2 उत्तरे
2
answers
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा अर्थ काय?
16
Answer link
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १० आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.


0
Answer link
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे:
- सद्रक्षणाय: चांगल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी.
- खलनिग्रहणाय: दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी.
हे वाक्य अनेकदा पोलीस दलाच्या बोधचिन्हात वापरले जाते, ज्याचा अर्थ ते चांगल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तत्पर आहेत.