3 उत्तरे
3 answers

जागतिक लोकसंख्या दिनांक?

4
11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.
1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची.
जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी.
21व्या शतकात आपला आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल.
भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011 च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे. 
उत्तर लिहिले · 31/1/2018
कर्म · 16275
1
👨‍👨‍👧‍👧 *जागतिक लोकसंख्या दिन; आज गंभीर होण्याची गरज!*

*🔰📶महा डिजी | दिनविशेष*

आज जागतिक लोकसंख्या दिन. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो.

📍 *इतिहास* : 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै, 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/इशारा दिन म्हणून पाळता जातो.

जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते, तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

🧐 *भारत दुसऱ्या स्थानी* : लोकसंख्येच्या बाबतीत सध्याच्या घडीला चीन पहिल्या स्थानावर तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे.

😨 *संयुक्त राष्ट्राचा अहवाल चिंताजनक* : 2028 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या 1.45 अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल.

💁‍♂ *म्हणून आपण गंभीर व्हायला हवे!* :

▪ विकसित देशांमध्ये संसाधने अधिक आणि लोकसंख्या कमी आहे तर विकसनशील अविकसित देशांमध्ये संसाधने कमी आणि लोकसंख्या अधिक आहे.
▪ वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि रोजगार आदी बाबींचा विचार करता, ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही.
▪ सध्या चीनची लोकसंख्या स्थिर राहण्याचा अंदाज आहे, कारण चीनने कठोर उपाय योजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपण सावध होणार का? एवढाच प्रश्‍न आहे.
▪ लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य, पौष्टिक अन्न, रोजगार यांसारख्या गोष्टी बहुतांश नागरिकांपासून दूर-दूर जाऊ लागतात. ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली असते.

😇 *समस्यांवर ठोस उपाययोजना हव्या* :

▪ अहवालात वर्तविलेल्या भाकितानुसार भारताची लोकसंख्या दीड अब्ज म्हणजे दीडशे कोटी झालीच, तर एवढ्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न उपलब्ध करण्याची क्षमता भारताकडे नक्‍कीच नाही.
▪ रोबोटिक्‍स आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत कामगार, कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही, अशा वेळी या लोकसंख्येचे करायचे काय, हा प्रश्‍न उभा राहील.
▪ विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल आणि गुन्हेगारीही वाढेल.
▪ वाढती लोकसंख्या देशाची प्रगती रोखण्यास कारणीभूत तर ठरते. त्यामुळे आतापासूनच आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

👍 *आपले सक्रिय योगदान हवे* : जेवढी लोकसंख्या वाढेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने वंचित लोकांचा आकडा वाढत जाईल. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी भारताने लोकसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या सरकारची नसून सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.


*😱बापरे..जगात राहतात इतके लोक*


_*👶🏻दरवर्षी ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो*_

_😱जागतिक लोकसंख्या: ७७० कोटी (एप्रिल २०१९ पर्यंत)_

_जागतिक लोकसंख्येला १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी २ लाख वर्षांचा कालावधी लागला_

_जागतिक लोकसंख्येने १०० कोटींवरुन ७०० कोटींचा आकडा अवघ्या २०० वर्षांमध्ये गाठला_

_१९५५ ते १९७५ दरम्यान जागतिक लोकसंख्या वाढ सर्वाधिक म्हणजे वर्षाला १.८ टक्क्यांनी वाढली_

_२०२२ मध्ये भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होण्याची शक्यता_

*जगातील लोकसंख्या देशानुसार👇🏻*

(१)चीन,
(२)भारत,
(३)अमेरिका,
(४)इंडोनेशिया,
(५)पाकिस्तान,
(६)ब्राझील,

*👨‍👨‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧'जागतिक लोकसंख्या दिन' निमित्त जाणून घ्या जगातील 7 खंडामध्ये राहणाऱ्या लोकांची थक्क करणारी आकडेवारी*


👉11जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज झाली होती.

💁‍♂️त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.

💫1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

📍या दिवसाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जाते. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

▪️आशिया (लोकसंख्या: 446.27 कोटी)

▪️आफ्रिका (लोकसंख्या: 121.6 कोटी)

▪️युरोप (लोकसंख्या: 73.8 कोटी)

▪️उत्तर अमेरिका (लोकसंख्या: 57.9 कोटी)

▪️दक्षिण अमेरिका (लोकसंख्या: 42.2 कोटी)

▪️ऑस्ट्रेलिया खंड (लोकसंख्या: 39.9 कोटी)

▪️अंटार्टिका (लोकसंख्या: 1200 केवळ संशोधक)

◾जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 19/7/2019
कर्म · 569225
0

जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी असतो.

१९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) याची सुरुवात केली.

उद्देश: लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवणे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक आहे?
2020 साली भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांची लोकसंख्या जवळपास किती आहे?
जगातील महानगर व लोकसंख्या सांगा?
जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश कोणता?
जागतिक लोकसंख्या किती आहे व रोज किती बालके या जगात येतात?