बाजारहाट शेती पिके कृषी टोमॅटोची लागवड

टोमॅटो या पिकाची चांगली व्हरायटी सांगा, जी कमी खर्चात जास्त उत्पादन देईल आणि बाजारात मागणी असलेली असेल.

2 उत्तरे
2 answers

टोमॅटो या पिकाची चांगली व्हरायटी सांगा, जी कमी खर्चात जास्त उत्पादन देईल आणि बाजारात मागणी असलेली असेल.

6
टोमॅटोच्या सुधारित जाती :

सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक :

१) पंजाब केसरी : ही जात 'रूपाली' ह्या टोमॅटोच्या जातीसारखी चालते, बिगर तारेची, गर भरपूर असलेली, कमी पाण्यामध्ये जिद्दीने वाढणारी असल्यामुळे उन्हाळ्यात लागवड करतात. खेडेगावात भरपूर मागणी असते.

२) पंजाब छुआरा : ह्या टोमॅटोच्या जातीची फळे गुच्छाने येतात. सर्वसाधारण भागातील शेतकऱ्यांसाठी परवडणारी, कमी खर्चिक जात असून लागवड उन्हाळ्यात करतात.

३) पुसा अर्ली ड्वॉर्फ : झुडूपासारखी बुटकी असून लवकर व तिन्ही हंगामात येणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची गोल व पूर्ण लाल रंगाची असतात. इकरी १४ टन उत्पादन देते.

४) पुसा रूबी : तिन्ही हंगामात चांगले उत्पन्न देणारी ही जात असून लवकर येणारी आहे. फळे मध्यम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात. तसेच विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते. एकरी १२ ते १३ टन उत्पादन देते.

५) पुसा १२०: ही जात निमॅटोडला प्रतिकारक आहे. झुडूपासारखी वाढणारी असून फळे मध्यम गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात.

६) मार्ग्लोब : या जातीची फळे मध्यम त मोठ्या आकाराची गोल व तांबडी रसरशीत असतात. कॅनिंगसाठी उत्तम आहे.

७) रोमा : या जातीची फळे लांबट, जाड कातडीची असतात. त्यामुळे वाहतुकीत नुकसान होत नाही. टोमॅटो पेस्टसाठी उत्तम आहे.
उत्तर लिहिले · 4/6/2018
कर्म · 458580
0

टोमॅटोच्या काही चांगल्या व्हरायटी खालीलप्रमाणे आहेत, ज्या कमी खर्चात जास्त उत्पादन देतात आणि बाजारात त्यांची मागणी आहे:

  • अर्का रक्षक:

    ही व्हरायटी रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगली आहे. जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिकार करते. त्यामुळे रासायनिक फवारणीचा खर्च कमी होतो.

    उत्पादन क्षमता: 70-80 टन प्रति हेक्टर (Source: IIHR)

  • पूसा रुबी:

    लवकर तयार होणारी जात आहे. फळे लाल रंगाची आणि आकर्षक असतात.

    उत्पादन क्षमता: 30-35 टन प्रति हेक्टर

  • नटराज:

    ही संकरित जात असून अधिक उत्पादनक्षम आहे. फळे गोल आणि आकर्षक असतात.

    उत्पादन क्षमता: 80-90 टन प्रति हेक्टर

  • अभिलाष:

    ही जात कमी कालावधीत तयार होते आणि तिची फळे मध्यम आकाराची असतात.

    उत्पादन क्षमता: 60-70 टन प्रति हेक्टर

टीप:

  1. बियाणे निवडताना तुमच्या क्षेत्रातील हवामान आणि मातीचा प्रकार विचारात घ्या.

  2. अधिक माहितीसाठी, तुम्ही कृषी विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा कृषी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5060

Related Questions

माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?
सेंद्रिय खत प्रकल्प माहिती?
मसाला पिकांचे महत्त्व सांगून हळद या पिकाविषयी खालील मुद्द्यांवर माहिती लिहा.
बीज उत्पादन तंत्रज्ञान?
कृषी मीडिया पुरस्कार २०२५ कुणाला देतात?