4 उत्तरे
4
answers
प्रेम कसे व्यक्त करायचे?
6
Answer link
प्रेम पाहिजे तस व्यक्त कर, अगदी तुझ्या मनाला वाटत असेल तस कर... पण मी एक तुला नक्की सांगेन, प्रेम व्यक्त करण्यासाठी जर का उशीर केला तर मग विसरून जा. आजकाल वेळ खूप महत्वाचं आहे भावा.... दुनिया खूप फास्ट आहे, उशीर करू नको तिला विचारायला.
3
Answer link
सुरवातीला माणूस जेव्हा प्रेम करायला लागतो तेव्हा ते एकतर्फीच असते. प्रेमाची व्याख्या कोणिही सांगू शकत नाही. ते कसेही होऊ शकते. असे असले तरिही मूळ प्रश्न राहतोच प्रेम कसे करावे. आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होईल का कधीतरी असा आपण विचार करत असतो. पण ते प्रेम व्यक्त करायला नेहमी घाबरत असतो. ती नाही म्हणाली तर त्यामुळे विचारण्याच नेहमी आपण टाळत असतो. तरीही आपण प्रेम करत असतो. कधी कधी विचार करतो आयुष्य हे एकदाच मिळत असत त्या आयुष्यात तीचीही आपल्याला साथ हवी. पण आपण विसरत असतो तीलाही आयुष्य एकदाच मिळत असत. कधीतरी तिच्यासमोर आपले प्रेम आपण व्यक्त करतो होकार मिळाला तर पाच सहा दिवस हवेत उडत असतो नकार मिळाला पाच सहा दिवस दाढी वाढवून, मौन बाळगून मिळालेल्या नकाराचा निषेध व्यक्त करत असतो. तरिही आपण प्रेम करत असतोच . असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे चुकीचे आहे कारण दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे. प्रेमी युगुलाला पाहून आपण मनातल्या मनात जळतो त्यातूनच मग कविता,चारोळ्या,गझल लिहू लागतो आणि आपले प्रेम प्रकट करत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मग ती कशी माझ्याविना जगते तेव्हा आपण विसरत असतो तिलाही आयुष्य आहे विचार आहे. कधी कधी जीव धावासा वाटतो तर का फक्त एका नकारामूळे .अश्या वेळी आपल्यावर जिव असलेल्या आई ,बापाचा,नातेवाईकांचाही आपल्याला विसर पडतो ह्यालाच का आपण प्रेमाची विलक्षण ताकद म्हणतो. म्हणूनच वाटते की प्रेम कसे करावे या प्रश्नाचे उत्तरे शेवटी अनुत्तरीतच राहतो.
0
Answer link
प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि ते तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, तुमच्या नात्यावर आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते.
verbal (शाब्दिक)
- 'मी तुझ्यावर प्रेम करतो/करते' असे सांगा: हे सरळ आणि प्रभावी आहे.
- compliments (स्तुती करा): त्या व्यक्तीच्या दिसण्याची, स्वभावाची किंवा त्यांनी केलेल्या कामाची स्तुती करा.
- appreciation (कौतुक करा): तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीचे काय महत्त्व आहे हे सांगा.
- listening (लक्षपूर्वक ऐका): जेव्हा ती व्यक्ती बोलते, तेव्हा लक्ष देऊन ऐका आणि त्यांना समजून घ्या.
Non-verbal (गैर-शाब्दिक)
- physical touch (शारीरिक स्पर्श):example-hand holding, hugs
- gifts (भेटवस्तू): विचारपूर्वक भेटवस्तू द्या.
- quality time (वेळ द्या): त्या व्यक्तीसोबत वेळ घालवा.
- acts of service (मदत करा): त्या व्यक्तीला मदत करा.
- eye contact (डोळ्याने संपर्क साधा): बोलताना डोळ्यांमध्ये बघा.
इतर मार्ग:
- त्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करा.
- त्या व्यक्तीला surprise द्या.
- त्या व्यक्तीला date वर घेऊन जा.
- त्या व्यक्तीसोबत picture काढा आणि social media वर share करा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेम प्रामाणिकपणे व्यक्त करा. दिखावा करू नका.