4 उत्तरे
4 answers

हास्य वायू म्हणजे काय?

26
हस्य वायू म्हणजे काय?? 👇👇

हस्य वायू लाच 'लाफिंग गॅस' असेही म्हणतात. हा वायू म्हणजे "नायट्रस अॉक्साईड" होय. नायट्रस अॉक्साईड हा एक रंगहीन वायू असून त्याला विशिष्ट असा गंध व गोडसर चव असते. दाताचे डॉक्टर व लहान शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल देताना देखील या वायूचा वापर करतात. 20% अॉक्सिजन व हा वायू असे मिश्रण वापरतात.

श्वासावाटे शरीरात हा वायू गेल्या नंतर सुरवातीला सौम्य प्रमाणात बधिरता येते. व्यक्ती या काळात उत्तेजित होतात. व हसायला लागते.

म्हणूनच ह्या वायूला लाफिंग गॅस असे नाव पडले आहे.... 😊
उत्तर लिहिले · 18/6/2018
कर्म · 77165
3
नत्र प्राणिदवायू (नायट्रस ऑक्साईड) या वायूस हास्य वायू असे म्हणतात. याचे रासायनिक सूत्र आहे N₂O.
याची IUPAC ओळख (वैज्ञानिक नामकरण) डायनायट्रोजन मोनॉक्साईड (Dinitrogen monoxide ) अशी आहे.

खोली तापमानाला हा एक रंगहीन अज्वलनशील वायू असतो.
भुलतत्व आणि वेदनाशामक गुणांमुळे वैद्यकशास्त्रात मुख्यत्वे दंतशास्त्रात वर्ष १८४४ पासून याचा वापर भूल देण्यासाठी केला जातो.

१७९९ रोजी या वायुवर संशोधन करत असताना या वायूमुळे अनावर झालेले हसू अनुभवल्यामुळे हंफ्री डेवी यांनी याचे लाफिंग गॅस असा शब्दप्रयोग करून नामकरण केले.

स्रोत : विकिपीडिया Nitrous Oxide
उत्तर लिहिले · 6/6/2019
कर्म · 11720
0

हास्य वायू (Nitrous oxide) एक रासायनिक संयुग आहे. या वायूला नायट्रस ऑक्साइड (Nitrous oxide) किंवा डायनायट्रोजन मोनोऑक्साइड (dinitrogen monoxide) असेही म्हणतात. हा एक रंगहीन आणि गैर-ज्वलनशील वायू आहे.

हास्य वायूचे उपयोग:

  • वैद्यकीय क्षेत्रात भूल देण्यासाठी
  • दंतचिकित्सेत वेदना कमी करण्यासाठी
  • वाहनांच्या वेगासाठी

इतिहास:

जोसेफ प्रीस्टली (Joseph Priestley) यांनी 1772 मध्ये नायट्रस ऑक्साइडचा शोध लावला. नायट्रस ऑक्साइडमध्ये गुंगी आणण्याची क्षमता असल्यामुळे लवकरच ते मनोरंजन आणि मनोरंजनासाठी वापरले जाऊ लागले.

धोके:

  • hypoxic brain damage (मेंदूला ऑक्सिजन कमी पुरवठा)
  • B12 च्या कमतरतेमुळे मज्जातंतूचे नुकसान
  • गरोदरपणात बाळाला धोका

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

घरो आणि हॉस्पिटलमध्ये कोणत्या गॅस सिलेंडरने पुरवले जातात?
एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते?
एलपीजी गॅस मध्ये प्रमुख दोन घटक कोणते?
हवेत तरंगणाऱ्या व वर जाणाऱ्या फुग्यांमध्ये कोणता वायू असतो?
सीएनजी आणि एलपीजी मध्ये काय फरक आहे?
हर्षवायू म्हणजे काय?