3 उत्तरे
3 answers

एकत्रीकरण कसे झाले ते कसे शोधावे?

7
       बहुंताश भागात ब्रिटिश काळात जमिनीची मोजणी होऊन जमाबंदी झाली आहे. नागरीकरण, जमिनीची वाटणी,खरेदी विक्रिचे व्यवहार,अशा अनेक कारणाने जमिनीचे छोटया-छोटया तुकडयांमध्ये विभाजन झाले आहे त्यामुळे  शेती करणे आवघड झाले.  शेती करणे अर्थिकदृष्टया परवडेना. यातच महाराष्ट्र सरकारने धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे महाराष्ट्रात एकत्रिकरण योजना राबवण्याचा. या योजनेप्रमाणे महाराष्ट्रात एकत्रिकरण योजना राबवण्यात आली. परंतु एकत्रिकरण योजना राबवत असतांना मोठया प्रमाणात चुका झालेल्या दिसुन येतात.
      ज्या गावात एकत्रिकरण योजना राबवण्यात आली अशा गावातील जमिनीचे अभिलेखात एकत्रिकरण योजनेप्रमाणे अभिलेख तयार करुन त्यांचा अंमल घेण्यात आला. ज्या गावात एकत्रिकरण योजनेचा अंमल झाला. अशा गावाच्या अभिलेखात ९(३),९(४) म्हणजे  गटस्किम योजना, एकत्रिकरण योजनेप्रमाणे गटबुक नकाशे,एकत्रिकरण योजनेप्रमाणे गावनकाशे,हस्तकेच नकाशे ईत्यादी अभिलेख असतात. तसेच अभिलेखात एकत्रिकरण योजना राबवितांना गावपातळीवर प्रत्यक्ष जागेवर जाब-जबाब, पंचनामा ई. दस्तऐवज तसेच एकत्रिकरणांच्या धारीका असतात.
       ज्या गावात एकत्रिकरण योजना राबवण्यात अाली येते त्याप्रमाणे त्यांचा अंमल घेण्यात येतो.व त्याप्रमाणे पुढे वेळोवेळी होणा-या बदलाप्रमाणे   record update केले जाते.
आपणास  एकत्रिकरण योजना कशी झाली याबाबत माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळवता येईल.
उत्तर लिहिले · 1/6/2018
कर्म · 1975
0
एकत्रीकरण कसले आहे? जमीन एकत्रीकरण (गटस्किम) असेल, तर ते १९६७ या वर्षात झाले आहे.
उत्तर लिहिले · 30/5/2018
कर्म · 10555
0

एकात्रीकरण (Aggregation) कसे झाले हे शोधण्यासाठी काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे:

१. डेटा स्रोत (Data Source):
  • डेटा कुठून आला आहे हे तपासा. डेटाबेस, स्प्रेडशीट, किंवा इतर कोणत्या स्त्रोतांकडून डेटा घेण्यात आला आहे हे समजून घ्या.
२. रूपांतरण नियम (Transformation Rules):
  • डेटा ॲग्रीगेट करताना कोणते नियम वापरले गेले, जसे की सरासरी (Average), बेरीज (Sum), Count, Min, Max इत्यादी.
३. फिल्टर आणि गट (Filters and Groups):
  • डेटा ॲग्रीगेट करताना काही विशिष्ट फिल्टर लावले होते का? उदा. विशिष्ट वेळेनुसार, विशिष्ट क्षेत्रानुसार.
  • डेटा कशाच्या आधारावर गट (Group) केला गेला. उदा. शहर, उत्पादन, किंवा अन्य श्रेणी.
४. क्वेरी आणि कोड (Query and Code):
  • डेटाबेस क्वेरी (SQL) किंवा प्रोग्रामिंग कोड (उदा. पायथन, R) वापरला असल्यास, तो कोड तपासा. त्यात ॲग्रीगेशन लॉजिक स्पष्टपणे नमूद केलेले असते.
५. आऊटपुट पडताळणी (Output Verification):
  • ॲग्रीगेटेड डेटाच्या आऊटपुटची पडताळणी करा. काही नमुने निवडा आणि त्यांची गणना (Calculation) मूळ डेटामध्ये तपासून बघा.

या माहितीच्या आधारे, तुम्हाला डेटाचे ॲग्रीगेशन कसे झाले हे समजेल.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2220

Related Questions

सीखो ॲप विषयी माहिती हवी आहे?
फ्रीलान्स युट्युब क्रिएटर?
मोबाईलवर कॉल कॉन्फरन्स कसा करावा?
घराचा उतारा (8अ) ऑनलाइन मिळेल का व कसा?
सॅटेलाईट म्हणजे काय?
माझे आवास प्लस 2024 ह्या ॲपवर सर्वे करण्यास अडचणी येत आहे आणि त्यावर माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींचे आधार नॉट व्हेरीफाईड असे काही प्रॉब्लेम येत आहे, तर मी काय करू शकतो?
घरकुल सर्वे करण्याकरिता फक्त आवास प्लस 2024 ह्या ॲप व्यतिरिक्त दुसरे कोणतेही ॲप नाही का व त्यासाठी काय करावे लागेल?