दिनविशेष दिनदर्शिका सामाजिक महिला कल्याण

महिला दिनाविषयी माहिती हवी आहे?

2 उत्तरे
2 answers

महिला दिनाविषयी माहिती हवी आहे?

9
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

इतिहास

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे..

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.

उत्तर लिहिले · 7/3/2018
कर्म · 458580
0

आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांतील योगदानाला आदराने गौरवण्यासाठी समर्पित आहे.

या दिवसाचा इतिहास:

  • १९०९ मध्ये पहिला महिला दिन अमेरिकेत साजरा करण्यात आला.
  • १९१० मध्ये क्लारा Zetkin यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला.
  • १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला.
  • १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्चला अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली.

महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश:

  • महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे.
  • लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे.
  • राजकारण आणि अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढवणे.
  • महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराला विरोध करणे.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे, महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना समान संधी देणे हे आपले कर्तव्य आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2800

Related Questions

महर्षी कर्वे यांचे स्त्री बाबत काय मत होते?
महिलांसाठी कोणत्या सरकारी योजना आहेत?
मुलींसाठी कोणत्या सरकारी योजना आहेत का?
निराधार महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था मदत करते?
कंपनीमध्ये वुमन कौन्सिलर असणे कितपत गरजेचे आहे? आणि त्यांची जबाबदारी काय?