व्यवसाय पशुपालन कृषी कुक्कुटपालन

मी पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहे, मार्गदर्शन करावे?

3 उत्तरे
3 answers

मी पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहे, मार्गदर्शन करावे?

2


कुक्कुट पालन व्यवसाय


शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात.

शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.


गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.

कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.

शाकाहारी अंडे म्हणजे काय?

आहारात अंड्याला ङ्गार महत्त्व आहे. कारण त्यात अनेक पोषण द्रव्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे ङ्गारशी रूढ नसतानाच्या काळात अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने केला. सरकारतर्ङ्गे प्रचाराचे ङ्गलक लावलेले असत. अंडी खाल्ल्याने माणूस शक्तीमान होतो कारण अंड्यात जीवनसत्त्वे विशेषत: जीवनसत्तव ड हे मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे मुलांचे शरीर बळकट होते. मुले शक्तीमान होतात. म्हणूनच म्हटले जाते, जो खाई अंडे,त्याशी कोण भांडे ?. अंडी खाणार्‍याशी भांडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. असे असले तरीही अंडी हा मांसाहारी प्रकार आहे त्यामुळे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. नाही म्हटले तरी भारतात शाकाहारी लोकांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे अंड्यांच्या वापराला काही मर्यादा येतात. शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरूवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी येईल आणि अंड्याची किंमत वाढून कांेंबडी पालकांचा ङ्गायदा होईल. शाकाहारी लोकांनीही अंडी खावीत यासाठी अंडी ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा ङ्गार प्रयत्न झाला पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंंनी शाकाहारी अंडे या संकल्पनेलाच विरोध केला आणि अंडी शाकाहारी असू शकत नाहीत असे सांगायला सुरूवात केली. त्यामुळे शाकाहारी अंडी ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोचली नाही.

जीवशास्त्राचा विचार केला किंवा अगदी कॉमन सेन्सने विचार केला तरीही अंडी शाकाहारी असू शकतात हे पटेल. मोकाट पद्धतीने पाळल्या जाणार्‍या गावठी कोंबड्यांची अंडी मांसाहारी असतात पण पिंजर्‍यात पाळल्या जाणार्‍या कोंबड्यांची अंडी मात्र शाकाहारी असतात. हे नीट समजून घेतले पाहिजे. पिंजर्‍यात कोंबड्या पाळण्याच्या पद्धतीत केवळ कोंबडीच पाळली जाते. त्या पिंजर्‍यात एकही कोंबडा नसतो. त्यामुळे पिंजर्‍यातल्या कोंबड्या जी अंडी घालतात त्या अंड्यांत जीव नसतो. ती निष्ङ्गळ अंडी असतात. कारण तिथे नर माणि मादी यांचा संयोग झालेला नसतो. अशा कोंबड्यांची अंडी कितीही उबवली तरी त्यांच्यातून पिल्लू बाहेर पडत नाही. त्या अंड्यात जीव नसल्यामुळे ती शाकाहारी असतात. मात्र त्यात जीव तयार होण्यासाठी आवश्यक तो आहार भरलेला असतो. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडणार असेल तर त्याला २१ दिवस लागतात. तेवढे दिवस तो जीव कोंबडीच्या शरीराबाहेर जगणार असतेा आणि अंड्यातून बाहेर पडे पर्यंत त्याची गुजराण या अंंड्यातल्या अन्नावर होणार असते. त्यामुळे कोंबडीमध्ये ती गुजराण होण्यास आवश्यक तेवढे पोषक अन्न अंड्यात तयार ठेवण्याची प्रवृत्ती कांेंबडीत असते.

अंडे सङ्गल ( पिल्लू तयार होणारे) असो की निष्ङ्गळ असो (पिल्लू निर्माण न होणारे) त्यात ते अन्न द्रव्य असतेच. निष्ङ्गळ अंड्यातून पिल्लू बाहेर पडत नाही पण कोंबडीने अंड्यात तशी तयारी केलेली असते. म्हणून ते अंडे शाकाहारीही असते आणि पौष्टिकही असते. हीच प्रक्रिया ङ्गळात घडत असते. प्रत्येक ङ्गळात बी असते आणि त्यांचे हळुहळु झाडात रूपांतर होत असते. ती क्षमता बियात असते आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य ङ्गळात तयार होतात. तसा विचार करता पिंजर्‍यातल्या कोंबडीचे अंडे हे एखाद्या ङ्गळासारखे असते.
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 935
0
*पोल्ट्री फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम अहमदनगर येथे 27 फेब्रुवारीला सुरू..*

     *प्रशिक्षणातील मुद्दे*
       🐔आजार
       🐔संगोपन
       🐔लसीकरण
       🐔पक्षांची निवड
       🐔शेडचे बांधकाम

🔖 *बँक कर्ज व शासकीय योजनां विषयी सविस्तर मार्गदर्शन*

🔖हा उद्योग करीत असलेल्या यशस्वी प्लांटला व्हिजिट...

🔖 *प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येईल...*

🔖 ☕चहा 🥪नाश्ता🍛 जेवण सुविधा चावडी तर्फेच होईल...

अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा :
https://www.chawadi.com/product/poultry-training-program/?affiliates=171
उत्तर लिहिले · 25/2/2019
कर्म · 569265
0
नक्कीच! पोल्ट्री फार्म (Poultry farm) व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी माहिती खालीलप्रमाणे:

पोल्ट्री फार्म व्यवसायाची माहिती

पोल्ट्री फार्म व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. ह्या व्यवसायात अंडी आणि मांस उत्पादनासाठी कोंबड्यांचे पालन केले जाते. हा व्यवसाय भारतात खूप वेगाने वाढत आहे, कारण ह्यामध्ये कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची शक्यता असते.

1.व्यवसाय योजना (Business plan):

  • लक्ष्य निश्चित करा: तुम्हाला अंडी उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचे आहे की मांस उत्पादनावर, हे ठरवा.
  • बाजारपेठ संशोधन: तुमच्या এলাকার बाजारात कोणत्या उत्पादनांना जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा.
  • खर्च आणि अंदाज: जागेची किंमत, पक्ष्यांची किंमत, खाद्य खर्च, मनुष्यबळ आणि इतर खर्च यांचा अंदाज तयार करा.
  • 2.जागा निवड (Place selection):

  • जागा: पोल्ट्री फार्मसाठी शांत आणि प्रदूषणमुक्त जागा निवडा.
  • सोय: पाणी, वीज आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधा तिथे उपलब्ध असाव्यात.
  • अंतर्गत रचना: पक्ष्यांसाठी योग्य जागा, खाद्य आणि पाण्याची सोय तसेच तापमान नियंत्रित ठेवण्याची व्यवस्था असावी.
  • 3. योग्य जातीची निवड (Selection of the right breed):

  • अंडी उत्पादन: अंडी उत्पादनासाठीlayer (लेयर) कोंबड्या जसे की BV-300, ISA Brown, किंवा Lohmann Brown या जाती चांगल्या आहेत.
  • मांस उत्पादन: मांस उत्पादनासाठीbroiler (ब्रॉयलर) कोंबड्या जसे की Cobb 500, Ross 308 या जाती चांगल्या आहेत.
  • जाती निवडताना तुमच्या भागातील हवामानाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

    4. व्यवस्थापन (Management):

  • पक्ष्यांची काळजी: लहान पिल्लांची विशेष काळजी घ्या. त्यांना योग्य तापमान आणि खाद्य द्या.
  • खाद्य व्यवस्थापन: पक्ष्यांना आवश्यक पोषक तत्वे मिळतील अशा খাদ्याची योजना करा.
  • आरोग्य व्यवस्थापन: पक्ष्यांना नियमित लसीकरण (vaccination) करा आणि त्यांची वेळोवेळी तपासणी करा.
  • 5. आवश्यक कागदपत्रे आणि परवाने (Required documents and licenses):

  • व्यवसाय नोंदणी: तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा.
  • परवाने: ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमधून आवश्यक परवाने मिळवा.
  • प्रदूषण नियंत्रण मंडळ: प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Pollution Control Board) परवानगी घ्या.
  • 6. शासकीय योजना (Government schemes):

  • राष्ट्रीय पशुधन अभियान: या योजनेअंतर्गत सरकार पोल्ट्री फार्मिंगसाठी subsidy (अनुदान) देते. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
  • Krishi Vigyan Kendra (KVK): KVKs तुम्हाला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देतात.
  • 7. विपणन (Marketing):

  • बाजारपेठ: तुमच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सुपरमार्केट यांच्याशी संपर्क साधा.
  • ऑनलाइन विक्री: तुम्ही सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून देखील विक्री करू शकता.
  • 8. काही महत्वाचे मुद्दे:

  • प्रशिक्षण: पोल्ट्री फार्मिंगचे प्रशिक्षण घ्या.
  • व्यवस्थापन कौशल्ये: तुमच्याकडे चांगले व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • धैर्य: व्यवसायात यश मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे धीर धरा.
  • मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

    उत्तर लिहिले · 17/3/2025
    कर्म · 5280

    Related Questions

    इन्क्युबेटरमध्ये अंडी टाकल्यानंतर कोणकोणत्या दिवशी कॅंडलिंग प्रक्रिया करतात?
    कोंबडीला अंडे का उबवावे लागते?
    पोल्ट्रीसाठी सबसिडी मिळते का?
    कोंबडी किती दिवस जगते?
    पोल्ट्री उद्योग म्हणजे काय?
    कुक्कुटपालनामध्ये भारत जगामध्ये अंडी उत्पादनात कितव्या स्थानावर आहे?
    मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?