झोप घरगुती उपाय आरोग्य

झोप येण्यासाठी काय उपाय करावे?

4 उत्तरे
4 answers

झोप येण्यासाठी काय उपाय करावे?

2
प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे.  जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

जायफळयुक्त दूध :

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे  सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.


निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका.  जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ  वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक असतो. 



१) दिवसा वामकुक्षी घेणे टाळा –

भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही  निरुत्साही रहाल .

२) रात्री भरपूर  खाणे टाळा –

चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता , त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे. रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते . म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे .

३) धुम्रपान व मद्यपान टाळा –

झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे  तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक  झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री  सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही . सिगारेटमधील  ‘निकोटीन’ सारख्या घटकामुळे झोपेचे चक्र बिघडते .




४) चहा / कॉफीचे सेवन टाळा –

चहा व  कॉफीत आढळणाऱ्या ‘ कॅफिन’ या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता . तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार मुत्रविसर्जनासाठी शौचालयात जाणे वाढते . त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा , कॉफी यासारखी पेय घेणे टाळा .

५) खूप पाणी पिऊ नका –

पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे हितावह आहे.  मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते .

६) झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर पडू नका –

झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर लोळणे हे बऱ्याच लोकांमध्ये  निद्रानाशाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आहे आहे . झोप येण्यापूर्वी बिछान्यावर पडताना मेंदूचे कार्य चालू असते . यामुळे अनेकांना अर्धवट झोप मिळते . म्हणून मेंदू थकल्यानंतर व  झोप आल्यावरच  बिछान्यावर झोपायला जा.

७) झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळा –

व्यायाम हा सकाळी उठल्यावरच करावा मात्र वेळेअभावी किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे  अनेकदा संध्याकाळी उशिरा व्यायाम केला जातो . यामुळे शरीराचे चलन वाढते व तीव्र निद्रानाश होण्याची शक्यता वाढते . म्हणूनच जर तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करावयाचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी करावा .

८) झोपेच्या गोळ्या घेऊ नका

निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्ती अनेकदा झोपेच्या गोळ्या घेण्याचा मार्ग स्वीकारतात.  मात्र याचा अतिवापर केल्याचे नैसर्गिकरित्या झोप येण्याचे प्रमाण कमी होते व त्यातील  औषधांचा आरोग्यावर  दूरगामी परिणाम होतो .

९) झोपण्यापूर्वी विचार/चिंता करणे टाळा

झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसणे , चिंता करत राहणे यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. तुमच्या मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी थोडा वेळ द्या. झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर चिंता व विचार करत बसणे टाळा .

१०) चुकीच्या स्थितीत झोपणे टाळा

पोटावर किंवा पाय पोटात घेऊन झोपणे टाळा , यामुळे तुमच्या अस्थिबंधनावर ( ligaments) ताण येउन तुमची झोप बिघडू शकते . सरळ पाठीवर किंवा गुडघ्याजवळ उशीचा आधार घेत एका कुशीवर झोपणे उत्तम !

उत्तर लिहिले · 19/5/2018
कर्म · 19415
0
झोप येण्यासाठी घरगुती उपाय
झोपण्याआधी पायांना स्वच्छ धुवावे, शक्य होईल तर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करावेत. यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करावी. झोपताना जास्त टाईट कपडे परिधान करू नये. शक्य होईल तेवढे कमी कपडे अंगावर ठेवावेत.
चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपाय, 


या लेखात सांगितलेले काही व्यायाम प्रकार, काही सवयी आणि आहारातले जिन्नस तुम्हाला नेहमी चांगली झोप येण्यासाठी उपयोगी पडतील, हे मी खात्रीने सांगू शकते.

आणि म्हणून झोप न येण्याचा त्रास असेल, तर तो आजारापर्यंत वाढू नये म्हणून हा लेख शेवट्पर्यंत वाचा.

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही.

काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही.

व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर सुद्धा दिसू लागतात.

पुरेशी झोप झाली नाही, तर आपले लक्ष सतत विचलित होत राहते ज्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो.

झोप पूर्ण न झाल्याने आपली भुकेची, कामाची व इतर शरीरधर्मांची वेळ सुद्धा नियमितपणे पाळली जात नाही ज्यामुळे पित्तासारखे आजार आपल्या मागे लागतात.

या लेखात आपल्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी सवयी, व्यायाम प्रकार आणि आहार कसा असावा हे जाणून घेऊ
१) ध्यानधारण करणे

झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान.

ध्यान म्हणजे काय तर एका जागेवर शांत बसून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून विचारहीन स्थितीत राहण्याचा प्रयत्न करणे.

दिवसातून दोनदा फक्त पंधरा मिनिटांसाठी मनापासून ध्यान केल्याने झोपेचे गणित व्यवस्थित बसते. सुरुवातीला हे रोज करणं कदाचित कठीणही वाटू शकतं, पण हा प्रयत्न एकदा नक्की करून बघा.

ध्यान आपण कधीही व कुठेही करू शकतो. त्यासाठी अमुक वेळ किंवा तमुक ठिकाण अशी काही आवश्यकता नसल्याने हा एकदम सोपा उपाय आहे.

नियमितपणे ध्यान करण्याचे अजून सुद्धा बरेच फायदे आहेत जसे की मनाची एकाग्रता वाढवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि स्ट्रेस, टेन्शन दूर होणे.

२) मंत्रोच्चार

दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो.

असे केल्याने आपोआप झोपेच्या वेळेस हे विचार मनात येणार नाहीत व शांत झोप लागायला मदत होईल.

मंत्रोच्चार हा कायम ओंकारचाच हवा किंवा धार्मिक हवा असेही काही नाही. आपल्याला आवडलेल्या कुठल्याही मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा अगदी आपल्याला आवडलेल्या, भावलेल्या एखाद्या वाक्याचाही आपण जप करू शकतो मग ते देव धर्माशी निगडित असायला हवेच किंवा मंत्रोच्चार करायची एकच ठरविक वेळ असावी असे काही नाही.

आपल्याला वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्यांदा आपण हे करू शकतो.

कोणत्यातरी मार्गाने मनात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून नकारात्मक विचारांना दूर लोटणे हे महत्वाचे.

३) योगासने करणे

योगाचे आपल्या शरीरावर आणि मनावर चांगले परिणाम होतात हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे.

नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो.

यासाठी आपण एखादा योगाचा क्लास लावू शकतो किंवा ऑनलाईन ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतो जेणेकरून आपल्याला नियमितपणे प्रॅक्टिस करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

झोपेचे तंत्र नीट बसवण्यासाठी योग साधना करायची असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की आसने अशी निवडली पाहिजेत ज्याच्यामुळे दमणूक न होता चित्त एकाग्र होईल.

चित्त एकाग्र होण्यासाठी बॅलन्सिंग आसने उत्तम ठरतात. गरुडासन, अर्धचंद्रासन, शीर्षासन ही आसनं चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही नक्की शिका आणि नियमितपणे करण्याचा सराव सुद्धा करा.

४) व्यायाम करणे

व्यायामाची आपल्या शरीराला गरज असतेच. वजन आटोक्यात राहणे, ह्रदयविकार किंवा मधुमेह अशा विकारांना आपल्यापासून चार हात लांब ठेवणे असे व्यायामाचे अनेक फायदे आहेत, पण याचबरोबर व्यायामाचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो.

व्यायाम आपण नेहमी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी करतो, पण व्यायामाने हार्मोनल बॅलन्स साधला जातो हे माहित आहे का? तणावमुक्ती साठी कार्टिसोल हे हार्मोन्स संतुलित असावे लागतात. जे व्यायामातून साध्य होते.

आता हा मुद्दा पटण्यासाठी शास्त्रीय प्रयोग वगैरे बाजूला ठेऊ आपण, पण आपला स्वतःचा अनुभव सुद्धा आपल्याला हेच सांगेल कि व्यायाम केल्या नंतर ताजे-तवाने वाटायला लागते आणि मुड सुद्धा फ्रेश होतो.

शिवाय दिवसातून किमान वीस मिनिटे सलग, दमण्याचा व्यायाम केल्याने आपला स्ट्रेस कमी होतो ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. शरीर दमल्याने सुद्धा शांत झोप लागण्यासाठी मदत होऊ शकते.

दमण्याच्या व्यायाम प्रकारात आपण जोरात चालणे, धावणे किंवा एखादा खेळ निवडू शकतो किंवा याचा कंटाळा असेल ते एरोबिक्स किंवा झुंबा असे प्रकार सुद्धा निवडू शकतो.

आपल्या तब्येतीला सूट होतील असे व्यायामप्रकार निवडून दिवसातून एकदा नित्यनियमाने ते केल्याने त्याचा आपल्याला फायदा होतो.

५) मसाज करणे

झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात.

ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

आपल्याला दरवेळेस प्रोफेशनल मसाज घ्यायला जमेल किंवा परवडेल असे नाही.

अशावेळेस आपण तेलाने घरच्याघरी आपल्यालाच मसाज करू शकतो किंवा आपल्या घरच्या लोकांकडून करवून घेऊ शकतो.

मसाज सुरु असताना आपण ध्यान करतो त्याप्रमाणे आपले मन एकाग्र करून विचारांना दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे.

मसाजसाठी तेल किंवा क्रीम निवडताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्या तेलाची किंवा क्रीमची आपल्याला ऍलर्जी नसावी.

अशावेळेला आपल्या हाताच्या एका छोट्या भागाला तेल किंवा क्रीम लावून आपण तपासू शकतो.

६) मॅग्नेशियम

आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जातच असतात. ह्यापैकी मॅग्नेशियम ह्या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते.

मॅग्नेशियम मुळे आपल्या शरीरातील स्नायू थोडे सैल पडतात आणि त्यामुळे आपल्याला झोप येण्यास मदत होते.

क्लीनिकल ट्रायल मध्ये हे सिद्ध झालं आहे की पुरुषांनी 400 मिलीग्रॅम डोस आणि स्त्रियांनी 300 मिलीग्रॅम डोस रोज घेतला तर त्यांची अनिद्रेची म्हणजेच ‘इंसोमनिया’ ची समस्या दूर होते.

पण ह्या मध्ये पोटदुखीचे त्रास सुरू होण्याचा धोका सुद्धा असतो. त्यामुळे हा डोस आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आणि निर्धारित प्रमाणातच घेणे योग्य आहे.

काजू, बदाम, केळी, पालक यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते.

त्यामुळे अनिद्रेचा आजार झाल्यावर डॉक्टरी सल्ल्याने मॅग्नेशियमचे डोस घेण्याची वेळ येण्याआधीच, नैसर्गिक पद्धतीने मॅग्नेशिअमचा आपल्या आहारात समावेश करणे कधीही चांगले, नाही का?

७) आवडते शांत संगीत ऐकणे

संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते.

संगीतामुळे आपले मन शांत होते, शरीर सैल होते त्यामुळे आपल्याला झोप यायला सुरुवात होते.

आपली आवडती शांत गाणी जर आपण झोपताना हळू आवाजात लावून ठेवली तर त्यामुळे आपल्याला हळूहळू झोप यायला सुरुवात होते. आपण आपल्या झोपेसाठी योग्य ठरतील अशी गाणी निवडून त्याची एक प्ले लिस्ट बनवून ठेवली पाहिजे.

८) अंघोळ करणे, रूम स्वच्छ ठेवणे

आपल्याला झोप लागत नसेल तर अशावेळी आपली शारीरिक स्वच्छता सुद्धा महत्वाची असते.

त्यामुळे झोपायच्या आधी छान अंघोळ केली तर त्यामुळे आपल्याला झोप येण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर आपला बेड स्वच्छ असणे, बेडशीट स्वच्छ असणे हे फार महत्वाचे आहे.

झोपण्याच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असलं तर झोप चांगली लागते. याचा अनुभव नक्की घेऊ बघा.

अस्वच्छतेमुळे आपल्या झोपेत अडथळा येऊ शकतो.

झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

पण जर आपल्याला हा त्रास जास्त वेळ होत असेल, आणि त्याचं रूपांतर आजारात होऊ लागलं, तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.

झोप ही आपल्यासाठी फार महत्वाची असते. आपल्या शरीराची दिवसभर होणारी झीज झोपेत भरून येते.

त्यामुळे पुरेशी झोप नसेल तर आपले आरोग्य निरोगी राहू शकत नाही.

त्यामुळे हा त्रास जर काही दिवसांपेक्षा जास्त झाला तर आपण त्यासाठी डॉक्टरची मदत घेणे गरजेचे असते. मात्र झोपेसाठी स्वतः कोणत्याही गोळ्या घेणे पूर्णपणे टाळावे कारण ह्या गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम असतात. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या झोपेसाठी घेऊ नयेत.

 
उत्तर लिहिले · 4/8/2021
कर्म · 121765
0

झोप न येणे ही एकcommon समस्या आहे. चांगली झोप येण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा:

दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि उठा. यामुळे तुमच्या शरीराची अंतर्गत घड्याळ नियमित राहते आणि झोप सुधारते.

2. आरामदायक वातावरण तयार करा:

तुमची बेडरूम शांत, अंधारी आणि थंड ठेवा. आरामदायक गादी आणि उशी वापरा.

3. झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळा:

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या उपकरणांमधून निघणाऱ्या blue lightमुळे झोप येण्यास त्रास होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीनचा वापर टाळा.
संकेतस्थळ: हार्वर्ड हेल्थ - ब्लू लाईट आणि झोप (इंग्रजी)

4. कॅफिन आणि अल्कोहोल टाळा:

झोपण्यापूर्वी काही तास आधी चहा, कॉफी आणि अल्कोहोल घेणे टाळा.

5. नियमित व्यायाम करा:

नियमित व्यायाम केल्याने झोप सुधारते, परंतु झोपण्यापूर्वी लगेच व्यायाम करणे टाळा.
संकेतस्थळ: स्लीप फाउंडेशन - व्यायाम आणि झोप (इंग्रजी)

6.relaxation techniques चा वापर करा:

झोपण्यापूर्वी meditation, deep breathing किंवा योगा केल्याने आराम मिळतो आणि झोप improve होते.

7. गरम पाण्याने स्नान करा:

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर relax होते आणि झोप चांगली येते.

8. रात्री हलका आहार घ्या:

रात्री जड जेवण करणे टाळा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?