Topic icon

धार्मिक_रीती

1
❓ *लहान मुलांचं बोरन्हाण का करतात?


🔹मकरसंक्रांती आली की, लहानमुलांची बोरन्हाण सुरु होतात. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांतीला किंवा करीदिनी हे केलं जातं.

🔹बोरन्हाण हा धार्मिक संस्कार म्हटला जात असला तरी यामागे शास्त्रीय कारणही आहे.

🔹बोरन्हाण करताना मुरमुरे, बत्ताशे, बोर, तिळाचा हलवा, रेवड्या, हरभरा, चॉकलेट, गोळ्या टाकल्या जातात.

🔹लहान मुलांना काळे कपडे, हलव्याचे दागिने घातले जातात.

🔹याकाळात ऋतूत बरेच बदल होतात, मुलं आजारी पडण्याची शक्यता असते.

🔹त्यामुळे काळे कपडे गरम असतात. शिवाय हलवा हे हिवाळ्यात खाणं आरोग्यासाठी आवश्यक असतात.

🔹शिवाय बोरं, हरभरे, लाह्या, बत्ताशे, रेवड्या हे पदार्थ यानिमित्त मुलं खातात.
उत्तर लिहिले · 15/1/2023
कर्म · 569225
4

जावळविधी हा हिंदू धर्माच्या सोळा संस्कारांपैकी एक आहे. त्याला मुंडनविधी असेही म्हणतात. बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस अपवित्र मानले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात.

भारतात जावळविधीची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. जावळ काढण्यामुळे केसांच्या नैसर्गिक रचनेत फारसा बदल होत नाही. केसांचा पोत हा अनुवंशिक असतो. सकस आहाराने मुलांचे केस अधिक मजबूत होऊ शकतात. जावळ काढले जात असताना काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नवजात बाळाचे डोके नाजूक असते. त्यामुळे जावळ काढण्याची घाई करू नये. बाळाचे जावळ शक्यतो सकाळच्या वेळात काढावे. त्यावेळी बाळ ताजेतवाने असते. त्यामुळे रडारड करत नाही. बाळाचे जावळ काढण्यासाठी शक्यतो ट्रिमरचा वापर करावा; धारदार कैचीचा किंवा वस्तऱ्याचा बाळाला त्रास होऊ शकतो. जावळ काढताना बाळाचे लक्ष खेळण्यामध्ये गुंतवावे. बाळाचे डोके नीट व घट्ट पकडावे, जेणेकरून बाळ जास्त हालचाल करणार नाही. त्यामुळे जखम होण्याची शक्यता उणावते. बाळाच्या डोक्याला जावळ काढल्यानंतर खाज सुटते. ते टाळण्यासाठी बाळाला डोक्यावरून अंघोळ घालून सौम्य मॉइश्चरायझर लावावे. तसेच, बाळाच्या टाळूवर तेलाने हलका मसाज केल्यास उत्तम.

मुलाचे केस काढले जातात व मुलींचे राखले जातात, त्याचे स्पष्टीकरण हिंदू धर्मपंरपरेनुसार गूढ रीत्या देण्यात येते.

बालकाच्या डोक्यावरील त्वचा संवेदनशील असते. केस काढल्यामुळे त्वचेचा वातावरणाशी सरळ संपर्क येतो. त्यामुळे वातावरणातील सात्त्विक ईश्वरी चैतन्याच्या लहरी सहस्रारचक्राद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रहण केल्या जातात. त्या लहरींच्या ग्रहणामुळे मन व बुद्धी यांची सात्त्विकता वाढीस लागते. त्यामुळे काळ्या शक्तीचा मन व बुद्धीवर परिणाम होत नाही. याउलट, बालिकांच्या टाळूचा मध्यभाग कोमल असल्यामुळे त्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता असते. त्या आक्रमणांपासून बालिकेचे संरक्षण करण्यात केसांचा वाटा मोठा असतो. त्यामुळे स्त्रियांचे जावळ केले जात नाही.

जावळ काढण्याच्या रीतिभाती प्रत्येक समाजानुसार बदलतात. बंजारा समाजात घरात दुसरे मूल जन्माला आले, की पहिल्या व दुसऱ्या असे दोघांचे जोडीने जावळ काढण्याची परंपरा आहे. बंजारा लोक त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात बालकांचे जावळ काढतात. काही बंजारा लोक मुलींचे सुद्धा जावळ उतरवतात. मुलाचे जावळ काढताना कुलदेवतेच्या मंदिरावर झेंडा चढवला जातो व देवीला बकरा बळी दिला जातो.

वीरशैव लिंगायत समाजात मुलगा व मुलगी, दोघांचाही जावळविधी केला जातो. कापलेल्या केसांवर कोणाचाही पाय पडणार नाही याची खबरदारी घेऊन ते विसर्जित केले जातात. जन्मापासून एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षापर्यंत केव्हाही सम मासात मुहूर्त पाहून जावळ काढले जाते. बाळाची टाळू भरण्यासाठी डोक्यावर तेल वापरतात. त्या तेलामुळे बाळाच्या डोक्यात खवडा (त्वचा रोग) होण्याची भीती असते. जावळ केल्यामुळे खवड्यापासून संरक्षण मिळते व नवीन येणाऱ्या केसांची वाढ घट्ट व जोमदार होते, असा समज आहे.

मराठा समाजात मामाच्या मांडीवर बाळाला बसवतात व आत्या खोबऱ्याच्या वाटीत किंवा पदरात जावळ झेलते. भाच्याचे जावळ केल्यावर आत्याला सोने देण्याची प्रथा आहे.

वारली जमातीत जावळ चार-पाच महिन्यांच्या मुलाचे काढले जाते. ते मामाने काढायचे असते. पावसाळ्यात जावळ काढले जात नाही.

कुंभारांमध्ये मुलाचे जावळ त्याच्या सव्वा वर्षाच्या आत मामाकडून काढतात, तर मुलीचे जावळ चांगला दिवस पाहून काढतात. मुलाचे जावळ काढताना बोकड कापून त्याच्या मटणाचे जेवण देण्याची प्रथा आहे. काही कुंभार कुटुंबे जावळ प्रसंगी गोड जेवण देतात. उदाहरणार्थ, लिंगायत कुंभार. कुंभार समाजात दोन-तीन महिन्यांनी न्हाव्याकडून मुलाचे जावळ काढून शेजाऱ्यांना काकवी वाटण्याची पद्धत होती. ती पद्धत कालबाह्य झाली आहे. मूल नवसाचे असेल तर बऱ्याचदा देवळात, गावाबाहेरील मंदिरात किंवा कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन जावळ काढतात. कुंभारांमध्ये बाळाचे जावळ तेराव्या महिन्यात न्हाव्याकडून काढण्याची व लहान मुलांना कडदोरा बांधण्याची पद्धत आढळते.

कोकणी लोकांमध्ये मुलाचे जावळ करताना शेंडी राखण्याची प्रथा आहे. जावळ करताना मुहूर्त सम मासात, उत्तरायणात सकाळच्या वेळी, विशिष्ट नक्षत्रांवर (पुनर्वसू, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, शततारका, हस्त, चित्रा, स्वाती), तर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी आणि पंचमी, षष्ठी, दशमी व त्रयोदशी या तिथींवर साधतात. जावळ केल्यानंतर डोक्यावर दुधाची जाड साय लावतात. काही ठिकाणी डोक्यावर चंदनदेखील लावले जाते. जावळविधीमुळे गार्भिक दोष निघून जातात असे मानले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी महाराणी राजसबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संभाजी राजे (द्वितीय) यांचे जावळ प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते.

अग्रवाल समाजामध्ये सती मंदिरात मुलाचा जावळ विधी केला जातो. पुण्यात कात्रजजवळ ‘नारायणी धाम’ हे तसे सती मंदिर आहे. सिन्नरच्या सटवाई मंदिरात देखील जावळ काढण्याचा विधी केला जातो. पूजा करण्यासाठी बाळाची आई तिच्या केसांनी सटवाई देवीचा ओटा झाडते. देवीला दंडवत पाच वेळा घालते. जावळ बालजन्मानंतर साधारणत: सव्वा महिन्याने काढले जाते. केस कितीही मोठे झाले तरी त्याआधी ते कापत नाहीत.

जावळ करणाऱ्या न्हाव्याचा सन्मान करण्याची प्रथा सर्व समाजांत आहे. त्या तांदूळ, गहू, उडीद, तीळ, दक्षिणा, नारळ, विडा, सुपारी आणि तूप घातलेला भात, शर्टपीस अशा विविध वस्तू दान म्हणून दिल्या जातात.

जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त केले जाते तसेच त्याचबरोबर त्याचे मेंदू खूप वेगवान काम करते. (
का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?
जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?: आपल्या समाजात लहान मुलांचे जावळ करण्याची पद्धत प्रचलित आहे. मूल काही महिन्यांचे किंवा एक वर्षाचे झाले की त्याचे जावळ केले जाते. ही प्रथा बर्‍याच काळापासून चालू आहे. वास्तविक जावळ संस्कार हा हिंदू धर्मात वर्णन केलेल्या सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त केले जाते तसेच त्याचबरोबर त्याचे मेंदू खूप वेगवान काम करते. 

जाणून घ्या जावळ करण्याचे फायदे
1. असे मानले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयात असते तेव्हा बरेच हानिकारक बॅक्टेरिया त्याच्या डोके आणि केसांमध्ये जातात जे सहजपणे बाहेर पडत नाहीत. जन्माच्या वेळेस बाळाचे डोके अतिशय नाजूक असल्याने त्या वेळी त्याचे केस काढले जाऊ शकत नाहीत. वयाच्या एक वर्षाच्या आसपास, त्याचे डोके टणक होते. म्हणूनच, वयाच्या एक वर्षानंतर किंवा मुलाचे जावळ झाल्यानंतर, त्याची अशुद्धता काढून टाकली जाते.


2. असेही मानले जाते की मुलाचे जावळ केल्यामुळे डोक्याचे तापमान नियंत्रित राहते. जावळमुळे बाळाला थेट व्हिटॅमिन डी मिळते. अशावेळी त्याचा मेंदू खूप वेगवान काम करतो. यामुळे मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रकारे होतो. याच कारणामुळे प्राचीन काळी मुलांना गुरुकुलमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवले जात होते तेव्हा त्यांचे केस
 काढून टाकले जात होते.

3. जर आपण आपल्या घरातील एखाद्या सदस्यास विचारले जावळ का केले जाते तर केस चांगले येतात असे बहुतेक उत्तर मिळेल. हे बर्‍याच प्रमाणात सत्य देखील आहे कारण बाळाला जन्मताच जे केस मिळतात ते खूप कमकुवत आणि हलके असतात. जावळ केल्यावर केसांची वाढ चांगली होते आणि मजबूत केस बाहेर येतात. हेच कारण आहे की केसांची वाढ सुधारण्यासाठी काही लोक अनेक वेळा केसांचे मुंडन करतात.

4. जावळ केल्याने मुलाला खाज सुटणे, फोड येणे आणि डोक्यात येणाऱ्या पुरळपासून देखील संरक्षण मिळते. बर्‍याच ठिकाणी जावळ दरम्यान, डोक्याच्या मध्यभागी एक छोटीसी शेंडी सोडली जाते, जी मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. (

उत्तर लिहिले · 6/10/2021
कर्म · 121765
21
सुतक ही हिंदु धर्मातली एक प्रथा आहे. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात .ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच सोयर किंवा अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ.

सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर १ ते १३ दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे, गृह्यसूत्रे अशा विविध ग्रंथांत याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे. वस्तुत: ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध नव्हती, त्याकाळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी. सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुनः आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता.

सुतक कसे पाळावे
नियमसंपादन करासुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये,कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.अत्तर किंवा सेंट वापरू नये,नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्‍यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणार्‍याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपरने घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभार्‍यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरने तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.

खलील लोकांचे सुतक नसतेसंपादन करामरणाच्या इच्छेने खूप उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, टांगून घेऊन ( फाशी घेऊन ), पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत असता - आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नाही. गुरुहत्या करणारा वगैरे अशाप्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, निच कर्म करणारे, पितृकर्म जे करत नाहीत अशाकडे जेवणसुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये. शास्त्राचा उद्देश सर्वांनी नियमात, चांगले वागावे असा असावा म्हणूनच असे कडक नियम केले असावेत.

आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण .....
उत्तर लिहिले · 30/5/2018
कर्म · 5350
4
      🌐सासनकाठी मिरवणुक 🌐

रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हाकरवीरनिवासनी श्रीमहालक्ष्मीनेकेदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हामहालक्ष्मीव चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव- त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथचैत्रपौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.चैत्र यात्रेतगुलाल-खोबरे, बंदी नाणीयांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात.हलगी, पिपाणी,तुतारी,सनईच्यातालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्तसंत नावजीनाथच्याकिवळकाठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनामपाडळी(जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज),कसबा सांगाव(ता.कागल),किवळ(जि.सातारा), कवठेएकंद (जि.सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीसप्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्तसंत नावजीनाथकिवळ(जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी वजमदग्नीयांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.