लोकसंख्या लोकसंख्याशास्त्र जागतिक लोकसंख्या

जागतिक लोकसंख्या किती आहे व रोज किती बालके या जगात येतात?

3 उत्तरे
3 answers

जागतिक लोकसंख्या किती आहे व रोज किती बालके या जगात येतात?

14
2000 साली पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या 6.1 अब्ज होती पुढील 50 वर्षात ती 9 अब्ज होईल असा अंदाज आहे.
1950 ते 2000 या पन्नास वर्षांत अभूतपूर्व वेगाने लोकसंख्या वाढली. भविष्यकाळात ती कदाचित आणखी अधिक वेगाने वाढेल.

आज जगात 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 411 शहरे आहे.
उत्तर लिहिले · 10/10/2017
कर्म · 77165
3
11जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज झाली होती.

💁‍♂️त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.

💫1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

📍या दिवसाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जाते. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

▪️आशिया (लोकसंख्या: 446.27 कोटी)

▪️आफ्रिका (लोकसंख्या: 121.6 कोटी)

▪️युरोप (लोकसंख्या: 73.8 कोटी)

▪️उत्तर अमेरिका (लोकसंख्या: 57.9 कोटी)

▪️दक्षिण अमेरिका (लोकसंख्या: 42.2 कोटी)

▪️ऑस्ट्रेलिया खंड (लोकसंख्या: 39.9 कोटी)

▪️अंटार्टिका (लोकसंख्या: 1200 केवळ संशोधक)

◾जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.इ
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 569225
0

सध्या जागतिक लोकसंख्या 8 अब्जांपेक्षा जास्त आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 3,85,000 बालके या जगात जन्म घेतात. वर्ल्डोमीटर

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक आहे?
2020 साली भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांची लोकसंख्या जवळपास किती आहे?
जगातील महानगर व लोकसंख्या सांगा?
जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश कोणता?
जागतिक लोकसंख्या दिनांक?