3 उत्तरे
3
answers
सुतक म्हणजे काय?
21
Answer link
सुतक ही हिंदु धर्मातली एक प्रथा आहे. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात .ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच सोयर किंवा अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ.
सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर १ ते १३ दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे, गृह्यसूत्रे अशा विविध ग्रंथांत याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे. वस्तुत: ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध नव्हती, त्याकाळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी. सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुनः आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता.
सुतक कसे पाळावे
नियमसंपादन करासुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये,कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.अत्तर किंवा सेंट वापरू नये,नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणार्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपरने घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभार्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरने तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.
खलील लोकांचे सुतक नसतेसंपादन करामरणाच्या इच्छेने खूप उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, टांगून घेऊन ( फाशी घेऊन ), पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत असता - आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नाही. गुरुहत्या करणारा वगैरे अशाप्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, निच कर्म करणारे, पितृकर्म जे करत नाहीत अशाकडे जेवणसुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये. शास्त्राचा उद्देश सर्वांनी नियमात, चांगले वागावे असा असावा म्हणूनच असे कडक नियम केले असावेत.
आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण .....

13
Answer link
सुतक हे हिंदू धर्मात पाळले जाते. एखाद्या जवळच्या
व्यक्तीचा मृत्यू झाला की ते सुतक पाळले जाते. एकाच कुळातील माणसं हे सुतक पाळतात, सोयरे पाहुणे पाळत नाहीत.
सुतक खरं तर तेरा दिवसाचं असतं, पण खरं तर दहाव्या दिवशी सुतक संपतो. त्यानंतर दहावा, बारावा, तेरावा मृत व्यक्तीची कार्य विधी होते.
सुतक दहाव्या दिवशी संपत, पण ब्राम्हण बाराव्या दिवशी कार्य विधी करण्यास येतात, तेव्हा ते पाहिलं घरामध्ये शुद्धीकरण करतात. ते त्यांच्याकडचे गंगाजल घेऊन येतात आणि त्याने घर शुद्ध करतात आणि ते गंगाजल घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून दिले जाते. सुतक संपतो आणि विधी कार्य सुरु केले जाते.
0
Answer link
सुतक म्हणजे काय:
सुतक हा हिंदू धर्मातील एक विधी आहे, जो कुटुंबातील सदस्य मरण पावल्यावर पाळला जातो. जेव्हा कुटुंबातील सदस्याचा जन्म होतो किंवा मृत्यू होतो, तेव्हा त्या कुटुंबाला काही काळासाठी धार्मिक कार्यांपासून दूर राहावे लागते. ह्या काळात, कुटुंबातील सदस्य स्वतःला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतात.
सुतकाचे नियम:
- सुतक काळात मंदिरात जाणे किंवा धार्मिक विधी करणे निषिद्ध मानले जाते.
- कुटुंबातील सदस्य साधे जीवन जगतात आणि शोक व्यक्त करतात.
- काही ठिकाणी सुतक संपल्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: