संस्कृती धार्मिक_रीती

जोतिबा देवाला सासन काठी का खेळवतात?

2 उत्तरे
2 answers

जोतिबा देवाला सासन काठी का खेळवतात?

4
      🌐सासनकाठी मिरवणुक 🌐

रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हाकरवीरनिवासनी श्रीमहालक्ष्मीनेकेदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हामहालक्ष्मीव चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव- त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथचैत्रपौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.चैत्र यात्रेतगुलाल-खोबरे, बंदी नाणीयांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात.हलगी, पिपाणी,तुतारी,सनईच्यातालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्तसंत नावजीनाथच्याकिवळकाठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनामपाडळी(जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज),कसबा सांगाव(ता.कागल),किवळ(जि.सातारा), कवठेएकंद (जि.सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीसप्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्तसंत नावजीनाथकिवळ(जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी वजमदग्नीयांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.
0
जोतिबा देवाला सासन काठी खेळवण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • परंपरा आणि इतिहास: सासन काठी खेळवण्याची परंपरा फार जुनी आहे. असे मानले जाते की, पूर्वी जेव्हा यात्रा सुरू व्हायची, तेव्हा सासन काठी ही एकप्रकारे Perambulatory ध्वज म्हणून वापरली जायची.
  • देवता आणि भक्त यांचेconnection: सासन काठी हे देवतेचे प्रतीक मानले जाते आणि भक्त ती काठी नाचवून देवाला आदर व्यक्त करतात.
  • एकतेचे प्रतीक: सासन काठी खेळवताना अनेक लोक एकत्र येतात, त्यामुळे Desha आणि लोकांमध्ये एकोपा वाढतो.
  • मनोरंजन आणि उत्साह: सासन काठीचा खेळ हा मनोरंजनाचा एक भाग आहे. यामुळे लोकांना आनंद मिळतो आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
  • धार्मिक महत्त्व: काही लोकांचे असे मानणे आहे की, सासन काठी फिरवल्याने Deshaवरील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
या परंपरेमागे श्रद्धा, इतिहास आणि Samajaik एकोपा या भावना आहेत. अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
  1. लोकमत - link
  2. महाराष्ट्र टाइम्स - link
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5060

Related Questions

लहान मुलांचे बोरन्हाण का करतात?
जावळ का काढतात आणि ते कधी काढले पाहिजे?
सुतक म्हणजे काय?