2 उत्तरे
2
answers
काळ्या मातीची माहिती मिळेल का?
4
Answer link
महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची मृदा दख्खनच्या पठारावरील काळी मृदा आहे. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे.
★प्रदेश :
सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओेलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळया मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते. अर्थात रेगूर मृदेचे स्वरुप सर्वत्र सारखे असतेच असे नाही. मृदेच्या थराची जाडी बदलत असते. त्याप्रमाणे रंगही गडद काळया रंगाचा असून फिकट होत असतो.
महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यात आढळते. त्याचप्रमाणे त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यात देखील काळी मृदा आहे. तिला कापसाची मृदा असेही संबोधले जाते. जवळपासच्या उंचवटयाच्या प्रदेशातही अशा प्रकारची मृदा आढळते. परंतु त्या ठिकाणी मृदेचा थर कमी कमी होत जातो आणि तिचा रंग फिकट होत जातो. हळूहळू मृदेची सुपीकता कमी होते आणि जास्त उंचीवर तिचे रुपांतर तांबडया मृदेत होऊ लागते. काळया मृदेचे प्रामुख्याने दोन उपप्रकार पडतात. : (अ) मैदानावरील मध्यम काळी मृदा व दरीमधील खोल काळी मृदा.
■निमिर्ती
दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकांमध्ये ॲल्यूमिनिअम आणि फेरोमॅगेनीजचे प्रमाण जास्त असते. अशा खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. वाषिर्क पाऊस 50 ते 75 सें. मी. दरम्यान असणाऱ्या आणि पर्जन्याचे 30 ते 50 दिवस असणाऱ्या प्रदेशात काळी मृदा तयार होते. काळी मृदा तयार होण्याचे प्रमुख कारण मृदेमध्ये हयूमसचे भरपूर प्रमाण होय असे सांगितले जात असे परंतु आता काहींच्या मतानुसार टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटचे अल्प प्रमाण, तसेच लोहाचे भरपूर प्रमाण यामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो. पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट देखील निमिर्तीस कारणीभूत आहे.
■रासायनिक पृथक्करण
काळया मृदेची सर्वसाधारण खोली 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण 55 पर्यंत आढळते. मॅग्नेशिअम कार्बेनिट, कॅल्शिअम कार्बेनेट यांचे प्रमाण भरपूर असते.तिच्यात ॲल्युमिनिअम ऑक्साइड देखील मोठया प्रमाणात असते तर फॉस्फरस, नायट्रोजन व सेंदि्रय द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते.
गुणधर्म :
(1) काळया मृदेचे रंगानुसार विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ, गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा, उथळ काळी मृदा वगैरे. (2) नद्यांच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात असते, परंतु पठारी भागात मात्र सुपीकता कमी कमी होत जाते. पठारावरील मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. (3) काळया मृदेचे वैशिष्टय म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते.
(4) मृदू कण आणि रासायनिक द्रव्यांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकता कमी होत नाही.
(5) उन्हाळयात कोरडया हवेत काळी मृदा भुसभुशीत होते. तसेच मृदेच्या वरच्या थरास कडक उन्हामुळे मोठया भेगा पडतात. (6) अशा भेगांमध्ये मृदेचे सुटे कण जातात, तसेच हवा देखील राहते.
(7) मान्सूनच्या पाऊस सुरु झाल्यावर या मृदेवरील भेगा नाहीशा होतात व ही सुपीक मृदा पिकांस अत्यंत अनुकूल असते. (8) कापसाच्या काळया मृदेचा एक महत्वाचा दोष म्हणजे मृदेमध्ये वाजवीपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा अतिरिक्त जलस्ंाचिन झाल्यास जमिनीत पाणी साचून ती दलदलयुक्त होते.
महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम भागात कालव्याच्या साहाय्याने जलस्ंाचिनाची सोय असणाऱ्या पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर जिल्हयात मृदेमधील क्षार वरच्या थरात केशाकर्षण मुळे वर आलेले आहेत. एकदा का मृदेमध्ये असे क्षार वर जमा होऊ लागले की तिची सुपीकता झापाटयाने कमी होते व ती हळूहळू परंतु कायम स्वरुपात नापीक बनू लागते. अशी ही क्षारयुक्त मृदा पुन्हा कोणत्याही उपायाने पिकाखाली आणता येत नाही, याचा वाईट अनुभव वर उल्लेखिलेल्या प्रदेशात काही ठिकाणी आला आहे. अशा जमिनीला ाोपण असेही म्हणतात. उत्तर महाराष्ट्रात पूर्णा नदीच्या खोऱ्यात देखील भूमिगत पाण्याची उथळ पातळी आणि पाण्याचा निकृष्ट प्रतीचा निचरा यामुळे अशा तऱ्हेची चोपण जमीन तयार झालेली आहे.

0
Answer link
काळ्या मातीची माहिती:
काळी माती, ज्याला रेगुर मृदा (Regur soil) देखील म्हणतात, ही भारतातील एक प्रमुख प्रकारची माती आहे. ही माती कापूस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे तिला 'कापूस माती' म्हणूनही ओळखले जाते.
निर्मिती:- काळी माती बेसाल्ट खडकांच्या विघटनातून तयार होते.
- दख्खनच्या पठारावर (Deccan Plateau) ही माती मोठ्या प्रमाणावर आढळते.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काळी माती आढळते.
- रंग: या मातीचा रंग काळा असतो.
- पोत: ही माती चिकणमाती प्रकारची असून तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते.
- खनिजे: काळ्या मातीत लोह, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम भरपूर प्रमाणात असतात.
- ओलावा: या मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे, सिंचनाची गरज कमी असते.
- कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी, आणि तंबाखू यांसारख्या पिकांसाठी ही माती उत्तम आहे.
- पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे, जास्त पावसाच्या प्रदेशात या मातीमध्ये पाणी साचून राहण्याची समस्या उद्भवू शकते.
तुम्हाला या मातीबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास, कृपया तपशील सांगा.