सर्वप्रथम uidai.nseitexams.com या संकेतस्थळावर न्यू युजरसाठी जाऊन अर्ज करावा. – न्यू युजर म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नोंदणीप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकता. – नोंदणी केल्यानंतर एका दिवसाने तुम्हाला लॉग इन करून परीक्षा देण्यासाठी आगाऊ वेळ घ्यावी लागेल. – परीक्षा देण्यासाठी तुम्हाला केंद्र निवडावे लागते. परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल. – ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळेल.

सरकारी केंद्र कशाप्रकारे मिळवाल?
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार केंद्र सुरु करण्यासाठीही नोंदणी करावी लागते. त्यासाठी सीएससी या संकेतस्थळावर जाऊन Interested to become a CSC नोंदणी करावी. यानंतर पुढील सोपस्कार पार पाडल्यानंतर तुम्हाला अधिकृत आधार केंद्र मिळेल.

आधार केंद्रातून कमाई कशी होते?
तुम्ही आधार कार्ड केंद्र सुरु केल्यानंतर एका आधार कार्डापाठी तुम्हाला पैसे मिळतात. प्रत्येक आधार कार्डातील सुधारणांवर तुमच्या कमाईचा आकडा ठरतो. तुम्ही नवीन आधार कार्ड तयार केल्यास तुम्हाला 35 रुपये मिळतात. मात्र, यासाठी तुम्हाला लॅपटॉप, वेबकॅम, लॅम्प, फिंगर प्रिंटर स्कॅनर या साहित्याची गरज लागते.


उत्तर लिहिले · 3/8/2023
कर्म · 53710
0

मला माफ करा, माझ्याकडे सध्या सोलापूर अपंग समाज कल्याण खात्याच्या संपर्क क्रमांकाची माहिती नाही. मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकत नाही.

तुम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर किंवा समाज कल्याण विभागाच्या शासकीय वेबसाइटवर संपर्क क्रमांक शोधू शकता.

तुम्ही थेट जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
0
राज्यातील शासनमान्य अनुदानीत वृध्दाश्रमांची यादी

 वृध्दाश्रमांची यादी
महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांव्दारे “वृध्दाश्रम” ही योजना, शासन निर्णय क्रमांक. एसडब्लू/1063/44945/एन,दिनांक 20/02/1963 अन्वये सुरु करण्यात आली. राज्यात आजमितीस स्वयंसेवी संस्थामार्फत 33 वृध्दाश्रम अनुदान तत्त्वावर सुरु आहेत. वृध्दाश्रमात 60 वर्षावरील पुरूष व 55 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देण्यता येतो. सदरचे वृध्दाश्रम निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, शासनामार्फत प्रवेशितांना परिपोषण म्हणून प्रती व्यक्ती प्रतीमहा, रुपये 900/- प्रमाणे 12 महिन्यांसाठी अनुदान देण्यात येते. वृध्दाश्रमात प्रवेशितांना भोजन, प्रथमोपचार, निवास इ. सुविधा मोफत देण्यात येतात.

राज्यातील शासनमान्य अनुदानीत वृध्दाश्रमांची यादी खालील प्रमाणे.




अक्र. - 1

जिल्हा - मुंबई

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  संयोग उत्कर्ष मंडळ संचलित, सावित्रीबाई फुले महिला वृध्दाश्रम, भगतसिंग नगर, नं. 1, लिंक रोड, गोरेगांव डेपोसमोर, गोरेगांव (प), मुंबई-140 -022/28741621

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर
०२२-25222023
spldswo_mumsub@yahoo.co.in



अक्र -  2 

जिल्हा -  ठाणे

 वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - दि. हिंदु वुमेन्स वेलफेअर सोसायटी, श्रध्दानंद मार्ग, माहेश्वरी उदयानाजवळ, माटुंगा (पुर्व),मुंबई संचलित, श्रध्दानंद महिलाश्रम, ॲड. राजाजी मार्ग, वसई, जि. ठाणे. 

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
०२२-२५४४८६७७
swdzpthane@gmail.com



अक्र - 3

जिल्हा - ठाणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  स्वामी शांती प्रकाश वृध्दाश्रम, उल्हासनगर, सेक्शन 30 समोर उल्हास नगर 421004 - 022 528334

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
०२२-२५४४८६७७
swdzpthane@gmail.com



अक्र - 4

जिल्हा - रायगड

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - परमशांतीधाम वृध्दाश्रम , तळोजा एम.आय.डी.सी, टेक्नोवा कंपनीसमोर, पो.कोयनावेळे, ता.पनवेल, जि.रायगड-410208 27412695/ paramshantidham_1988@rediffmail.com
wwwparamshantidhan.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड
०२१४१-२२२०७९
raigadswo@yahoo.in



अक्र - 5

जिल्हा - अहमदनगर

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - भाऊसाहेब फिरोदिया वृध्दाश्रम, वसंत टेकडी, अहमदनगर - औरंगाबाद रोड, जि.अहमदनगर. 0241/2329378/2425971/9423066330

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अ.नगर (अभिविश्व कॉम्पलेक्स,बोल्हेगाव फाटा,नगर मनमाड रोड नागापूर ,अहमदनगर
०२४१-2329378
asstcomsw.ahmednagar@maharashtra



अक्र - 6

जिल्हा -  धुळे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - नवजीवन विद्या विकास मंडळ, धमाणे रोड, नगाव जि.धुळ संचलित, आनंद विहार वृध्दाश्रम, नगांव, जि.धुळे- 9921159996
navjivanvidyavikasmandal@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद , धुळे
०२५६२-२२९४७०
dswozpdhule@gmail.com




अक्र - 7

जिल्हा - पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - डेव्हिड ससून इनफर्मै असायलम, निवारा वृध्दाश्रम, 96 नविन सदाशिव पेठ, ठोसर पागा, पुणे 411030 - 020-24339998/24538429
niwarapune@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (पी.एम.टी.इमारत,कामगार न्यायालयाच्या वर,2 रा मजला स्वारगेट,पुणे-42
०२०-24456336
spldswop@gmail.com




अक्र - 8

जिल्हा - पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  पुणें ब्लाईंड मेन्स असोसएशन महिला वृध्दाश्रम, दळवी वाडा, नांदेड फाटा, सिंहगड रोड, धायरी, पुणे. 020/26336433/ 24380406
tbma82@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (पी.एम.टी.इमारत,कामगार न्यायालयाच्या वर,2 रा मजला स्वारगेट,पुणे-42
०२०-24456336
spldswop@gmail.com



अक्र - 9

जिल्हा -  पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  दि. नॅव लायन्स होम फॉर एजिंग अँड ब्लांईंड , सदरबाग, जुना खंडाळा रोड, खंडाळा, जि.पुणे 410302 - 02114/273066
nablionshome@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
०२०-२६१३१७७४
zppunesw@yahoo.com




अक्र - 10

जिल्हा -  पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - जनसेवा फाऊंडेशन संचलित, वृध्दाश्रम, पानशेत, आंबी रानवडे, ता.वेल्हा, जि.पुणे. 020/24538787

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
०२०-२६१३१७७४
zppunesw@yahoo.com





अक्र - 11

जिल्हा - सांगली

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - वृध्द सेवाश्रम कूपवाडा, लक्ष्मीनगर नजीक, कुपवाड मार्ग, जि. सांगली 416416 - 0233/2303784
vrudhasevashramsangli@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
०२१६२-२२८७६४
swozpsatara@yahoo.com


अक्र - 12

जिल्हा - सोलापूर

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  आरोग्य वैभव मंदिर संचलित, रामकृष्णहरी वृध्दाश्रम, संत पेठ पंढरपूर, जि.सोलापूर - 8793568894 / 9370157243

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
०२१७-२७२२५५७
zpsolapurswo@gmail.com



अक्र - 13

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  गाडगें महाराज मिशन संचलित, परधाम वृध्दाश्रम, वलगांव, ता.जि.अमरावती. -9767827642/9373819612

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com




अक्र - 14

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  मधूबन वृध्दाश्रम, बडनेरा रोड, जिल्हा अमरावती. काँग्रेसनगर रोड, दुध डेअरीजवळ, कॅम्परोड, अमरावती - 9763036336

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com


अक्र - 15

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  श्रीगुरुदेव वृध्दाश्रम, मोझरी, जि. अमरावती-9422671665

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com



अक्र - 16

जिल्हा -  अकोला

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - महात्मा ज्योतिबा फुले वृध्दाश्रम, मुर्तिजापूर, ता.जि.अकोला.
07256/243035/ 9975079062

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
०७२४-२४३५७७९
swozpakola@gmail.com


अक्र - 17

जिल्हा - वाशिम

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - भायजी महाराज वृध्दाश्रम, कवठा नाईक, ता. रिसोड, जि.वाशिम.
8888081203

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
०७२५२-२३१०१७
swozpwashim@gmail.com
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 9415
1
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एका संस्थेची माहिती: **एकलव्य फाऊंडेशन (Eklavya Foundation):** एकलव्य फाऊंडेशन ही मध्य प्रदेशात स्थित एक अशासकीय संस्था (NGO) आहे, जी आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. 1982 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. एकलव्य फाऊंडेशन शिक्षण, विज्ञान शिक्षण, सामाजिक विज्ञान आणि भाषा यांसारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न करते. **उद्देश:** * मुलांना शिक्षणामध्ये मदत करणे. * शिक्षकांना प्रशिक्षण देणे. * शैक्षणिक साहित्य तयार करणे. * शाळा आणि समुदायांमध्ये समन्वय स्थापित करणे. **कार्य:** * फाऊंडेशनने अनेक शाळांमध्ये शिक्षण सुधारणा कार्यक्रम राबवले आहेत. * शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत, ज्यात त्यांना नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान वापरण्यास शिकवले जाते. * मुलांसाठी विज्ञान आणि गणितासारख्या विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी मनोरंजक शिक्षण साहित्य तयार केले जाते. * फाऊंडेशन स्थानिक भाषांमध्ये शिक्षण सामग्री तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे मुलांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. एकलव्य फाऊंडेशनच्या कार्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे, तसेच शिक्षकांच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आहे.
उत्तर लिहिले · 10/1/2022
कर्म · 20
2
राज्यतील दुर्बल घटकांची विशेष काळजी पुर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्याय यापासून त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली.

या विभागाद्वारे तळागाळातील गावपातळी पर्यतच्या अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना  शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी समाज कल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे.

थोडक्यात, समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास करणे हेच समाज कल्याण विभागाचे उद्दिष्टे आहे.

समाज कल्याण विभाग योजनादलित वस्ती सुधार योजना
या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोई, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार इ. व्यवस्था करून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक गावास लोकसंखेच्या निकषानुसार जास्तीत जास्त १० लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.

शिष्यवृत्ती योजना
शिक्षण क्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही. प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमाणे प्रथम दोन विद्यार्थ्यांना व कमीत कमी ५०% गुण असणारयांना हि शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनेमधुन अनुसूचित जातीच्या इ.५ वी ते १० वी मध्ये असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना रु. १०००/- प्रमाणे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील इ.५ वी ते इ. ७ वी विद्यार्थ्यांना रु ५००/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.

अपंगांसाठी योजना
१. कृत्रिम अवयव पुरविणे

अपंगांना त्यांचे अपंगत्व कमी करणेसाठी, त्यांच्या हालचाली होण्यासाठी आवश्यक तो कृत्रिम अवयव पुरवठा करण्यात येतो. यासाठी खर्चाची मर्यादा प्रती लाभार्थी रु. ३००० पर्यंत आहे.

१.अटी –

कृत्रिम अवयवासाठी वार्षिक उत्पन्न १८००० रु. असणे आवश्यक असते.
कृत्रिम अवयव व साधणे प्रौढ व्यक्तींना ३ ते ५ हजार वर्षातून एकदा व १५ वर्षाखालील मुलांना दर वर्षी देण्यात येतो.
२. व्यावसायिक प्रशिक्षण

शारीरिक दृष्ट्या अपंगाना व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.

३. अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार

विभागीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी व १२ वी उत्तीर्ण अंध व कर्णबधीर, अस्थिव्यंग वर्गातील प्रत्येकी तीन गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रु. १००० रोख रकमेचा पुरस्कार समारंभ पुर्वक दिला जातो.

वृद्धाश्रम योजना
वृद्ध व अपंग गृहे योजने अंतर्गत वृद्धाश्रम योजना राबविली जात असते. या योजने अंतर्गत ज्या व्यक्ती निराधार आहेत. ज्या व्यक्तींना काल्याही प्रकारचा आधार नाही अशी व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.

या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागा मार्फत महिना ५०० रु. प्रमाणे मान्य संख्येला शासनातर्फे अनुदान देण्यात येत असते.

वैयक्तिक शौचालय अनुदान
वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी रु. ७००० इतके अनुदान रोख स्वरुपात देण्यात येते. त्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत २००० रु. व सहभाग म्हणून लाभार्थ्यास १००० रु. जमा करणे आवश्यक असते.
वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम हे संबंधित गरम पंचायत मार्फत करण्यात येईल.
लाभार्थीने प्रस्तावासोबत स्वतःच्या घराचा ८. अ चा उतारा देणे आवश्यक असते.
वैयक्तिक शौचालय बांधणेसाठी घराशेजारी मोकळ्या जागेच्या क्षेत्राबाबत गरम सेवकाचा दाखला देणे आवश्यक असते.
मंजुरी नंतर संबधित गरम पंचायतीने ३ महिन्याच्या आत शौचालयाचे बांधकाम पुर्ण करणे आवश्यक राहील.
निवारा योजना
प्रत्येक लाभार्थीस ४७००० रु. अनुदान मंजुर करण्यत येईल. त्यामध्ये लाभार्थ्याने रक्कम रु. ३००० स्वहिस्सा खर्च करावयाचा आहे.
सदर स्वहिस्सा रोख रक्कम देवून अगर श्रमदानाने अदा करावयाची आहे. लाभार्ठीचा पहिला हफ्ता करारनामा झाले नंतर रु.१५००० व रु. १८००० हजाराचे मुल्यांकन प्राप्त झाल्यानंतर हफ्त्याने पैसे जमा होत राहतील.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमीहीन अथवा त्याचे नावे घर असेल तर ते कुदामोडीचे असणे आवश्यक आहे.
मागासवर्गीयांना लोखंडी स्टोल पुरविणे
लाभार्थी निवड ही ग्राम सभेत करण्यात यावी.
लोखंडी स्टोलचा दूरपयोग झाल्यास रक्कम लाभार्थीकडून एक रकमी वसूल केली जाईल.
स्टोल ठेवण्याची स्वतःच्या मालकीची जागा असावी व जागेचा पुरावा म्हणून ७/१२ व ८ अ देणे आवश्यक आहे.
लोखंडी स्टोल हा उद्योग व्यवसायासाठी वापरात आणण्यासाठी येईल असे लाभार्थीकडून रु. १०० चा स्टंप पेपरवर लेखी घेण्यात यावा.
जागा भाड्याची असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र व भाडे करारनामा आवश्यक, व्यवसाय करण्यासाठी गरम पंचायतीचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक असते.
मागासवर्गीयांना पीठ गिरणी पुरविणे -:
लाभार्थीस वस्तू स्वरुपात लाभ देण्यात येईल.
लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रु. १०० चे स्टंप पेपरवर करून घेण्यात येईल.
पीठ गिरणी व्यवसायासाठी स्वतःच्या मालकीची जागा असल्यास त्याबाबत जागेचा उतारा ग्रामपंचायत ८ अ जोडणे आवश्यक असते.
विजेची सोय असल्याबाबतचा पुरावा देण्यात यावा.
पीठ गिरणी कालावधीनंतर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती लाभार्थीने स्वतः करावी.
समाजातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा यासाठी तसेच दुर्बल घटक हे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा या दृष्टीने समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजनाचा लाभ घेता यावा. तसेच विकास व्हावा हा मुख्य उद्देश ठेवून योजनांची अंमलबजावणी केली जात असते.....
उत्तर लिहिले · 3/5/2020
कर्म · 6980
0

समाज कल्याण महिला वसतिगृहांमध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा असण्याची शक्यता कमी आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वसतिगृहाच्या प्रशासकाशी संपर्क साधा.

तुम्ही खालील ठिकाणी संपर्क साधू शकता:

  • समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन: sjsd.maharashtra.gov.in
  • संबंधित वसतिगृहाचे कार्यालय

टीप: नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040
0
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही योजनांची माहिती देत आहे. नगर परिषद हद्दीतील दिव्यांगांसाठी विविध योजना खालीलप्रमाणे आहेत:

दिव्यांगांसाठी नगर परिषद योजना

नगर परिषदेच्या हद्दीत दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • अपंग कल्याण निधी: या निधीतून दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
  • शिक्षण योजना:
    • दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
    • शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य.
  • आरोग्य योजना:
    • वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी अर्थसहाय्य.
    • अपंगत्व निवारण शस्त्रक्रियेसाठी मदत.
  • स्वयंरोजगार योजना:
    • स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
    • व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण.
  • घरकुल योजना: दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना.
  • सार्वजनिक सुविधा:
    • सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, जसे रॅम्प, विशेष शौचालय.

टीप: प्रत्येक नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात योजना थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात. त्यामुळे, आपल्या नगर परिषदेमध्ये नेमक्या कोणत्या योजना आहेत याची माहिती घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात संपर्क साधावा.

तुम्ही तुमच्या शहरातील नगर परिषदेच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा कार्यालयात संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040