Topic icon

परोपजीवी

1
🐞 *गुरांमधील गोचीड व त्याचे नियंत्रण* 🐞


जनावरांमध्ये आढळणा-या विविध परजीवीपैकी गोचीड हा एक महत्वाचा बाहयपरजीवी आहे जगाच्या पाठीवरील बहुतेक सर्व देशामध्ये हया परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो.

पशुवैदयकीय शास्त्रामध्ये हया परजीवाला विशेष महत्व देण्याचे कारण म्हणजे

1) हयाचा फैलाव बहुतेक सर्व देशामध्ये होतो.

2) जनावरांमधील काही महत्वाचे जीवघेणे रोग पसरविण्यास गोचीड कारणीभूत आहेत.

3) जनावरांची उत्पादन क्षमता कमी करतात.

*गोचीडांपासून जनावरांना होणारी हानी -*

1) रक्तषोषण - सर्व प्रकारच्या गोचीड जनावराचें रक्त पितात (सुमारे 7 ते 14 दिवस) एक गोचीड सुमारे 1 ते 2 मिली रक्त पिते यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो.

2) गोचीडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरांवर जखमा होतात व त्या जखमांवर किडे पडतात तसेच त्वचारोग होऊ शकतो.

3) गोचीडांच्या चाव्यामुळे टिक पॅरालीसीस हा आजारासुध्दा जनावरांना होऊ शकतो.

4) गोचीडांमुळे होणारे रक्तपेशी रोग हे सर्वात महत्वाचे आहे त्यामध्ये बॅबेसीओसीस, ऍनाप्लासमोसिस, थायलेरीओसीस, ऐरलीकियोसीस व इतर रिकेटसीयल आजार जनावरांना गोचिडामुळे होतात या आजाराचे जंतू गोचीडांमध्ये त्यांच्या अनेक पिढयांमध्ये आढळून येतात व ते निरोगी पशूंमध्ये फैलाव करतात म्हणून या आजारांचे निर्मुलन करण्यासाठी गोचीडांचा नायनाट करणे अत्यंत महत्वाचे आहे.

5) आर्थिक हानी - जनावरांमध्ये गोचीडांमुळे होणा-या विविध आजारांमुळे जनावरे दगावतात तसेच दुध, मांस उत्पादन घटते त्यामुळे शेतक-याला प्रंचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते.

*गोचीडांचे नियंत्रण :-*

गोचीडांचा पुर्णत: नायनाट करणे शक्य नसले तरी काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावरांची उत्पादनक्षमता आपण टिकवून ठेवु शकतो गोचीडांचे नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना एकत्रितपणे अंमलात आणाव्यात-

1) जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे निर्मुलन करणे.

2) जनावरांच्या गोठयातील गोचीडांचे निर्मुलन करणे.

3) जनावरांच्या चरण्याच्या ठिकाणी गोचीडांचा प्रादुर्भाव कमी करणे.

यासाठी अंगावरील गोचीड काढून जाळून टाकावे व जनावरांची, गोठयाची व परिसराची स्वच्छता राखावी.

जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे नियंत्रण करण्यासाठी विविध औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर योग्य प्रकारे व पशुवैदयकाच्या मार्गदर्शनाखाली करावा त्यापैकी काही औषधे खालीलप्रमाणे -
1) ऍसूनटाल
2) डेल्टामेथ्रिन (क्यूटॉक्स)
3) ऍमीटाझ (एक्टोडेक्स)
4) आयुवेर्दीक मिश्रण (पेस्टोबॅन)

कंसातील नावे ही ट्रेड नावे आहेत.
वरील गोचिड नाशक औषधे ही बाजारात वेगवेगळया नावाने उपलब्ध आहेत
*ही औषधे विषारी आहेत त्यांची मात्रा ही डॉक्टरच्या सल्यानेच वापरावी कारण कमी मात्रेने गोचीड मरत नाहीत व जास्त मात्रा झाल्यास जनावरांना विषबाधा होते तरी औषधे कंपनीच्या सुचनेप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्यानेच वापरावीत.*

जनावराच्या अंगावर व गोठ्यामध्ये ही औषधे एकाच वेळी फवारावीत. त्यांची मात्रा ही पशूवैदयकीय डॉक्टरच्या सल्यानेच वापरावी.
उत्तर लिहिले · 6/5/2019
कर्म · 569245
15
*गोठ्यातील गोचिडांची पासून शुन्य खर्चात मुक्ती*

गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गोचिड झाल्यास
उपाय १)
१ किलो सिताफळ पाला +
१ किलो कडूलिंब पाला +
१ किलो करंज
पाला कुटुन घ्यावा.
१० लिटर पाण्यात २४ तास पाण्यात भिजवावा.
नंतप गाळून गाईला पुसून घेणे तसेच,
गोठयात फवारने ८ दिवसांनी परत करणे.
उपाय २)
गाईच्या गोमुत्रात खडे मिठ टाकून ते गाईच्या अंगाला लावून गाईना बाहेर सोडल्यास गोचिड  निधून जाते नंतर साध्या पाण्यानी धुवावे
उपाय ३)
गोठ्यात भिंतीना ,चरणीला,( गव्हाणीला )दाराना,चुना लावावा .त्यामळे गोचीडीची वाढ होत नाही.
हा नैसर्गिक उपाय व जनावरांसाठी आरोग्यदायी उपाय आहे
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 115390