स्त्री सामाजिक महिला कल्याण

महर्षी कर्वे यांचे स्त्री बाबत काय मत होते?

2 उत्तरे
2 answers

महर्षी कर्वे यांचे स्त्री बाबत काय मत होते?

1
महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार :

(१) स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

(२) आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले

पाहिजे.

(३) स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे.

(४) शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.
उत्तर लिहिले · 21/11/2021
कर्म · 121765
0

महर्षी कर्वे यांचे स्त्री शिक्षणाबद्दल आणि सक्षमीकरणाबद्दल महत्त्वपूर्ण विचार होते. स्त्रियांबद्दल त्यांचे काही प्रमुख विचार खालीलप्रमाणे होते:

  1. स्त्री शिक्षण:

    महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक मानले. त्यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन सक्षम बनवण्यावर भर दिला, जेणेकरून त्या स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकतील आणि समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतील.

  2. विधवा विवाह:

    विधवांच्या जीवनात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला आणि समाजाला एक आदर्श घालून दिला.

  3. स्त्री सक्षमीकरण:

    महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणावर जोर दिला. स्त्रिया केवळ घरातच नव्हे, तर समाजातही समानतेने वावरल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते.

  4. अनाथ महिलांसाठी कार्य:

    अनाथ आणि निराश्रित महिलांसाठी त्यांनी आश्रयस्थाने उघडली, जेणेकरून त्यांना सुरक्षित जीवन जगता येईल.

त्यांचे हे विचार स्त्रियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे होते आणि आजही प्रेरणादायी आहेत.

अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2800

Related Questions

अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
नाम असलेला पर्याय कोणता? पहिला प्रश्न घट्ट, त्याची एकमेव दुसरा प्रश्न विशेष काळजी, तिसरा प्रश्न एक दुसरा पांढरा मार्ग, चौथा प्रश्न मिळाला हवा, पाचवा प्रश्न नव्या सामाजिक तो दुरुस्ती का?
सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शविणाऱ्या दोन बाबी?
जीवन मित्रासोबत शाळेत गेला?
गरीब कुटुंब कुटुंबप्रमुखाचे मृत्यू कथा लेखन?
मराठा व्यक्ती लिंगायत धर्माचा स्वीकार कसे करू शकतात?
वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावी अधिकारी?