शब्दाचा अर्थ शेती कृषी शेती तंत्रज्ञान

बुजगावणे म्हणजे काय, ते कसे बनवतात?

3 उत्तरे
3 answers

बुजगावणे म्हणजे काय, ते कसे बनवतात?

4
बुजगावणे म्हणजे शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यास तयार करण्यात आलेली मानवनिर्मित एक पुतळासदृश्य वस्तु आहे. याचा उपयोग पक्ष्यांना 'भिती' (घाबरविणे) दाखविण्यास होतो. पक्ष्यांचा असा समज होतो कि शेतात कोणी व्यक्ती उभी आहे म्हणुन ते पिकाँचे नुकसान करीत नाही.सहसा बास किंवा काड्यांचे 'अधिक' (+) असे चिन्ह तयार करून त्यास शर्ट/अंगरखा घातला जातो.छोट्या मडक्यास ओल्या चुन्यानेडोळे,नाक व तोंड रंगविल्या जाते व ते वरच्या टोकास उपडे घालण्यात येते.तयार झालेल्या अश्या बुजगावण्यास मग पिकांमध्ये रोवण्यात येते.

मराठी साहित्यात 'बुजगावणे' हा शब्द 'भिती दाखविणे' अश्या अर्थाने योजिल्या जातो.
उत्तर लिहिले · 3/6/2018
कर्म · 123540
0
बुजगावणे म्हणजे शेतकरी लोक आपल्या शेतात एक मडकं घेऊन त्यावर मानवी चेहऱ्यासारखी प्रतिमा बनवून ते शेतात काठीच्या आधारे उभे करतात. जेणेकरून पशुपक्षी त्यांच्या रानात पिकातील दाणे खायला येतील तेव्हा त्यांना असे वाटेल की कोणीतरी माणूस शेतात आहे, या भीतीने ते शेतात येणार नाहीत आणि आपल्या पिकाचे रक्षण होईल.
उत्तर लिहिले · 3/6/2018
कर्म · 260
0

बुजगावणे:

बुजगावणे म्हणजे शेतात उभे केलेले एक मानवी आकृतीचेModifications प्रतिक असते. ते विशेषतः पक्षी आणि इतर प्राणी यांना शेतातून दूर ठेवण्यासाठी वापरले जाते.

बुजगावणे कसे बनवतात:

  1. साहित्य: लाकडी किंवा बांबूचीFrame, जुने कपडे (शर्ट, पॅन्ट), दोरी, गवत किंवा तत्समMaterial, आणि एक भांडे.
  2. फ्रेम तयार करणे: लाकडी किंवा बांबूच्या साहाय्याने मानवी आकाराची फ्रेम तयार करा. एक उभा आणि दुसरा आडवा लाकूड जोडा, ज्यामुळे त्याला T आकार येईल.
  3. कपडे घालणे: फ्रेमला जुने कपडे (शर्ट आणि पॅन्ट) घाला.
  4. गवत भरणे: कपड्यांमध्ये गवत, पेंढा किंवा तत्सम मटेरियल भरा, ज्यामुळे त्याला मानवी आकार येईल.
  5. डोके तयार करणे: भांड्याचा किंवा तत्सम वस्तूचा उपयोग करून डोके तयार करा आणि त्याला चेहऱ्याचा आकार द्या.
  6. जुळवणे: तयार केलेले डोके धडाला जोडा आणि त्याला व्यवस्थित बांधा.
  7. शेतात സ്ഥാപना: तयार झालेले बुजगावणे शेतात अशा ठिकाणी उभे करा, जिथे ते दूरवरून सहज दिसेल.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

कांदा लागवडीसाठी वाफे का तयार करतात?
कुणाकडे ऊस लागवड आणि तंत्रज्ञान किंवा जोडधंदा, ऊस उत्पादन संबंधित व्हाट्सअप ग्रुपच्या लिंक्स असतील तर कृपया द्या?
शेतीच्या तंत्रज्ञानात कशी प्रगती होत गेली?
शेतामध्ये मल्चिंग ऑपरेशन म्हणजे काय, मल्च म्हणजे काय?
शेतकरी बांधवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, पीक लागवड साठी निशुल्क माहिती आपल्या मोबाईलवर कशी मिळेल?
बिगर मशागत (zero tillage) तंत्र प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी वापरले जाते?
लाखीबाग ही संकल्पना कोणत्या कृषी तज्ञाची आहे? त्यांच्याबद्दल माहिती द्या.