शिक्षण निबंध लेखन कौशल्ये

निबंध लेखनाची तंत्रे स्पष्ट करा?

3 उत्तरे
3 answers

निबंध लेखनाची तंत्रे स्पष्ट करा?

2
बरेच जण निबंधाचा विषय सांगितला तिकडे एका पुस्तकाचा आधार घेतात यात वाईट असे काहीच नाही. पण निबंधाचा लेखनाचा हेतू काय असतो ? तुमच्या मधली कल्पनाशक्ती विचार शक्ती हे विस्तृत झाली पाहिजेत म्हणून निबंध लेखनाचा स्वतः सराव करणे आवश्यक आहे. आपल्या ब्लॉगवर भरपूर निबंध प्रकाशित झाली आपण अभ्यासली सुद्धा असेल. पण नेमकं निबंध कसा लिहायचा हाच आपला विषय आहे.  जेणेकरून तुम्ही स्वतःहून परीक्षेमध्ये जर एखादा  नवीन विषयाला आणि त्याबद्दल तुम्हाला वेळ प्रसंगी लिखाण करण्याची गरज पडली तर तुम्ही कमी वेळात मुद्देसूदपणे लिखाण कराल याकरता आम्ही तुम्हाला निबंध लेखनाबद्दल च्या काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

.
निबंधलेखन म्हणजेच दिलेल्या विषयावर सुसंगतपणे, सुवोध व आकर्षक भाषेत विचारांची मांडणी करणे . आपले विचार प्रगल्भ असावे लागतात . त्यासाठी वाचन व चिंतन हे महत्वाचे आहे . विचारलेल्या निबंध विषयावर आपल्याला खूप विचार सुचले तरी त्यातले योग्य व जरूरीचे विचार एकत्र करून त्यातले मुद्दे मनाशी ठरवून त्या मुद्दयांचे विवेचन करणे आवश्यक आसते . 


निबंध लेखनाच्या कलेचा अभ्यास कसा करावा हे सांगणारे तंत्रे


वाचन, श्रवण , निरीक्षण, आणि मनन किंवा चिंतन'.


१) वाचन : विदयार्थ्यांना वाचनाची गोडी लागली पाहिजे . त्यासाठी चांगली निवडक पुस्तके वाचावीत. 'साने गुरुजींच्या गोड गोष्टी वाचा . लो टिळक, म. गांधी , पं नेहरू यांची चरित्रे ह . ना. आपटे ,नाथ माधव , रणजीत देसाई यांच्या ऐतिहासिक कादंब-या ना . सि . फडके, वि .स .खांडेकर

अनंत काणेकर यांचे लघुनिबंध शंकर पाटील , द. मा. मिरासदार यांच्या कथा वाचाव्यात .

रोजची वर्तमनपत्रे , मासिके वचावीत . त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल . केवळ गोष्टीचीच पुस्तके न वाचता त्या त्या वयोमानानुसार योग्य अशी चरित्रे वाचावीत.


वाचनाची दोन अंगे : १. मुकवाचन २. प्रकटवाचन 


१. मुकवाचन :  'मुकवाचनामुळे अनेक गोष्टी साधता येतात . नवीन ज्ञान मिळवता येते . विचारशक्तीला चालना मिळते . बुद्धीला धार येते . नाविन्याची  गोडी लागते  वाहय जगाचा मागोवा घेता येतो .


२.प्रकटवाचन :

 प्रकटवाचनामुळे कुठे थांबावे, विरामचिन्हांचा उपयोग कसा करावा, शब्दफेक कशी करावी , वाचन करतांना शब्दातून भावना कशा व्यक्त कराव्यात . या सर्व गोष्टी शिकता येतात . उच्चार , भाषाशुद्धता साधता येते. वाचन सहेतुक  समजून उमजून करावयाचे असते . 


२.लेखन :


'जात्यावर बसले की ओवी सुचते'. हे खरे असले तरी तयारी न करता लेखन करणे हे धाडसाचे,

अविचाराचे व हास्यास्पद ठरते . लेखनाचे टाचण किंवा टिपण तयार करणे, मुद्देसुद विचार मांडणे प्रारंभ , मध्य ,समारोप यांचा सांगोपांग विचार करणे आवश्यक आहे . लेखनाच्या सरावामुळे कल्पकतेला वाव मिळतो. 

लेखनाची त्रिसुत्री १. प्रारंभ - आकर्षक प्रारंभ वाचकाचे लक्ष वेधून घेतो . 

२)  मध्य - वाचकाच्या मनाच्या गाभ्यात प्रवेश करतो . 

३). समारोपकायमचा ठसा वाचकावर उमठवतो.


३.श्रवण : हल्ली घराघरात टी . व्ही . असतोच . त्यावर चांगले कार्यकम असतात . शालेय कार्यकम विविध नेत्यांची भाषणे, शृतिका , पु. ल. देशपांडे , व . पु. काळे , शं. ना. नवरे यांच्या कथा ऐकाव्यात उत्तम निबंधकार हा उत्तम श्रोता असावा लागतो . ' 'दिसामाजी प्रत्येकाने काहीतरी लिहित जावे वाचावे व - ऐकावे हे खरे' त्यामुळे व्यक्तिमत्व खुलते फुलते घडते .


४. निरीक्षण :  'शाळेतील लहान मोठया सहलीत भाग घ्या . निसर्ग देखावे 'डोंगर रांगा नदया आकाशातील वदलते रंग फुलांचे गंध रंग यांचे निरीक्षण करा. ' आपल्या आजुबाजुच्या माणसांचे वावरणे कुणाचा चेहरा कुणाचे हसणे बोलणे चालणे कुणाचा पोशाख रूवाब यातील वेगळेपण पहा . 'दुरदर्शनवरील कार्यकम संवाद परिषदा इ.चे बारकाईने निरीक्षण करा


५. चिंतन किवा मनन  : वाचन श्रवण निरीक्षण यावर चिंतन किंवा मनन हवेच . 'नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी स्थिती होईल . आपण काय वाचले ? काय ऐकले ? काय पाहिले ? त्याचे स्वरूप काय ? ते आपल्याला थोडक्यात सांगता येईल का ? दोन तासांनी ते आपल्याला आठवते का? दोन आठवड्यांनी ते लक्षात राहते का?


उत्तर लिहिले · 9/6/2022
कर्म · 3940
0
निबंधलेखन तंत्रे स्पष्ट करा.
उत्तर लिहिले · 9/6/2022
कर्म · 20
0

निबंध लेखनाची काही तंत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  1. विषयाची निवड: सर्वात आधी तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध लिहायचा आहे, तो विषय निवडा. विषय निवडताना तुम्हाला त्या विषयाची माहिती आहे की नाही हे तपासा.
  2. माहिती गोळा करणे: विषय निवडल्यानंतर त्या विषयासंबंधी माहिती गोळा करा. तुम्ही पुस्तके, इंटरनेट, लेख आणि इतर स्त्रोतांचा वापर करू शकता.
  3. रूपरेषा तयार करणे: माहिती गोळा केल्यानंतर निबंधाची रूपरेषा तयार करा. रूपरेषेमध्ये प्रस्तावना, मध्य भाग आणि निष्कर्ष असा क्रम असावा.
  4. प्रस्तावना: प्रस्तावना आकर्षक असावी. वाचकाला निबंध वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. विषयाची ओळख करून द्या.
  5. मध्य भाग: मध्य भागामध्ये विषयाची सविस्तर माहिती द्या. माहिती मुद्देसूद मांडा.
  6. निष्कर्ष: निष्कर्षामध्ये निबंधाचा सार सांगा. वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करा.
  7. भाषा: निबंधाची भाषा सोपी आणि स्पष्ट असावी. व्याकरण आणि वाक्यरचना अचूक असावी.
  8. शैली: निबंध लिहिण्याची शैली वैयक्तिक असू शकते, परंतु ती वाचकाला आवडणारी असावी.
  9. पुनरावलोकन: निबंध लिहून झाल्यावर तो पुन्हा वाचा. चुका शोधा आणि त्या दुरुस्त करा.
  10. उदाहरण:

    विषय: 'वृक्षारोपण'

    • प्रस्तावना: वृक्षारोपणाचे महत्त्व
    • मध्य भाग:
      • वृक्षारोपणाचे फायदे
      • वृक्षारोपण कसे करावे
      • वृक्षारोपणातील समस्या
    • निष्कर्ष: वृक्षारोपणाचे भविष्य

टीप: निबंध लिहिताना विषयाला धरून लिहा. विषयांतर करू नका.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

लेखणाचि पाथमिक कौशले नमूद करा?
विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे?
लेखन गतिमान न होण्याची कारणे लिहा?
लेखनाची प्राथमिक कौशल्ये नमूद करा, शंभर ते दीडशे शब्दांमध्ये?
लेखनची प्राथमिक कौष्यल्या नमूद करा?
लेखन करताना येणाऱ्या अडचणी?
लेखनाची प्राथमिक कौशल्य नमुद करा.?