शिक्षण लेखन कौशल्ये

लेखन गतिमान न होण्याची कारणे लिहा?

2 उत्तरे
2 answers

लेखन गतिमान न होण्याची कारणे लिहा?

0
अभ्यासाने प्रकट व्हावे लागते...मग वाचन संस्कृती सुसंगत असावी.  
लेखन सेवा निर्मल हवी. ते गतिमान कधी होईल ज्यावेळी तुमच्या ठायी विषयानुरूप मोठा खजिना असेल .
यासाठी एकाग्रता एकरूपता सहजता प्रसंगानुरूप शब्द ब्रम्ह आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून सादर व्हायला पाहिजेत.
लेखन करताना मन मोकळं खुलं करून शब्द अवतरण होऊ लागतात तेव्हा मांडणी सुसुत्रता सुसंगत रहावी . यासाठी चिंतन अभ्यास चिरंतन सुरू पाहिजे. मनाचे डोळे, बुद्धी चे कान करावेत. तरच लेखणी वाणी गतिमान राहते . यासाठी मन सुंदर निखळ चोखंदळ निरागस निर्मळ असावे.ज्याचं मन सुंदर त्यांचे लेखन सुंदर ..हा विश्वास स्थिरमन दृढतेनं येतो .

मन नमले की, नाम मनात ठसते ..मना सज्जना भक्ति पंथेची जावे तरी श्री हरी पावेजेतो स्वभावे ...मनाला एकाग्रता एकरसी एकजीवी ठसली की, चिंतन चिरंतन सत्य प्रेम आनंद प्रसन्नता मिळते. आणि जीवन जगण्याचा दृष्टिकोन एक तत्व, एक ध्यान, एक ध्यास, एक प्यास, एक नजर, एक लगन बनते.यासाठी वाचन ,लेखन ,चिंतन ,मनन करणे हा शकुन सुंदर आविष्कार प्रकटन होते.अंतर्मुख होऊन प्रेम प्रेरणा मिळाली की वाणी उच्चार एक तत्व दृढ धरी मना चे बोल उमटतात. यासाठी समर्पित भावनेने चिंतनाची आवड गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात माहीर होते.
अनेक संतवचने गुरूवचने अगर त्यांचे बोल माणसाला माणूस बनविण्यासाठी सतत कार्यरत असतात. निसर्ग पशुपक्षी कीटक झाडे वनस्पती पाणी हवा अग्नी भूमी विविध माध्यमांतून आपणास शिकायला मिळतं...डोळे कान मन मेंदू मनगट मजबूत असावे . खानपान आहार सात्विक असावा.दैंनंदिनी ठरलेली असावी, ती  सुच्चारूपणे शिस्तीत नियमित कार्यप्रवण करणारी असावी. आपणांसाठी प्रभुपरमात्माने या भूतलावर भरभरून दिलं आहे , जो देतो तो देव घेणारा माणूस आहे . देवघेवीत आपण विवेकी राहिलं पाहिजे कारण माणसाचे कर्म संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत असते.
या पार्श्वभूमीवर आपण आपले तेणें कृतकार्य करणे आवश्यक आहे. आपली ओळख समाजपटलावर ठेवावी लागेल आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी. हां यासाठी लेखन सुंदर आविष्कार प्रकटन झाले तरच माणसाचे जीवन सफल होईल... धन्यवाद जी 
उत्तर लिहिले · 28/5/2024
कर्म · 475
0

लेखन गतिमान न होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. पुरेसा सराव नसणे:

  • नियमितपणे न लिहील्यास लेखनाचा वेग कमी होतो.
  • सरावाने लेखन कौशल्ये सुधारतात आणि गती वाढते.

2. विषयाची पुरेशी माहिती नसणे:

  • ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याची माहिती नसल्यास विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.
  • त्यामुळे लिहिताना अडथळे येतात आणि वेळ लागतो.

3. व्याकरणाचे अज्ञान:

  • व्याकरण आणि भाषेच्या नियमांUncertainty मुळे वाक्यरचना करताना अडचणी येतात.
  • त्यामुळे लेखन गती मंदावते.

4. आत्मविश्वास नसणे:

  • स्वतःच्या लेखन क्षमतेवर विश्वास नसल्यास लिहिताना संकोच वाटतो.
  • नकारात्मक विचार लेखनाच्या गतीवर परिणाम करतात.

5. distractions (लक्ष विचलित करणे):

  • आजूबाजूला distractions असल्यास लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
  • त्यामुळे लिहिताना वारंवार थांबावे लागते आणि गती कमी होते.

6. तंत्रज्ञानाचा अभाव:

  • टाइपिंगचा वेग कमी असल्यास लिखाणाला जास्त वेळ लागतो.
  • चांगले keyboard आणि writing tools वापरल्यास गती वाढू शकते.

7. शारीरिक आणि मानसिक थकवा:

  • थकल्यामुळे किंवा तणावाखाली असल्यास लेखन गती कमी होते.
  • मन आणि शरीर ताजेतवाने असणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1680

Related Questions

लेखणाचि पाथमिक कौशले नमूद करा?
विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे?
लेखनाची प्राथमिक कौशल्ये नमूद करा, शंभर ते दीडशे शब्दांमध्ये?
लेखनची प्राथमिक कौष्यल्या नमूद करा?
लेखन करताना येणाऱ्या अडचणी?
लेखनाची प्राथमिक कौशल्य नमुद करा.?
लेखनाचे प्राथमिक कौशल्ये नमूद करा?