2 उत्तरे
2
answers
शेतीच्या तंत्रज्ञानात कशी प्रगती होत गेली?
1
Answer link
🌾 *शेती* 🌾
***************
निसर्गतः वावरणारा मानव जेव्हा टोळ्यांनी राहू लागला, तेव्हा अन्नधान्याचा पुरवठा अर्थातच अपुरा पडू लागला. त्यासाठी शेतीची सुरुवात साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते. विविध तृणधान्ये नैसर्गिकरीत्या त्याआधीही उगवत होतीच. पण जंगल साफ करून जमीन मोकळी करून तेथे ही तृणधान्ये पेरायची, लागवड करायची व पीक घ्यायचे म्हणजेच शेती करा करायची, ही त्या काळापासूनची कल्पना.
भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे आपण म्हणतो. देशातील ७० टक्के लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत, असेही आपण म्हणतो. पण एकूण दर एकरी उत्पादनाचे जगातील आकडे पाहिले, तर आपण फारच मागासलेले आहोत, असे लक्षात येते. सध्याच्या आपल्या लोकसंख्येला पुरेल, एवढा जेमतेम धान्योत्पादनाचा इष्टांक आपण गेली १० वर्षे गाठत आहोत, हीच आपली करामत आहे.
शेती करायला सुरुवात केल्यापासूनचे काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेणे आवश्यक ठरते. जमीन मोकळी करून हाताने धान्य म्हणजे बी फेकावयाचे, ही सुरुवातीची पद्धत. या प्रकारात उघड्यावरचे बी अनेकदा पाखरे खाऊन जात वा रुजू शकत नसे. १७०१ साली जेथ्रो टूल याने पेरणीसाठी एक सोपी पद्धत वापरणे सुरू केले. खोल गेलेल्या एका अर्धगोलाकार नळीतून थेट जमिनीच्या खाली धान्याचे बी सोडायची ही पद्धत तेव्हापासून सर्वत्र रुजत गेली.
नांगरणीसाठी फाळ पूर्वी लाकडी असत. घोड्यांच्या वा बैलांच्या अंगावर पडणारे ओझे त्रासदायक होई. लोखंडी फाळांचा नांगर व त्याचे जू बैलांच्या खांद्यांवर आडवी दांडी ठेवून लावण्याची पद्धत १८३७ सालापासून 'जीन डिअर' या अमेरिकनाने वापरात आणली. आपल्याकडे ही पद्धत वापरात यायला तब्बल शंभर वर्षे जावी लागली. किर्लोस्करांनी लोखंडी फाळाचे नांगर इथे तयार करायला सुरुवात केली व नंतर ते आपल्याकडे वापरात आले. या नांगरांमुळे नांगरणी खूप खोलवर होऊ लागली. जमिनीचा कस वाढू लागला. पिके जोमाने वाढू लागली व शेतीच्या उत्पन्नात खूपच वाढ होऊ लागली.
शेती करताना निम्मा भाग वर्षाआड तसाच ओसाड नापीक ठेवायचा व त्या जमिनीचा कस वाढवायचा, हे अनेक वर्षे शेतकऱ्यांना माहीती होते. पण त्याऐवजी डाळी, कडधान्ये, शेंगदाने, बार्ली यांसारखी पिके गव्हानंतर घेतली, तर जमिनीचा कस वाढू शकतो, हे अठराव्या शतकात प्रयोगाने सिद्ध झाले. या पद्धतीचा वापर करून जनावरांचा चाराही वाढला, ती धष्टपुष्ट राहून त्यांच्याकडून शेतीची कामे जास्त करून घेता येऊ लागली.
शेतीतील खतांचा वापर व बियाण्यांमधील प्रगती याने खरी 'हरितक्रांती' घडून यायला सुरुवात झाली. १९६० सालानंतर प्रत्येक प्रकारची हायब्रीड बियाणे वापरात येऊ लागली. (हायब्रिड म्हणजे दोन वेगवेगळय़ा जातीची संकर करून मिळवलेली) त्यामुळे दाण्यांचा आकार व कणसातील दाण्यांची संख्या या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. त्याच्या जोडीला विविध किडींसाठी व बुरशीजन्य रोगांसाठी फवारायची औषधे व ती फवारण्यासाठी प्रगत देशांत छोटी विमानेसुद्धा वापरात येऊ लागली. यांत्रिक शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे तयार करण्यात याच काळात खूप प्रगती होत गेली. एकट्या शेतकऱ्याने आपल्या दोन व तीन कुटुंबीयांसह शंभर शंभर एकरात शेती करणे हे त्यामुळे नाविन्याचे राहिले नाही.
शेतातील यंत्रांची ही प्रगती अजून आपल्याला आत्मसात करणे शक्य झालेले नाही, कारण त्यासाठी प्रचंड आकाराची शेती आपल्याकडे शेतकरी स्वतःकडे ठेवूच शकत नाही. पाच पन्नास एकर शेतीसाठी ट्रॅक्टरपलीकडे यंत्रे विकत घेणे येथे शक्य नाही. हायब्रीड बियाणे, नैसर्गिक व कृत्रिम खतांचा वापर, उपलब्ध पाण्याचा नीट उपयोग केल्यास पूर्वीच्या म्हणीप्रमाणे आजही - 'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी' ही गोष्ट खरी ठरू शकेल. भविष्यकाळात शेतीला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. कारण बी - बियाण्यांमधील, जेनेटिक इंजिनिअरिंगमधील झपाट्याने होत चाललेली प्रगती. रोग होऊच नये, अशी बियाणे, नत्र पदार्थाचा वापर नेमक्या जागीच करून खतांच्या प्रमाणात केली जाणारी घट, कमी प्रतीची बियाणे आधीच यांत्रिक परीक्षेने बाजूला काढण्याची यंत्रणा या गोष्टींमुळे शेतीचे स्वरूप आमूलाग्र बदलत जाणार आहे.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

0
Answer link
शेतीत तंत्रज्ञानाचा विकास अनेक टप्प्यांमध्ये झाला आहे, ज्यामुळे उत्पादन वाढले आहे आणि शेती अधिक कार्यक्षम झाली आहे. खालीलप्रमाणे काही मुख्य प्रगती आहेत:
-
यांत्रिकीकरण (Mechanization):
- सुरुवात: माणसांनी आणि जनावरांनी शेती करणे.
- प्रगती: ट्रॅक्टर, मळणी यंत्र (threshers), आणि इतर यांत्रिक उपकरणांचा वापर.
- परिणाम: कमी वेळात अधिक काम, शारीरिक श्रमात घट.
-
सिंचन तंत्रज्ञान (Irrigation Technology):
- सुरुवात: नैसर्गिकरित्या पावसावर अवलंबून राहणे.
- प्रगती: नद्या, तलाव आणि विहिरींद्वारे पाणीपुरवठा, स्प्रिंकलर (sprinkler) आणि ठिबक सिंचन (drip irrigation) पद्धती.
-
परिणाम: पाण्याची बचत, पाण्याची कार्यक्षम वापर आणि नियमित उत्पादन.
ठिबक सिंचनाबद्दल अधिक माहितीसाठी विकासपीडिया पोर्टलला भेट द्या.
-
रासायनिक खते आणि कीटकनाशके (Chemical Fertilizers and Pesticides):
- सुरुवात: नैसर्गिक खतांचा वापर (शेणखत, कंपोस्ट).
- प्रगती: रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) वापर, जसे युरिया, फॉस्फेट आणि पोटॅश, तसेच कीटकनाशकांचा वापर.
- परिणाम: उत्पादन वाढले, परंतु पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले.
-
जनुकीय सुधारणा (Genetic Modification):
- सुरुवात: पारंपरिक पद्धतीने निवडक वाणांची लागवड.
- प्रगती: जनुकीयmodified (GM) बियाण्यांचा वापर, ज्यामुळे अधिक उत्पादन, कीडरोधक क्षमता आणि दुष्काळात तग धरण्याची क्षमता वाढली.
- परिणाम: उत्पादन वाढले, पण GM पिकांबद्दल काही ठिकाणी मतभेद आहेत.
-
अचूक शेती (Precision Farming):
- तंत्रज्ञान: GPS, सेन्सर्स (sensors), ड्रोन (drone) आणि डेटा विश्लेषण (data analysis) वापरून शेती करणे.
- परिणाम: कमी खर्चात अधिक उत्पादन, पाण्याची आणि खतांची बचत, जमिनीचा योग्य वापर.
-
कृषी ऑटोमेशन (Agricultural Automation):
- तंत्रज्ञान: स्वयंचलित (automatic) यंत्रे आणि रोबोट्सचा वापर.
- उदाहरण: स्वयंचलित ट्रॅक्टर, फवारणी करणारे रोबोट्स आणि फळ तोडणी करणारे रोबोट्स.
- परिणाम: मनुष्यबळाची गरज कमी, अधिक कार्यक्षम आणि जलद काम.
अशा प्रकारे, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, ज्यामुळे उत्पादन आणि कार्यक्षमतेत सुधारणा होत आहे.