संशोधन शास्त्रज्ञ शोध इतिहास

चाकाचा शोध कोणी लावला?

3 उत्तरे
3 answers

चाकाचा शोध कोणी लावला?

3
*इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमिया येथे मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे अस्तित्व आढळले आहे. प्राचीन इजिप्तमध्ये इ.स. पूर्व २००० वर्षं चाकांचे रथ वापरले गेले असावेत असे मानले जाते.

*भारत
प्राचीन भारतीय रथ बनवत असत. युद्धात रथांचा वापर होत असे. रथकार हे ऋभू होते असं म्हटलं जातं. ऋभूंनी एक रथ बनवून तो अश्विनींना दिला असं वर्णन ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृति कोशात चाकाचे भाग पुढील प्रमाणे नोंदलेले आहेत - पत्री (धातूची धाव), प्रधी (घेर), वर्तुळ (मुख्य चाक), अर (आरे), नभ्य (तुंबा) आणि अक्ष (म्हणजे आस).
उत्तर लिहिले · 28/12/2017
कर्म · 4325
1
चाक

चाक हे वर्तुळ आकाराचे असते व स्वतःभोवती फिरणारे असते. याचा शोध मानवी विकासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा एक मूलगामी यांत्रिक शोध आहे. याचे स्वरूप अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारे चक्र असे आहे.



तीनचाकी सायकल चे चाक.

चाकाच्या शोधामुळे मानवाला कमी शक्ती वापरून अधिक कार्य साधणं शक्य झाले.

ओळख

इतिहास

इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमिया येथे मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे अस्तित्व आढळले आहे. प्राचीन इजिप्तमध्ये इ.स. पूर्व २००० वर्षं चाकांचे रथ वापरले गेले असावेत असे मानले जाते.

भारत

प्राचीन भारतीय रथ बनवत असत. युद्धात रथांचा वापर होत असे. रथकार हे ऋभू होते असं म्हटलं जातं. ऋभूंनी एक रथ बनवून तो अश्विनींना दिला असं वर्णन ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृति कोशात चाकाचे भाग पुढील प्रमाणे नोंदलेले आहेत - पत्री (धातूची धाव), प्रधी (घेर), वर्तुळ (मुख्य चाक), अर (आरे), नभ्य (तुंबा) आणि अक्ष (म्हणजे 

उत्तर लिहिले · 10/2/2018
कर्म · 11275
0

चाकाचा शोध कोणी लावला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण चाकाचा शोध एका विशिष्ट व्यक्तीने लावला नाही. चाकाचा शोध अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर लागला. मानवी संस्कृतीच्या इतिहासात चाकाचा शोध हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

इतिहासकारांच्या मते, चाकाचा उपयोग सर्वप्रथम मेसोपोटेमियामध्ये (आजचा इराक) सुमारे 3500 BC मध्ये झाला. सुरुवातीला चाकाचा उपयोग मातीची भांडी बनवण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर, 3200 BC मध्ये चाकाचा उपयोग गाड्यांसाठी करण्यात आला.

भारतात चाकाचा वापर कधी सुरू झाला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये चाकाचा वापर झाल्याचे पुरावे आहेत.

चाकाचा शोध हा मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा शोध आहे, ज्याने जगाला बदलून टाकले.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5400

Related Questions

थॉमस एडिसन यांनी लावलेले शोध?
क्रांतीचा शोध कोणी लावला?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता?
जोशेप स्वान कोण होते?
सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी कोण?