भारताचा इतिहास

भारताचे लोह पुरुष कोणाला म्हणतात?

4 उत्तरे
4 answers

भारताचे लोह पुरुष कोणाला म्हणतात?

6
गौरव'भारताचे लोहपुरूष', 'सरदार'

सरदार वल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०) हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.

उत्तर लिहिले · 30/1/2018
कर्म · 5360
2
सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणतात.
त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. 
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. 
या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.
फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले.
सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.
मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
उत्तर लिहिले · 30/1/2018
कर्म · 16275
0

भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात.

ते एक भारतीय राजकारणी आणि कार्यकर्ते होते. त्यांनी भारताला एक मजबूत आणि अखंड राष्ट्र बनवण्यात मोठे योगदान दिले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Source: Encyclopædia Britannica

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 860

Related Questions

वसाहत वाद म्हणजे काय?
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
पोर्तुगीजांना नाविक परवाना कुणी दिला?
पेट्रोल इंजिनचा शोध कोणी लावला?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण आहेत?
गांधी व जिना यांना किती पत्नी होत्या?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने काय आहेत?