पशुपालन घरगुती उपाय पशुसंवर्धन परोपजीवी

जर आपल्याला गोठ्यातील गोचीड कमी करायचे असतील, तर ते कसे कमी करावे?

4 उत्तरे
4 answers

जर आपल्याला गोठ्यातील गोचीड कमी करायचे असतील, तर ते कसे कमी करावे?

15
*गोठ्यातील गोचिडांची पासून शुन्य खर्चात मुक्ती*

गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गोचिड झाल्यास
उपाय १)
१ किलो सिताफळ पाला +
१ किलो कडूलिंब पाला +
१ किलो करंज
पाला कुटुन घ्यावा.
१० लिटर पाण्यात २४ तास पाण्यात भिजवावा.
नंतप गाळून गाईला पुसून घेणे तसेच,
गोठयात फवारने ८ दिवसांनी परत करणे.
उपाय २)
गाईच्या गोमुत्रात खडे मिठ टाकून ते गाईच्या अंगाला लावून गाईना बाहेर सोडल्यास गोचिड  निधून जाते नंतर साध्या पाण्यानी धुवावे
उपाय ३)
गोठ्यात भिंतीना ,चरणीला,( गव्हाणीला )दाराना,चुना लावावा .त्यामळे गोचीडीची वाढ होत नाही.
हा नैसर्गिक उपाय व जनावरांसाठी आरोग्यदायी उपाय आहे
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 115390
1
गोठ्यात गोचीड झाल्यास जनावरांनाही गोचीड होतात. गोचीड हा एकावेळी २००० अंडी देतो. काहीही न खाता अनेक दिवस जगू शकतो. हा एक परोपजीवी उपद्रवी कीटक असून यापासून जनावरांना अनेक आजार उद्भवतात. यासाठी Butex हे कीटकनाशक १ लिटर पाण्यात (५ ml) टाकून सर्व गोठ्यात फवारा. गोठ्याची स्वच्छता ठेवा. जनावरांना गोचीड झाल्यास त्यांच्या अंगावरही फवारा, फवारताना ते जनावरांच्या तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच जनावरांना कडुलिंब पाला रस व सीताफळ पाला रस चोळून लावा.
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 210095
0
div style='font-family: Arial, sans-serif;' div style='font-size: 16px;' गोठ्यातील गोचीड कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत: ul li b गोठ्याची स्वच्छता: /b गोठ्यातील कचरा नियमितपणे साफ करावा. गोठ्यात ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. /li li b जनावरांची स्वच्छता: /b जनावरांची नियमितपणे तपासणी करावी आणि त्यांच्या शरीरावर गोचीड आढळल्यास त्यांना त्वरित काढावे. /li li b रासायनिक नियंत्रण: /b गोचिडांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य रासायनिक औषधांचा वापर करावा. यासाठी आपण पशुवैद्यकाचा सल्ला घेऊ शकता. /li li b जैविक नियंत्रण: /b गोचिडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये परजीवी कीटकांचा वापर केला जातो, जे गोचिडांना मारतात. /li li b नैसर्गिक उपाय: /b कडुलिंबाचा पाला किंवा तेल वापरणे, तसेच राख आणि चुन्याचा वापर करणे हे देखील गोचीड नियंत्रणात मदत करू शकतात. /li /ul div style='font-size: 14px; color: #555555; margin-top: 10px;' अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: ul li a href='https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Package%20of%20practices%20for%20domestic%20animals.pdf' target='_blank' title='Package of practices for domestic animals' style='color: #007BFF; text-decoration: none;' पशुसंवर्धन विभागाची माहिती /a /li li a href='https://agri.mahaonline.gov.in/Static/LinkFile/Agriculture/Livestock_Management.pdf' target='_blank' title='Livestock Management' style='color: #007BFF; text-decoration: none;' पशुधन व्यवस्थापन /a /li /ul /div /divACCURACY=70
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1180

Related Questions

गुरांमधील गोचीड व त्यांचे नियंत्रण?