3 उत्तरे
3 answers

तंत्रज्ञान म्हणजे काय?

24
तंत्रज्ञान म्हणजे काय?? 👇👇

1) "तंत्रज्ञान" म्हणजे मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग होय.

2) तंत्रज्ञान हे विज्ञानातून आकारास येते.

3) मानवी जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानातील ज्ञानाच्या आधारे जेव्हा विविध साधनांची निर्मिती केली जाते, तेव्हा तंत्रज्ञानाचा उदय होतो.

4) विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे व यंत्रांचे ज्ञान म्हणजे  "तंत्रज्ञान" होय.

5) वाफेच्या शक्तीचा शोध हे विज्ञान होय, तर त्या शक्तीचा उपयोग करून तयार केलेले रेल्वे इंजिन म्हणजे "तंत्रज्ञान" होय.... 😊
उत्तर लिहिले · 30/5/2018
कर्म · 77165
6
तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत.

अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचाशोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे.
तंत्रज्ञान विकसनामुळे केल्याने मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.
उत्तर लिहिले · 30/5/2018
कर्म · 123540
0

तंत्रज्ञान (Technology) म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवनातील समस्यांवर उपाय शोधणे आणि जीवन सुकर बनवणे होय.

हे ज्ञान, कौशल्ये, पद्धती आणि प्रक्रिया यांचा वापर करून वस्तू आणि सेवा तयार करते.

तंत्रज्ञानामुळे मानवाच्या गरजा पूर्ण होतात आणि जीवनशैली अधिक सोयीस्कर होते.

उदाहरणार्थ:

  • मोबाइल फोन
  • संगणक (कम्प्युटर)
  • इंटरनेट
  • कृषी उपकरणे
  • औद्योगिक मशिनरी

तंत्रज्ञानाचा विकास सतत चालू असतो आणि त्यामुळे जीवनशैलीत झपाट्याने बदल होतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

ब्रिटानिका - तंत्रज्ञान (इंग्रजी)
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?
वाड्मयीन म्हणजे काय?
गृहव्यवस्थापन व्याख्या लिहा?