2 उत्तरे
2
answers
ऊस लागवडीसाठी सद्यस्थितीत उत्तम वाण कोणते?
8
Answer link
उसाच्या सुधारीत जाती :
१) को - ७४० : तिन्ही हंगामात लागवडीस योग्य जात असून भरपूर फुटवे, साखरेचे प्रमाण मध्यम, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम आहे. खोडव्यास उत्तम, ऊस लोळला तरी मोडत नाही, हा ऊस उशिरा पक्क होत असून सरासरी हेक्टरी १२५ टन उत्पादन मिळते.
२) को - ७२१९ (संजिवनी) : ही जात सुरू व पुर्व या दोन्हीही हंगामात लागवडीस योग्य. याचा ऊस लोळतो पण मोडत नाही. पाण्याच्या ताणास संवेदनशील असून गाळपास लवकर येते. या वाणाचे सरासरी हेक्टरी १३० टन उत्पादन मिळते.
३) को. एम. - ७१२५ (संपदा) : ही जात सुरू हंगामात लागवडीस योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी, सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य (संपदा) गुळासाठी चांगली व खोडव्यासाठी उत्तम आहे. मध्यम उशीरा तयार होणारी असून हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.
४) को - ७५२७ : ही जात सुरू, हंगामासाठी योग्य असून, पक्कता दीर्घकाळ टिकते.पाण्याच्या ताणास काही प्रमाणात प्रतिकारक्षम असून पक्कता मध्यम कालावधीत होते. हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.
५) को.एम.- ८८१२१: ही जात तिन्ही हंगामात लावण्यास योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी तसेच खोडव्यासाठी चांगली आहे. मध्यम, उशीरा काळावधीत पक्क होत असून हेक्टरी सरासरी १५५ टन उत्पादन मिळते.
६) को - ८०१४ : ही जात सुरू व पूर्व हंगामात लावता येते. खोडव्यासाठी चांगली असून सातारा, सांगली व कोल्हापूरसाठी शिफारस केली जाते. लवकर पक्क होणारी जात असून हेक्टरी सरासरी १३५ टन उत्पादन मिळते.
७) को - ८६०३२ : ही जात तिन्ही हंगामात लागवडीस योग्या जात असून ऊस लोळत नाही, गुळासाठी चांगली, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम असून लवकर पक्क होते. हेक्टरी सरासरी १४० टन उत्पादन मिळते.
८) VSI - ४३४ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. काणी, गवताळ रोगास प्रतिकारक असून साखरेचे प्रमाण अधिक आहे. मध्यम काळावधीत पक्क होते असून हेक्टरी १५५ ते १६० टन उत्पादन मिळते.
९) फुले सावित्री - ९४०१२ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. खोडकिड, शेंडे मर, काणी, तांबेरा रोगास बळी पडत नसून साखरेचा उतारा जास्त आहे. लवकर पक्क होते असून हेक्टरी १३५ ते १४० टन उत्पादन मिळते.
१०) २६५ : ही जात ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून विकसित केली असोन ऊस हिरवट रंगाचा जाड, उंच होतो. क्षारयुक्त जमिनीतही लागवड यशस्वी होते . पाण्याचा तन सहन करते. १७ -१८ महिने शेतात राहिला तरी दाशी पडत नाही. खोडवा चांगला येतो. फुटवे अधिक फुटतात. तिन्ही हंगामात लागवडीस योग्य असून आडसाली लागणीचा ऊस ३ ते ३।। किलो, पुर्व हंगामी २ ते २।। किलो तर सुरूचा २ किलो वजनाचा ऊस होतो. उत्पादन ८६०३२ पेक्षा २० - २५% जादा मिळते. रिकव्हरी (साखरेचा उतार) मात्र थोड कमी आहे.
पाणी व्यवस्थापन : ऊस बारमाही पीक असल्याने वर्षभर पाणीपुरवठा असणे जरूरीचे आहे. पिकाची वाढ व गरज लक्षात घेऊन पाणी दिले तर उसाच्या पिकाला बारा महिन्यांसाठी पावसासह प्रत्यक्ष शेतात एकूण २५० हेक्टर सें. मी. पाणी पुरेसे होते.
पीक संरक्षण : उसावर विविध रोग आणि किडी येतात. अधिक उत्पादनासाठी त्यांचा वेळेवर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

0
Answer link
ऊस लागवडीसाठी सद्यस्थितीत उत्तम वाण खालीलप्रमाणे:
ऊस लागवडीसाठी अनेक उत्तम वाण उपलब्ध आहेत, जे विविध क्षेत्रांमध्ये चांगले उत्पादन देतात. त्यांची निवड करताना तुमच्या क्षेत्रातील हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मातीचा प्रकार विचारात घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या काही लोकप्रिय आणि उत्तम वाणांची माहिती खालीलप्रमाणे:
- Co 86032: हा वाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तो लवकर परिपक्व होतो आणि उच्च साखर उत्पादन देतो.स्रोत
- CoM 0265: हा वाण मध्यम कालावधीत तयार होतो आणि पाण्याची कमतरता असलेल्या भागासाठी उपयुक्त आहे.स्रोत
- Co 92005: हा वाण देखील चांगला असून भरपूर उत्पादन देतो.
- CoC 671: ऊसाचा हा वाण देशात मोठ्या प्रमाणात लागवड केला जातो. याची वाढ लवकर होते आणि साखर जास्त प्रमाणात असते.
इतर वाण:
- Co 8014
- Co 94012
- CoM 7125
ऊस लागवडीसाठी वाणांची निवड करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:
- वाणाचा कालावधी (लवकर, मध्यम, उशिरा)
- पाण्याची उपलब्धता
- मातीचा प्रकार
- रोगांना प्रतिकारशक्ती
- साखरेची पातळी
टीप:
नवीन वाण निवडण्यापूर्वी, तुमच्या क्षेत्रातील कृषी विद्यापीठातील तज्ञांचा सल्ला घ्या.