Topic icon

ऊस

3
FRP, ऊस, साखर, ऊस भाव कारखाने सर्रास शेतकरी वर्गाची लूट करत आहेत, एफआरपी तर सोडाच 1800, 2000, 2100, 2200, 2300, 2400 हाच भाव प्रत्येक उसाला मिळत आहे भले त्याची रिकव्हरी कितीही असो (साधारणतः 9% या रिकव्हरी रेटला कारखान्याने 2850 हा भाव दिला पाहिजे आणि प्रत्येक 1% वाढीला 300 रुपये/टन अधिक, म्हणजे जर रिकव्हरी 10% असेल तर 3150 रुपये/टन या दराने त्यांनी उसाची खरेदी करावी असा नियम आहे पण ते तर रिकव्हरी मध्येही घोटाळा करतात), साखर आयुक्त तर मूग गिळून गप्प बसले आहेत या सर्व गोष्टींवर आपले काय मत आहे?
उत्तर लिहिले · 30/12/2021
कर्म · 75
0

होय, को 86032 ही ऊसाची जात आहे. ही जात 1996 मध्ये विकसित केली गेली आणि ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

को 86032 ऊस जातीची काही वैशिष्ट्ये:

  • उच्च उत्पादन क्षमता
  • साखरेचे प्रमाण चांगले
  • रोगप्रतिकारशक्ती चांगली
  • पाण्याची कमतरता सहन करण्याची क्षमता

तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊन या जातीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता:

  1. ॲग्रोवन (agrowon.com)
  2. कृषी जागरण (krishijagran.com)
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5300
0
मला तुमच्या प्रश्नाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. कारखान्यात उसाचे बिल वाटप खालीलप्रमाणे केले जाते:
  1. उसाचे वजन: सर्वप्रथम, कारखान्यात आणलेल्या उसाचे वजन केले जाते.
  2. उसाची गुणवत्ता: उसाच्या वजनानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते. गुणवत्ता म्हणजे उसातील साखरेचे प्रमाण.
  3. साखरेचा उतारा: साखरेच्या उताऱ्यावरून उसाची किंमत ठरते. साखर उतारा म्हणजे 100 किलो उसापासून किती साखर तयार होते.
  4. राज्य सरकारचे धोरण: राज्य सरकार उसाच्याbase price (FRP) बाबतीत काही धोरणे ठरवते. त्यानुसारfinal bill तयार होते.
  5. कारखान्याची अंतिम किंमत: FRP आणि साखरेच्या उताऱ्यानुसार कारखान्याचे व्यवस्थापन उसाची अंतिम किंमत ठरवते.
  6. बिलाचे वाटप: अंतिम किंमत ठरल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.
२८३, ५०० म्हणजे काय? तुमच्या प्रश्नातील २८३, ५०० चा नेमका अर्थ स्पष्ट होत नाही आहे. ही आकडेवारी उसाचे वजन, साखरेचा उतारा किंवा बिलाची रक्कम असू शकते. अधिक माहिती दिल्यास मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन. तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता:
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5300
5
ऊसाची यशस्वी लागवड

ऊस हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून या पिकामुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. उसाखालील क्षेत्रामध्ये भारत जगाच्या तुलनेत आघाडीवर आहे. ऊस ही भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली एक बहुवार्षिक गवताची जात आहे.

सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण, दवाखाने, प्रशिक्षण कार्यक्रम, पाणीपुरवठा इ. विकासाच्या बाबींमध्ये तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ. पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लीक करा...
http://www.drbawasakartechnology.com/m-SugarCaneLagawad.html#.WqDH2stX7qA
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 458580
8
उसाच्या सुधारीत जाती :

१) को - ७४० : तिन्ही हंगामात लागवडीस योग्य जात असून भरपूर फुटवे, साखरेचे प्रमाण मध्यम, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम आहे. खोडव्यास उत्तम, ऊस लोळला तरी मोडत नाही, हा ऊस उशिरा पक्क होत असून सरासरी हेक्टरी १२५ टन उत्पादन मिळते.

२) को - ७२१९ (संजिवनी) : ही जात सुरू व पुर्व या दोन्हीही हंगामात लागवडीस योग्य. याचा ऊस लोळतो पण मोडत नाही. पाण्याच्या ताणास संवेदनशील असून गाळपास लवकर येते. या वाणाचे सरासरी हेक्टरी १३० टन उत्पादन मिळते.

३) को. एम. - ७१२५ (संपदा) : ही जात सुरू हंगामात लागवडीस योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी, सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य (संपदा) गुळासाठी चांगली व खोडव्यासाठी उत्तम आहे. मध्यम उशीरा तयार होणारी असून हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

४) को - ७५२७ : ही जात सुरू, हंगामासाठी योग्य असून, पक्कता दीर्घकाळ टिकते.पाण्याच्या ताणास काही प्रमाणात प्रतिकारक्षम असून पक्कता मध्यम कालावधीत होते. हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

५) को.एम.- ८८१२१: ही जात तिन्ही हंगामात लावण्यास योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी तसेच खोडव्यासाठी चांगली आहे. मध्यम, उशीरा काळावधीत पक्क होत असून हेक्टरी सरासरी १५५ टन उत्पादन मिळते.

६) को - ८०१४ : ही जात सुरू व पूर्व हंगामात लावता येते. खोडव्यासाठी चांगली असून सातारा, सांगली व कोल्हापूरसाठी शिफारस केली जाते. लवकर पक्क होणारी जात असून हेक्टरी सरासरी १३५ टन उत्पादन मिळते.

७) को - ८६०३२ : ही जात तिन्ही हंगामात लागवडीस योग्या जात असून ऊस लोळत नाही, गुळासाठी चांगली, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम असून लवकर पक्क होते. हेक्टरी सरासरी १४० टन उत्पादन मिळते.

८) VSI - ४३४ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. काणी, गवताळ रोगास प्रतिकारक असून साखरेचे प्रमाण अधिक आहे. मध्यम काळावधीत पक्क होते असून हेक्टरी १५५ ते १६० टन उत्पादन मिळते.

९) फुले सावित्री - ९४०१२ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. खोडकिड, शेंडे मर, काणी, तांबेरा रोगास बळी पडत नसून साखरेचा उतारा जास्त आहे. लवकर पक्क होते असून हेक्टरी १३५ ते १४० टन उत्पादन मिळते.

१०) २६५ : ही जात ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून विकसित केली असोन ऊस हिरवट रंगाचा जाड, उंच होतो. क्षारयुक्त जमिनीतही लागवड यशस्वी होते . पाण्याचा तन सहन करते. १७ -१८ महिने शेतात राहिला तरी दाशी पडत नाही. खोडवा चांगला येतो. फुटवे अधिक फुटतात. तिन्ही हंगामात लागवडीस योग्य असून आडसाली लागणीचा ऊस ३ ते ३।। किलो, पुर्व हंगामी २ ते २।। किलो तर सुरूचा २ किलो वजनाचा ऊस होतो. उत्पादन ८६०३२ पेक्षा २० - २५% जादा मिळते. रिकव्हरी (साखरेचा उतार) मात्र थोड कमी आहे.

पाणी व्यवस्थापन : ऊस बारमाही पीक असल्याने वर्षभर पाणीपुरवठा असणे जरूरीचे आहे. पिकाची वाढ व गरज लक्षात घेऊन पाणी दिले तर उसाच्या पिकाला बारा महिन्यांसाठी पावसासह प्रत्यक्ष शेतात एकूण २५० हेक्टर सें. मी. पाणी पुरेसे होते.

पीक संरक्षण : उसावर विविध रोग आणि किडी येतात. अधिक उत्पादनासाठी त्यांचा वेळेवर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 11/1/2018
कर्म · 458580
0
सर 8632 हा ऊस चांगला येईल असे मला वाटते. तरी पण जवळच्या कृषी दुकानात जाऊन सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 4/1/2018
कर्म · 800
0
ऊसाच्या काही प्रमुख जातींची नावे खालीलप्रमाणे:
  • CoC 671
  • Co 86032
  • CoM 0265
  • CoVSI 9805
  • Co 94012
  • Co 8014
  • Co 7219
  • MS 10001
  • SNK 03107
  • के 86032
  • व्हीएसआय 9805
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे. अधिक माहितीसाठी, कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5300