वायू विज्ञान

हवेत तरंगणाऱ्या व वर जाणाऱ्या फुग्यांमध्ये कोणता वायू असतो?

2 उत्तरे
2 answers

हवेत तरंगणाऱ्या व वर जाणाऱ्या फुग्यांमध्ये कोणता वायू असतो?

9
हवेत तरंगणाऱ्या फुग्यात "हेलियम" वायू असतो.
फुग्यात भरण्यासाठी व फुगे हवेत उडण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. हायड्रोजन नंतर हेलियम हा दुसरा हलका वायू आहे.
हा बिनविषारी व एकाणु वायू आहे.
श्वास घेण्यासाठी वापरता येणाऱ्या टाकित २०टक्के ऑक्सीजन व ८० टक्के हेलियम असते. अवकाश दुर्बिणीचे तापमान थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. वेल्डिंग करण्यासाठी, निऑन लाइट्स मध्ये, अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी, स्फोटके बनविण्यासाठी आदिं अनेक गोष्टीत हेलियमचा उपयोग होतो.
१८ ऑगस्ट ला "जागतिक हेलियम दिवस" म्हणून साजरा केला जातो.

उत्तर लिहिले · 9/12/2018
कर्म · 458560
0

हवेत तरंगणाऱ्या व वर जाणाऱ्या फुग्यांमध्ये सहसा हेलियम (Helium) वायू असतो.

हेलियम वायू:

  • हा वायू हवेपेक्षा हलका असल्यामुळे फुग्यांमध्ये भरल्यावर ते तरंगतात.
  • हेलियम ज्वलनशील नाही, त्यामुळे तो हायड्रोजनपेक्षा सुरक्षित आहे.

हायड्रोजन वायू:

  • हायड्रोजन वायू देखील हवेपेक्षा हलका असतो आणि फुग्यांसाठी वापरला जाऊ शकतो.
  • परंतु तो अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे धोकादायक ठरू शकतो.

गरम हवा:

  • गरम हवा देखील फुग्याला तरंगायला मदत करते, कारण गरम हवा थंड हवेपेक्षा कमी घनतेची असते.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

घरो आणि हॉस्पिटलमध्ये कोणत्या गॅस सिलेंडरने पुरवले जातात?
एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते?
एलपीजी गॅस मध्ये प्रमुख दोन घटक कोणते?
हास्य वायू म्हणजे काय?
सीएनजी आणि एलपीजी मध्ये काय फरक आहे?
हर्षवायू म्हणजे काय?