5 उत्तरे
5 answers

आकलन म्हणजे काय?

4
ज्ञान ,आकलन ,उपयोजन,संकलन या मानसशास्त्र शाखेतील घटक आहेत.
   अज्ञात माहिती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ती आपल्याला कितपत समजली म्हणजेच किती स्वरूपात आकलन झाले.
थोडक्यात "आकलन म्हणजे समजणे".

तसे पाहिले तर प्रत्येकाची आकलनक्षमता, पातळी भिन्न असते.


◆तव्याला हात लावला तर चटका बसतो...म्हणजे आपल्याला ज्ञान झाले की हा तवा गरम आहे....

यावरून आपण समजून घेतो की तव्याला हात लावू नये...चटका बसतो...
म्हणजेच आकलन झाले.
_लक्षात आले.
उत्तर लिहिले · 6/4/2018
कर्म · 123540
2
आकलन म्हणजे एखादी गोष्ट/कृती (व त्याचे परिणामही) समजणे, लक्षात येणे, ज्ञात होणे. दगडावर डोके आपटले (😢😢) तर डोके फुटते, डोक्यातून रक्त येते हे समजते, लक्षात येते, कळून येते, ज्ञात होते म्हणजे परिणामाची जाणीवही होते. ( वगैरे वगैरे उदाहरणे ! )
उत्तर लिहिले · 6/4/2018
कर्म · 91085
0

आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्याची प्रक्रिया. आकलन मध्ये, माहिती गोळा करणे, त्या माहितीचा अर्थ लावणे आणि त्या माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढणे यांचा समावेश होतो.

आकलनाचे काही पैलू:

  • समज: नवीन माहिती आत्मसात करणे आणि तिचे विश्लेषण करणे.
  • अर्थ लावणे: माहितीला आपल्या ज्ञानात सामावून घेणे आणि तिच्याशी संबंध जोडणे.
  • अनुमान: माहितीच्या आधारावर तर्कसंगत निष्कर्ष काढणे.
  • उपयोजन: आकलनाचा उपयोग नवीन परिस्थितीत करणे.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1740

Related Questions

अवबोध म्हणजे काय?
आकलन म्हणजे काय? आकलनाच्या पातळ्या स्पष्ट करा.
श्रवण प्रक्रियेचे हेतू काय?
सरस निरस जाणण्याची शक्ती?
त्याची संकल्पना तुमच्या शब्दात लिहा?
गेस्टाल्ट धारणेच्या नियमांबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण द्या?
आकलनाच्या पातळ्या कशा स्पष्ट कराल?