श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती मिळेल का?
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती मिळेल का?
निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल.
*🙏छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं*
*🔰📶महा डिजी। 🚩शिवजयंती विशेष*
"इंद्र जिमि जृम्भा पर
बांडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है
पवन बरिनाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है
दावा दृमदंड पर
चिता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है!"
काय सुरेख वर्णन केलंय कवी भूषण यांनी महाराजांचं !
🙂अखंड महाराष्ट्रात असा कोणी सापडणार नाही, ज्याला, “काय रे? शिवाजी महाराज माहित आहेत का?” असं विचारल्यावर “नाही” उत्तर येईल असं – आमच्या अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं नाव.
✔एरवी जातीपातीमधे विभागलेला महाराष्ट्र – तुम्ही जातीने कोणीही असा – कुणा समोरही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करा, एकसाथ, एकदिलाने स्फुरण चढल्याशिवाय राहणारच नाही.
*💁चला तर मग, महाराजांविषयी थोडंसं जाणून घेऊया…!*
🙏छत्रपती शिवाजी महाराज…
●जन्म :- १९ फेबृवारी १६३०
●जन्मस्थळ :- किल्ले शिवनेरी
●माता :- राजमाता जिजाऊसाहेब
●पिता :- शहाजीराजे भोसले
●अपत्य :- संभाजी, राजाराम, सखुबाई, रानुबाई, अंबिकाबाई, राजकुमारीबाई
●प्रमुख शत्रु :- आदिलशाही, निझामशाही, कुतुबशाही, मोघलाई.
●सैन्य विस्तार :- घोडदळ – ४००००, पायदळ – ५००००, पश्चिम तटावर आरमार बांधणी.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
-----------------------------------------
*🧐काही उल्लेखनीय बाबी :*
▪जनतेचा राजा – “जाणता” राजा
▪मराठा साम्राज्याचे संस्थापक
▪मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती
▪अष्टप्रधान मंडळाचे संस्थापक
▪भारतीय नौदलाचे जनक
▪गनिमी काव्याचे जनक
▪एकमेवाद्वितीय राजा ज्याने स्वतःचा महाल बांधला नाही
▪शिवशक कालगणनेचे सुरुवात केली
▪स्वराज्याची राजमुद्रा, स्वतंत्र नाणी
▪शककर्ता, क्षत्रियकुलावंतस् इ. बिरुदे
*🗣️महाराजांविषयीचे काही उल्लेखनीय उद्गार:*
🙏“लाख मेले तरी चालतील, पन लाखांचा पोशिंदा जगलाच पाहीजे”
– बाजीप्रभु देशपांडे
🙏“हा तानाजी जिवंत असताना महाराज स्वतः मोहिमेवर जाणार? आधी लगीन कोंढाण्याचं, अन् मंग माझ्या रायबाचं”
– तानाजी मालुसरे
🙏“Shivaji is one of the greatest national saviour who emancipated our society & our HINDU dharma, when they were faced with threat of total destruction. He was peerless hero, a pious & God-Fearing King & verily a manifestation of all virtues of a born, Leader of men described in our ancient scriptures”
– Swami Vivekanda
🙏शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप, भुमंडली।।
– समर्थ रामदास स्वामी
_________________________
🎥 *तुम्ही पाहिलेत का? शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपट*
🚩 *मनोरंजन*
🎞️ छत्रपती शिवजी महाराज यांच्या शोर्यगाथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्यावर आलेले चित्रपटांची यादी आपण जाणून घेऊयात...
*१) बाळ शिवाजी*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लहानपणीच्या पराक्रमावर आधिरित बाळ शिवाजी हा चित्रपट आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहर्तमेढ कशी रोवली हे दाखवण्यात आलं आहे. १९८१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
*२) छत्रपती शिवाजी-* शिवाजी महराजांच्या पराक्रमावर आधिरित हा चित्रपट आहे. १९५२ मध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. बालाजी पेंढरकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
*३) कल्याण खजिना* - शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना कसा लुटला यावर आधारित हा चित्रपट आहे. १९२४ मध्ये बाबूराव पेंटर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
*४) प्रभो शिवाजी राजा*-
शिवाजी महाराजांवर आलेला पहिला अॅनिमेटेड चित्रपट प्रभो शिवाजी राजा आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
*५) शतकर्ता शिवाजी* (Shatakarta Shivaji) १९३४ मध्ये आलेल्या या चित्रपटातून शिवजी महाराजांची शोर्यगाथा आणि पराक्रम दाखवण्यात आला आहे.
*६) मी शिवाजीराजे भोसले बोलतोय*-
अन्यायाशी लढण्यासाठी एका मध्यमवर्गीय माणसाला शिवजी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात. हे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातून दाखवण्यात आलं. २००९ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता.
*७) शेर शिवाजी -*
१९८७ मध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर शेर शिवजी हा चित्रपट आला होता. Parikshat Sahni, स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर, अमरिश पुरी आणि असरानी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या..
*८) स्वराज्य सीमेवर-* शिवजी महारांजाच्या शोर्याची गाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. १९३७ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता.
*९) छत्रपती शिवजी*-
रितेश देशमुखने २०१६ मध्ये छत्रपती शिवजी महाराज या चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं बोललं जातेय. सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
*१०) सर्जा -* १९८७ मध्ये सर्जा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका तरूणाची गोष्ट यामध्ये दाखवण्यात आली होती. अजिंक्य देव, निळू फुले, रमेश देव, कुलदीप पवार आणि सीमा देव यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.
*११) फर्जंद*-
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने 'फर्जंद' सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
*१२) फतेशिखस्त*-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या आणि मराठय़ांच्या गनिमी गाव्याच्या युद्धनीतीची विस्तृत मांडणी करणाऱ्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' नोव्हेंबर २०१९ मध्ये आला होता.
*१३) हिरकणी*-
मराठी चित्रपसृष्टीमधील दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद ओकचा ‘हिरकणी’ हा ऐतिहासीक चित्रपट २४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने ‘हिरकणी’ ही मुख्य भूमिका साकारली. प्रसाद ओक यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
*१४) 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर'*-
अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा ऐतिहासिकपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी केली आहे.
🚩 _*छत्रपती शिवाजी महाराज 'या' गोष्टींमुळे ठरतात जगातले सर्वश्रेष्ठ राजे!*_
💁♂ _*आदर्श छत्रपती शिवाजी महाराज; काल आज आणि उद्याही!*_
आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल.
आज महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंतही पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर जाणून घेऊया बहुगुणी महाराजांचे असे कोणते गुण आहेत जे पुढच्या पीढीसाठी नक्की मार्गदर्शक आहेत...
1) *सर्वधर्मसमभाव* : शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे झाले आहे.
2) *साहसी व धाडसी वृत्ती* : कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.
3) *कमालीची निष्ठा* : देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही.
4) *स्त्रियांचा आदर* : आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. 'स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही.
5) *नेतृत्व गुण* : शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेषक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
6) *संघ भावना* : महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं. आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते.
_आज शिवजयंती.! अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे शिवाजी महाराज हे जगभरातील इतर राजांपेक्षा खूप वेगळे आणि सर्वोत्कृष्ट राजा ठरतात. कारण त्याला कारणेही तशीच वेगळी आहेत. ती नेमकी कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील._
👑 _*स्वत:च स्वत:चं राज्य निर्माण केलं*_
महाराजांनी स्वत: त्यांचं मराठी माणसाचं विश्व निर्माण केलं. त्यांनी मुघल, निजाम, आदिलशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या 16 व्या वर्षी जिंकला होता.
🏰 _*महाल उभारण्यापेक्षा 100 पेक्षा जास्त किल्ले बांधले*_
इतर राज्यांप्रमाणे शिवाजी महाराजांना ऐशो आरामात राहणे कधीही पसंत नव्हते किंवा त्यांनी ते पसंत केले नाही. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या जनतेचं रक्षण करता यावं म्हणून 100 पेक्षा जास्त किल्ले उभारले.
💰 _*कर पद्धत बदलली*_
_शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार कसेही आणि कितीही प्रमाणात लोकांकडून कर गोळा करायचे. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारा कर कमी करून टाकला._
⛵ _*भारतीय नौदलाचे जनक*_
_शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी तेव्हा अतिशय दमदार असं आरमार तयार केलं होतं._
⚖ _*जनतेच्या कल्याणाचे अनेक कायदे*_
_महाराजांनी त्यांच्या राज्यात अनेक मजबूत कायदे तयार केले. जे सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचे होते. रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते._
🚫 _*अस्पृश्यतेचे निर्मूलन*_
_प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची पूजा त्यांनी मूर्ती घडविणाऱ्या अस्पृश्यांच्या हातून करून घेतली. पुजाऱ्याने यावर आक्षेप घेतला. पण शिवाजी महाराजांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ विचारले की जर हे अस्पृश्य मूर्ती घडवू शकतात तर मग तीच मूर्ती त्यांनी पूजा केल्याने अपवित्र कशी होईल?_
🙅♂ _*जातीयवादाचे उच्चाटन*_
_त्यांचा वैयक्तिक सेवक मदारी मेहतर होता, त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता; अफझलखानाच्या भेटीच्यावेळी त्यांचा अंगरक्षक असलेला जिवा महाला न्हावी होता; एवढेच नाही तर सिद्दी जोहरला चकवणारा त्यांचा तोतयादेखील शिवा काशिद नावाचा न्हावीच होता._
🚺 _*महिलांचा आदर*_
_शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं._
👁🗨 _*ते अंधश्रद्धाळू नव्हते*_
_शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच केल्या आहेत._
🤺 _*गनिमी कावा*_
_गनीमी कावा अथवा इंग्रजीत गुर्हिल्ला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. ज्यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. महाराज गनिमी काव्यात तरबेज होते_
*🤔जाणून घ्या अपरिचित शिवचरित्र🚩*
_*छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे.*_

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
*शिवरायांबद्दल अत्यंत दुर्मिळ माहिती देणारी बातमी आजच्या पुण्यनगरी (नागपूर आवृत्ती) मध्ये वाचा -*
*शिवरायांच्या पत्नी*
*१) सईबाई –* सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
*२) सगुणाबाई –* सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.
*३) सोयराबाई –* सोयराबाई या शिवरायांच्या तृतीय पत्नी असुन त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. संभाजी मोहिते हे त्यांचे वडील तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५० पुर्वी झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना दोन अपत्ये झाली. त्यांचा मृत्यु १६८१ च्या उत्तरार्धात रायगडावर झाला.
*४) पुतळाबाई –* पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी असुन त्या पालकर घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५३ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन जुन १६८० मध्ये शिवरायांच्या निधनाने खचुन जाऊन रायगडावर त्यांचा मृत्यु झाला.
*५) लक्ष्मीबाई –* लक्ष्मीबाई या शिवरायांच्या पाचव्या पत्नी असुन त्या विचारे घराण्यातील होत्या. जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना १६५६ पुर्वी महाराजांशी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
*६) सकवारबाई –* सकवारबाई या शिवरायांच्या सहाव्या पत्नी असुन त्या गायकवाड घराण्यातील होत्या. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५७ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले. त्यांचा मृत्यु १७०७ मध्ये झाला.
*७) काशीबाई –* काशीबाई या शिवरायांच्या सातव्या पत्नी असुन त्या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७४ मध्ये झाला.
*८) गुणवंताबाई –* गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्या पत्नी असुन त्या विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील होत्या. सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
*शिवरायांची अपत्ये*
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई या चार पत्नींपासुन सहा मुली आणि दोन मुले झाली. महाराणी पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई या निपुत्रीक होत्या.
*शिवरायांच्या मुली*
*१) सखुबाई –* सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या सखुबाईंचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्यासोबत झाला.
*२) राणुबाई –* सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या राणुबाईंचा विवाह सिंदखेडराजा येथील अचलोजी जाधवराव यांच्यासोबत झाला.
*३) अंबिकाबाई –* सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या अंबिकाबाई यांचा विवाह तारळे (सातारा) येथील हरजीराजे महाडिक यांच्यासोबत झाला.
*४) राजकुंवरबाई उर्फ नानीबाई –* सगुणाबाईंच्या पोटी जन्मलेल्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्यासोबत झाला.
*५) दिपाबाई उर्फ बाळीबाई –* सोयराबाईंच्या पोटी जन्मलेल्या दिपाबाई यांचा विवाह विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झाला.
*६) कमळाबाई –* सकवारबाईंच्या पोटी जन्मलेल्या कमळाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाला.
*शिवरायांची मुले*
*१) संभाजी –* सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जिऊबाई उर्फ येसुबाई यांच्यासोबत झाला.
*२) राजाराम –* सोयराबाईंच्या पोटी जन्मलेल्या राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी, कागलकर घाटगेंची कन्या राजसबाई यांच्यासोबत झाला.
🚩
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।
*☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆*
_______________________________
*१) लखुजीराजे जाधव* (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा
*२) मालोजीराजे* (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
*३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी
*४) शहाजीराजे*- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)
*५) जिजाबाई -* पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
*६) छत्रपती शिवाजी महाराज*- रायगडावर
*७) सईबाई* (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
*८) पुतळाबाई व सोयराबाई* (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
*९) संभाजीराजे* (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
*१०) छत्रपती संभाजी* (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव
*११) सखुबाई* (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
*१२) सूर्यराव काकडे* (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
*१३) रामचंद्रपंत अमात्य* (अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
*१४) मकूबाई* (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर
*१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर-* तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड
*१६) धनाजी जाधव -* वडगाव (कोल्हापूरजवळ)
*१७) रामाजी पांगेरा -* कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक
*१८) बाजी पासलकर आणि गोदाजी जगताप*
(गाधवड, जि. पुणे)
*१९) *तानाजी मालुसरे* आणि शेलारमामा -*उमरठ
*२०‹) रायबा* (तानाजीचा मुलगा)- पारगड
*२१) बहिर्जी नाईक -* भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली
*२२) हिरोजी फर्जंद*आणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)
*२३) शिवा काशिद -* पन्हाळगड
*२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाल-*
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
*२५) मुरारबाजी देशपांडे -*पुरंदर
*२६) संभाजी कावजी -* कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे
*२७) फिरंगोजी नरसाळा-* संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
*२८) सिदोजी निंबाळकर -* पट्टागड (संगमनेर)
*२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू*- विशाळगड
*३०) दत्ताजी जाधव* (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
*३१) जानोजी भोसले* नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
*३२) जानोजी निंबाळकर* (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड
*३३) जगदेवराव जाधव* (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर
*३४) नागोजी माने (म्हसवडकर)*- सिंदखेडराजा
*३५)हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण-* अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद
*आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत.*
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत..
*त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.*
अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा असतात. *सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.*
*⛳स्वराज्य⛳*
*छत्रपती शिवाजी राजे भोसले.*
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
*महाराजांच्या पत्नी-*
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
*मुले -*संभाजी, राजाराम,
*मुली -*सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर..
________________
*🙏छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…!*
🙏जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना मोहिनी पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या युद्धनीती पासून रयतेसाठी न्यायी “स्वराज्य” यंत्रणा उभारण्यापर्यंत प्रत्येक कृत्याचा जगभरात बारकाईने अभ्यास केला जातो.
*🧐पण असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज…खरंच कसे दिसायचे बरं?*
🤔हा प्रश्न कित्येक दशके सर्वांना पडला होता. आणि त्यावर खात्रीलायक उत्तर मिळालं एका निस्पृह अभ्यासकाच्या मेहनतीमुळे…!
📌फ्रान्सच्या पॅरिस मध्ये असणाऱ्या या चित्रमागची कथा अशी – Niccolao Manucci नावाचा एक इटालियन प्रवासी Venice हुन आपल्याकडे आला. त्याने मुघलांच्या दरबारात असलेल्या चित्रकाराकडून (त्याचं नाव मीर मुहम्मद) जवळजवळ ५२ चित्र काढून घेतली.
🖌पण ती चित्र ही कल्पना करून काढलेली होती. त्यात शायिस्तेखानाच्या आणि महाराजांच्या चित्रात थोडा फार फरक! अशा प्रतीचं ते चित्र होतं.
🖋Venice च्या Senate ने ते (Manucci ने लिहिलेल्या manuscript सोबत) publish करावं अशी त्याची इच्छा होती. पण त्याआधीच नेपोलियनने Venice ला असलेलं सगळं लुटून त्याच्यासोबत नेलं, त्यात manuscript मात्र नव्हती. पुढे तेच चित्र पॅरिसच्या Musée Guimet येथे ठेवण्यात आलं!
*💁वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शोधून काढलेल्या चित्राची खासियत अशी की ते “रेखाचित्र” हे त्या आर्टिस्ट ने प्रत्यक्ष महाराजांना बघून काढलेलं होतं!*

✌महाराजांनी सुरत १६६४ आणि १६७० अशी दोन वेळा लुटली. त्यापैकी १६६४ सालच्या स्वारीच्या वेळी सुरतेला डच आरमार होतं. डच लोकांना एक सवय होती, ते महत्त्वाच्या व्यक्तींचं चित्र काढून घ्यायचे. त्यावेळी तिथे वॅलेंटाईन नावाचा गव्हर्नर होता. त्याने महाराजांचं वर्णन सुद्धा करून ठेवलेलं आहे.
✔ते वर्णन आणि चित्रातले महाराज अगदी तंतोतंत जुळतात. बारीक मिशी, चेहऱ्यावरचं स्मितहास्य, धारदार नाक असं सगळं आपल्याला त्या चित्रात दिसून येतं. साधारणपणे १९४०च्या सुमारास बेंद्रे हेगला गेले. तिथे त्यांनी हे चित्र शोधून काढलं आणि ते आपल्याकडे घेऊन आले.
*👀त्यांनी १९७२ साली शिवचरित्र दोन volumes मध्ये प्रकाशित केलं. त्यात हे चित्र छापलेलं आहे.*
👍हे जगातलं महाराजांचं पहिलं असं चित्र आहे की जे चित्रावरून काढलेलं नाही, महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं आहे! हे बेंद्र्यांचं एक मोठं काँट्रीब्युशन आहे.
📍बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे.
📔“साधन चिकित्सा” नावाचा त्यांचा ग्रंथ हा इतिहास संशोधकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं एवढं मोठं योगदान असूनही स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्यांना हवा तसा मानसन्मान आणि ओळख मिळाली नाही याची खंत वाटते.
___________________________________
*फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे..*
*तरी संभाजी राजे अजुन आमच्या छातीत जिवंत आहेत..*
*मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाहीl*
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
*जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l*
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
*पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l*
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही."
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवाजी महाराजांचे निधन झाले..*
हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
*सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.*
*ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.*
तख्तावरून उठला.
त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.
व नमाजाची पोझिशन घेऊन *त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.*
तिचा *मराठी अनुवाद*-
*"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर.*
*आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे.*
*कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची दारे सताड उघडी ठेव..*
*संदर्भ-* अहेकामे आलमगिरी..
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक हिंदवी स्वराज्य होत ll
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनगड
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
🚩🚩जय शिवराय🚩🚩
_____________________________
*_💁शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारात या '8' व्यक्तींकडे होती महत्त्वाची जबाबदारी!_*
_महाराष्ट्रातील नव्हे तर देशाभरातील जनतेच्या मनात अढळ स्थान असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 साली अखेरचा श्वास घेतला. या दिवशी संपूर्ण सृष्टीवर शोककळा पसरली. रायगड दुःखाने काळवंडला. अवघ्या 50 व्या वर्षी महाराजांनी जगाचा निरोप घेतला.पण सुराज्य, स्वराज्य यांची नांदी नेमकी महाराजांनी कशी साधली? तर त्यासाठी त्यांचे प्रभावशाली आणि प्रतिभासंपन्न अष्टप्रधान मंडळ कार्यरत होते. अष्टप्रधान मंडळाच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि पारदर्शी कारभारामुळे स्वराज्याची घडी नीट बसली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक नजर टाकूया त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्वरुपाकडे..._
*_◼प्रधानमंत्री_*
महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. अष्टमंडळातील प्रधानमंत्रींना सर्वात महत्त्वाचे स्थान होते. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. हाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. शिवाजी महाराजांच्या वेळी मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे प्रधानमंत्री होते.
*_◼अमात्य_*
अमात्य हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ अर्थमंत्री असा आहे. रामचंद्र निळकंठ हे शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळाचे अर्थमंत्री होते. स्वराज्याचा सर्व खर्च, जमाखर्च पाहण्याचे काम अमात्यांचे असायचे.
*_◼पंत सचिव (सुरनीस)_*
अण्णाजीपंत दत्तो हे शिवाजी महराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंत सचिव होते. पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे प्रमुख काम होते. शिवाजी महाराज जो काही पत्रव्यवहार, आज्ञापत्रे लिहित त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. तसेच त्यांना जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागे.
*_◼मंत्री (वाकनीस)_*
महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम वाकनीस करत असतं. दत्ताजीपंत त्रिंबक हे शिवाजी महाराजांचे वाकनीस होते. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे ते करत असतं.
*_◼सेनापती (सरनौबत)_*
शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. हंबीरराव मोहिते हे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे सेनापती होते.
*_◼पंत सुमंत (डबीर)_*
स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री पंत सुमंत होते. महारांजांच्या काळात ही जबाबदारी रामचंद्र त्रिंबक सांभाळत होते. परराष्ट्रांची संवाद साधणे, त्यांचे स्वागत-सत्कार करणे, विदेशी दूतांची व्यवस्था पाहणे अशी कामे ते करत. त्याचबरोबर परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे. तसेच परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम पंत सुमंत यांच्यावर होते.
*_◼न्यायाधीश_*
दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय मिळवून देण्याचे काम न्यायाधीश करत असतं. निराजीपंत रावजी हे महाराजांच्या स्वराज्याचे न्यायाधीश होते.
*_◼पंडितराव_*
धर्मखात्याच्या प्रमुखांना पंडितराव म्हटले जाई. मोरेश्वर पंडित हे स्वराज्याचे पंडितराव होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, अशी कामे ते करत असतं.
*_📍शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची नीटनेटकी रचना पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा का म्हटले जाई, याची प्रचिती येते._*

*🚩शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ नेमकं काय सांगते?*
🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन.
👉 शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे.
⚡ _हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे. जाणून घेऊया या राजमुद्रेचा अर्थ._
_*प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।*_
_*शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।*_
👉 _‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे._
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
▪ मराठी अर्थ: ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’
▪ इंग्रजी अर्थ: The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon. It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.
खालील लिंक उघडून छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पहा.
https://www.facebook.com/1059644180900791/posts/1065503806981495/?app=fbl
उत्तर प्रश्नाशी पूर्णपणे संबंधित नाही पण त्यातून महाराजांचे विचार कळतील...
भाऊ, बहिण आणि शिवाजी राजे…
आपल्या बरोबरीची
आपल्याच वयाची
आपल्या आईच परमेश्वराने निर्माण केलेल दुसर रुप
म्हणजे बहिण…
रक्ताने नसले तरी प्रेमाने जोडता येणारे परमपविञ नाते म्हणजे भाऊ बहिण…
भाऊ म्हणजे शक्ती
बहिण म्हणजे भक्ती
भाऊ म्हणजे कर्तव्य
बहिण म्हणजे वात्सल्य
असे हे नाते…
यासाठी एकाच आईपोटी जन्माला यायची गरज नाही.
किंवा ते रक्ताच असाव असही नाही.
रक्ताची नाती कदाचित स्वार्थासाठी तुटतील पण मनाची नाती कायम टिकतात.
ही नाती कशी जोडावी आणि टिकवावी हे शिवचरिञातून शिकता येते.
कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन समोर उभी आहे. शिवाजी राजा आहे. राजा काहीही करू शकतो. पण माझ्या राजाचे संस्कार बघा.
अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती !
पाहून ती लावण्यवती वदले छञपती !!
पर स्त्री ला आई बहिणी सारखे मानून तीची पाठराखण करणारे शिवाजी महाराज हे जगातले एकमेव राजा होते.
अशीच एखादी स्त्री मोगल किंवा यवनांच्या ताब्यात सापडली असती तर …..
तर काय झाले असते….
भर दिवसा …
मुलं पतीच्या समोर स्ञिया पळवणारे नराधम कुठे ….
आणि कुठे माझे शिवाजी राजे….
त्या सुनेचा सन्मान करून, मानाने जेव्हा ती तिच्या घरी गेली तेव्हा ती काय बोलली असेल…
तुला त्या काफीराने पळवली..
तुझ्यावर अत्याचार तर झाले नाहीत ना…
या प्रश्नाला तीने उत्तर दिले असेल…
कौन कहता है मुझे भगाया. चुराया. मेरा अपहरण हुवा !
नही !.. मै तो मेरे मायके… अपने भाईके पास गयी थी ! मुझे तो फक्र होता है की ये हादसा हुवा इसिलिए मुझे शिवाजी जैसा भाई मिला.!
महाराजांचे वर्णू गुण किती
न्याय आणि नीती
कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान
तरूणी लाभली रूपाची खाण
तिज पुढे नमवूनी मान
परस्ञिचा या केला बहुमान
असा शिवराय चारित्र्यवान……
….. शाहीर पिराजीराव सरनाईक
अरे जो माणुस शञूच्या स्ञीशी बहिणीच नात जोडतो तो आपल्या स्ञीयांशी कसे वागत असेल ……
आम्ही त्या शिवाजी राजाच नाव घेतो. आम्ही कस वागल पाहिजे…
हा महाराजांचा महाराष्ट्र आहे.
तरी का होतात इथ स्ञीवर अत्याचार …
घरात फोटो लावून
घोषणा देऊन
कपाळाला गंध लावून कुणी शिवभक्त होत नाही.
परक्याच्या माता बहिणीला आपली माता बहिण माननारा तो शिवभक्त…..
प्रत्येक स्ञीचा सन्मान करणारा तो शिवभक्त….
घरातील स्ञीला समानतेची वागणूक देणारा तो शिवभक्त…
स्ञीवर अत्याचार करणारे हात कलम करणारा तो शिवभक्त…
आपल्या बहिणी प्रमाणेच दुसरी मुलगी ही कुणाची तरी बहिण आहे ही भावना ठेवणारा तो शिवभक्त…
तीचा पदर पाडणारा नाही तर पदर सावरणारा तो शिवभक्त…
शिवभक्त म्हणून मिरवणारे लाखो आहेत पण चारित्र्यसंपन्न विचारांनी जगणारा तो शिवभक्त…
ती रस्त्याने चालली….
खाली मान घालून …
चार टवाळ पोर…
तीच्यावर कमेंट सुरू…
तिच्या मागे फिरायला लागले …
ञास द्यायला लागले …
तेवढयात एक जन आला…
एकाला कानठाळला…
बाकीचे टवाळ पळून गेले …
ती मुलगी भारावली…
त्याच्या जवळ आली…
भाऊ… इथ किती लोक आहेत..पण या टवाळांना धडा शिकवायला तुम्ही पुढे आलात …
हो ताई.. कारण मि शिवभक्त आहे.
प्रत्येक स्ञी आमच्या देवघरातील देवता आहे. आणि आमच्या देवतेचा अपमान आम्ही करत नाही. आणि सहनही करत नाही. हीच शिकवण आहे आम्हाला शिवाजी राजाची…….
….
शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….
ही लढवत होती ती गढी….
गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …
महाराज मला मारा …
ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..
आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई………….
ताई … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..
ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.
हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…
किती महान माझा शिवाजी राजा होता हो..
शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही .
एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत …
नवर्याच ऐकत नाहीत ….
पण भावाच मात्र ऐकतात…
हा लेख लिहिण्याचे कारणही हेच आहे की मला बहिण नाही . पण ही उणिव मला कधी भासली नाही . ज्यांना मी कधी पाहिलं नाही. भेटलो नाही पण अशा माझ्या बहिणी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांना मी त्याच्या भावाप्रमाणे आहे. अशा माझ्या बहिणीसाठी ही शब्दांची भावबीज..
खरच काय नात आहे भावा बहिणीच..
भाऊ ऊनाडक्या करत. खोड्या करत फिरणार. आणि घरी तक्रार आली की बहिण भावाच्या बाजूने उभी राहणार..
दादा जेवल्याशिवाय नाही जेवनार…
भावाचा गृहपाठ ही पुर्ण करणार ..
दादा दादा म्हणून मागेपुढे फिरणार..
दादाची थट्टा करणार ….
पण दुसरे कोणी दादाला बोलल की माञ हिला सहन नाही होणार …
रोज धिंगाणा घालणार ..
काही अडचण आली की दादा मागे दडणार..
लहानपणी भांडण झाले की दादाला बुक्या मारणार …..
आणि बहिणीचा कोमल हात लागत नाही म्हणून दादाही आनंदाने मार खाणार…
बहिणीच्या लग्नासाठी धावपळ करणार …
कर्ज काढणार..
दुप्पट काम करणार ..
माझी ताई सुखात तर मी सुखात या भावनेने जगणार..
आणि ज्या दिवशी हि लाडकी सासरला निघणार तेव्हा माञ याच्या अश्रूचा बांध फुटणार…
दगडाच्या काळजाचा भाऊ लहान मुलासारखा रडणार..
लग्नानंतरही तीच्या ख्याली खुशालीसाठी फोन करणार
काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .
किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…
वादाच्या पलिकडले शिवाजी …
बहिणीचा भाऊ शिवाजी …
माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .
मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे.
जय जिजाऊ जय शिवराय🙏
आपल्या मुळ कोण्या मुलीला त्रास होईल अस वागु नका 🙏🙏🙏🙏
माझा हेतू फक्त हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आहे..
श्री छत्रपती शिवाजी महाराज: एक संक्षिप्त माहिती
शिवाजी महाराज, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते, ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.
प्रारंभिक जीवन:
शिवाजी महाराजांचे बालपण जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली गेले. जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारत यांसारख्या कथांमधून प्रेरणा दिली. त्यांनी लहान वयातच युद्धकला आणि प्रशासनाचे धडे घेतले.
स्वराज्य स्थापना:
शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. त्यांनी आपल्या विश्वासू मावळ्यांच्या मदतीने अनेक किल्ले जिंकले आणि मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
मुघलांशी संघर्ष:
शिवाजी महाराजांनी मुघलांशी अनेक लढाया केल्या. त्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करून मुघलांना सळो की पळो करून सोडले. अफझलखानाचा वध ही त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे.
राज्याभिषेक:
1674 मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांनी प्रजेसाठी कल्याणकारी राज्यकारभार केला.
मृत्यू:
3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली.
शिवाजी महाराजांचे योगदान:
- स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना
- प्रजाहितदक्ष राज्यकारभार
- गनिमी काव्याचा वापर
- मराठी भाषेला प्रोत्साहन
शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.