3 उत्तरे
3
answers
T V चा शोध कोणी लावला ?
6
Answer link
जॉन लोगी बेअर्ड (इंग्लिश: John Logie Baird) (ऑगस्ट १३, १८८८ - जून १४, १९४६) याने दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) संचाचा शोध लावला.
बेअर्ड यांचा जन्म हेलिंझबर (स्कॉटलंड) येथे झाला. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफिल्ड ॲकॅडेमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या पदवी मिळविण्यामध्ये व्यत्यय आला. तथापि लष्करी नोकरीकरिता ते अक्षम ठरल्याने लवकरच त्यांनी एका विद्युत् शक्ती उत्पादक कंपनीत व्यवस्थापक अभियंता म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. युद्धानंतर त्यांनी विविध व्यवसाय केले; पण आजारपणामुळे ते सर्व सोडून १९२२ नंतर त्यांनी दूरचित्रवाणीवर संशोधन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. प्रथमतः १८२४ मध्ये बाह्यरेखांच्या रुपातील वस्तूंचे व १९२५ मध्ये ओळखता येतील अशा मानवी चेहेऱ्यांचे प्रेषण करण्यात त्यांनी यश मिळविले. २७ जानेवारी १९२६ रोजी त्यांनी रॉयल इन्स्टिटयूशनमध्ये बोलत असलेल्या व धूम्रपान करीत असलेल्या मानवी चेहेऱ्याची प्रतिमा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत प्रेषित करण्याचे प्रात्यक्षिक शास्त्रज्ञांच्या समोर करुन दाखविले. याकरिता त्यांनी प्रकाशविद्युत् घट [⟶ प्रकाशविद्युत्], निऑन दिवा आणि चित्राच्या क्रमवीक्षणासाठी ३० छिद्रे असलेली व सेकंदाला साडे बारा फेरे करणारी निपको तबकडी [⟶ दूरचित्रवाणी] वापरली. अशा प्रकारे त्यांनी दूरचित्रप्रेषणाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. प्रकाशविद्युत् घटावर अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरणांचा परिणाम होत असल्याचे बेअर्ड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अंधारात दिसण्यास मदत करणाऱ्या ‘नॉक्टोव्हायझर’ या उपकरणाचा शोध लावला. रात्री वा धुक्यात नौकानयनासाठी व मोटार चालकांना उपयुक्त असणाऱ्या या उपकरणाचे १९२६ मध्ये त्यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. पुढे रडार या अधिक प्रभावी साधनाचा शोध लागल्यावर हे उपकरण मागे पडले.
बेअर्ड यांनी स्वतःचे दूरचित्रप्रेषण स्थानक कूलसन (केंट) येथे स्थापन केले. फेब्रुवारी १९२८ मध्ये या स्थानकातून त्यांनी अटलांटिक महासागरापार अमेरिकेत हार्ट्सडाल (न्यूयॉर्क राज्य) येथे चित्रप्रेषण केले व तेथे त्यांचे यशस्वी रीत्या ग्रहण होऊन चित्र स्पष्टपणे दिसले. याकरिता भूमार्गे ४८ किमी. दूर असलेल्या एका रेडिओ प्रेषकाला व तेथून अटलांटिकवरून ४५ मी. तरंगलांबीवर रेडिओव्दारे प्रेषण करण्यात आले. १९२९ मध्ये जर्मन टपाल खात्याने बेअर्ड यांना त्यांच्या पद्धतीवर आधारलेली दूरचित्रप्रेषण सेवा विकसित करण्यासाठी सवलती दिल्या आणि दोन महिन्यांनंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बी.बी.सी.ने) त्यांना आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यासाठी संस्थेचा प्रेषक वापरण्यास परवानगी दिली. ३० नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांनी बी.बी.सी. मार्फत अर्धा तास दूरचित्रप्रेषण कार्यक्रम दाखविला. १९३० मध्ये चित्रप्रेषणाला ध्वनिप्रेषणाची जोड देण्यात आली. १९३६ साली बी.बी.सी ही पूर्ण वेळ दूरचित्रवाणी सेवा चालू करणारी जगातील पहिली संस्था ठरली. त्या वेळी बेअर्ड यांच्या चित्रप्रेषण पद्धतीबरोबर मार्कोनी इलेक्ट्रिकल अँड म्यूझिकल इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीने विकसित केलेल्या पद्धतीची स्पर्धा चालू होती. काही महिने दोन्ही पद्धती बरोबरीने वापरण्यात आल्या; पण फेब्रुवारी १९३७ मध्ये बी.बी.सी. ने मार्कोनी पद्धतीचाच पूर्णतः स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. बेअर्ड यांनी प्रकाशीय यांत्रिक पद्धतीने चित्रचौकटीचे (३० रेषांपासून २४० रेषांपर्यंत) क्रमवीक्षण करण्यापर्यंत मजल गाठली होती (मार्कोनी इलेक्ट्रॉन शलाका पद्धतीत ही संख्या ४०५ होती.) तथापि इलेक्ट्रॉनिकी विषयाची फारशी माहिती नसल्याने त्यांना आपली पद्धती पुढे विकसित करता आली नाही. १९३९ मध्ये त्यांनी नैसर्गिक रंगातील दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक दाखविले. मोठ्या पडद्यावर चित्र दाखविण्याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले होते. १९४१ पासून केबल अँड वारलेस लि. या कंपनीत त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले व तेथे ⇨ अनुचित्र-प्रेषणासाठी दूरचित्रप्रेषण पद्धती वापरण्याबाबत संशोधन केले. त्यांनी १९४६ मध्ये त्रिमितीय दूरचित्रवाणीसंबंधीचे संशोधन पूर्ण केले होते. ते इंग्लंडमधील बेक्सहिल (ससेक्स) येथे मृत्यू पावले.

2
Answer link
टी.व्ही.चा खरा जन्मदाता कोण बरे ?
फिलो टी. फार्न्सवर्थ – टी.व्ही. चा जनक : त्याच्या अमेरिकेतील पुतळ्यावर कोरलेले अवतरण.
व्लादिमिर के. झोरीकीन – आधुनिक टी.व्ही.चा पिता : इति न्यू एन सायक्लोपिडीया ब्रिटानिका.
जॉन लोगी बायार्ड : इति रोनाल्ड टिल्टमन, टी.व्ही. विषयक इतिहासकार.
यशाचे अनेक जनक असतात. : इति जॉन एफ. केनेडी
– भाग १ –
वाचकहो, एखादे दिवशी तुमच्या मित्रमंडळीमध्ये भरपूर वेळ आहे आणि लांबलचक वाद घालायची खरोखर खुमखुमी आली असेल, तर दूरचित्रवाणीचा शोध कुणी लावला, त्याचा खरा जनक कोण, या प्रश्नाने वादाची सुरुवात करा. समजा, आपल्याला एक उत्तर मिळाले, की अमक्या अमेरिकनाने हा शोध लावला. तर ताबडतोब जवळचाच दुसरा जाणकार वादक ( वाद घालणारा तुमच्यासारखा दुसरा) उठेल आणि म्हणेल, नाही, हो, तो अमका तमका ब्रिटीश होता. तेवढ्यात तिसरा वादक दाखवून देईल, की टी.व्ही.चे पहिले पेटंट एका जर्मन शोधकाला मिळाले होते.
थोडक्यात, दूरचित्रवाणीच्या शोधाचे श्रेय एखाद्या व्यक्तीला देणे खरोखर कठीण आहे, कारण दूरचित्रवाणी संचाचा विकास गेले शंभराहून अधिक वर्षे चालला आहे, हे सांगितले तर नवल वाटू नये. आजही आपण जो दूरचित्रवाणीसंच पाहात आहोत, त्याचा आकार आणि चेहरामोहरा सारखा बदलतोय.
जे जे शोधक १८८० च्या सुमारास या यंत्राची सुधारित आवृत्ती बनवण्यात यशस्वी झाले, त्यांना किंचित संवेदनाक्षम अशा फोटोसेलचा उपयोग करून कसेबसे ओबडधोबड असे चित्र तारेवरून इकडून तिकडे पाठवता आले होते. वाचकहो, आपण या लेखमालेच्या एका लेखात धर्मगुरूने लंबकाच्या साह्याने बनवलेल्या फॅक्स यंत्राची सत्यकथा वाचल्याचे आठवत असेल. दूरचित्रवाणीचा तो जन्म तर नसेल ? आता काही असा दावा करतील, की फॅक्स यंत्राच्या शोधकांनी नंतर चित्रांची सलग साखळी इकडून तिकडे पाठवण्याच्या कल्पनेचा आणि त्यातून टी. व्ही. प्रतिमा निर्माण करण्याचा पाठपुरावा केला नाही. कारण टी.व्ही. च्या जन्माचे श्रेय हलत्या चित्रांच्या प्रक्षेपणाला दिले जाते, स्थिर चित्रांच्या नव्हे.
टी.व्ही.ची संकल्पना सर्वप्रथम जर्मनीमध्ये डॉ. पॉल नीपकॉव या वय वर्षे चौवीस च्या तरुणाच्या कुशाग्र डोक्यातून निघाली आणि त्याने १८८४ मध्ये टी.व्ही. चे पहिले पेटंट संपादन केले. नीपकॉवने या उपकरणाचे “इलेक्ट्रिक टेलिस्कोप” असे बारसे केले होते. आजच्या टी.व्ही.च्या मानाने त्या उपकरणाला तुम्ही टेलिव्हिजन म्हणायला मुळीच तयार होणार नाहीत.
नीपकॉवच्या शोधामागील किचकट तांत्रिक तपशीलात मी तुम्हाला नेऊ इच्छित नाही. पण एवढेच म्हणेन, की १९१७ मध्ये जेव्हा प्रखर प्रकाशाच्या नीऑन दिव्याचा शोध लागला, तेव्हा कुठे नीपकॉवच्या शोधाला व्यावहारिक परिमाण मिळाले. जणू त्यासाठी अमेरिकन शोधक चार्ल्स फ्रान्सिस जेनकिन्स वाट पाहत बसला होता. मिळालेल्या धाग्यावरून त्याचे प्रयोग सबंध १९२० या वर्षात चालू होते. त्यातून जेनकिन्सचा एक छोटासा यांत्रिक टी.व्ही. तयार झाला. काही छांदीस्ट लोकांनी जेनकिन्सचे हे टी.व्ही.संच विकत घेतले आणि त्यावर छानदार लाकडी कॅबीनेट बनवून घरात टी.व्ही.चा प्रवेश झाला. काळ्या व नारिंगी रंगातील चित्रे प्रक्षेपित करणारी वीस पंचवीस टी. व्ही. केंद्रे अमेरिकेत निघाली.

जॉन लोगी बायार्ड
नीपकॉवच्या शोधाचा असाच फायदा जॉन लोगी बायार्ड (John Logie Baird) या इंग्लंडमधील टी.व्ही. तंत्रद्न्याला झाला. जेनकिन्सप्रमाणे तोदेखील स्वतंत्रपणे संशोधन करत होता. बायार्डचे उपकरणही असेच ओबडधोबड होते. त्यावर दिसणारी चित्रे फारशी स्थिर नसायची, स्क्रीन अंधुक होता आणि प्रेक्षकांचे ( आजच्या भाषेत दर्शकांचे ) चित्रे पाहून डोके दुखू लागायचे. परंतु बायार्ड मागे हटला नाही. त्याने सतत परिश्रम करून आपले उपकरण इतक्या पातळीवर आणले, की लोकांना त्याचा टी.व्ही. विकत घेणे भाग पडले. १९३० मध्ये बायार्डचा टी.व्ही.संच ब्रिटीश जनतेला १३० डॉलर्स या किमतीला उपलब्द्ध होता. रोज सायंकाळी बी.बी.सी. चे रेडियोवरील प्रक्षेपण कधी संपते, याची बायार्ड वाट पाहत असे. मग तो बी.बी.सी. रेडियो संच उसना आणत असे आणि त्यावरून व्हिडीयो सिग्नल पाठवत असे. त्याला मिळालेल्या यशाने इंग्लंडमधील संशोधनाला चालना मिळाली आणि त्यातून १९२७ ते १९३५ या काळात टी.व्ही. प्रक्षेपणाला प्रारंभ झाला.
बायार्ड आणि जगभरातील इतर संशोधकांच्या चालेल्या अथक प्रयत्नातून अनेक बदल घडून आले. रोज कोणी ना कोणी आपली अधिक चांगली कल्पना पुढे आणत राहिला नसता, तर आज आपण पाहतो तो टी.व्ही. दिसलाच नसता.
– भाग २ –
आजच्या आधुनिक इलेक्ट्रोनिक टी.व्ही.चा रचनाकार आहे ब्रिटीश इलेकट्रीकल इंजिनियर ए. कॅंपबेल स्विन्टन. भविष्यात टी.व्ही. कसा असू शकेल याची ब्ल्यू प्रिंट असलेली त्याची संकल्पना १९०८ मध्ये तयार होती आणि ते त्याने आपल्या १९११ मधील एका व्याख्यानात मांडले होते.
येथे पुनः तांत्रिक तपशीलात न जाता, स्विन्टन याने काय केले, ते पाहू . कार्ल एफ. ब्राऊन याने १८९७ मध्ये ज्या कॅथोड किरण ऑसिलोस्कोपचा शोध लावला होता, त्यात स्विन्टनने किंचित सुधारणा केली. त्याने बनवलेल्या टी.व्ही. माहिती व सूचना पत्रकाने (shop manual) ग्राहकांची दाद मिळवली. स्विन्टनचा त्या काळातील टी.व्ही. आजही पाहिला, तर आजच्या आधुनिक टी. व्ही. ची दिशा दाखवणारा आहे, हे तुम्हाला पटेल.
पूर्वीच्या मेकॅनिकल टी.व्ही. ची मोठी समस्या ही होती, की चित्र नीट दिसत नव्हते. यासाठी काही तरी ठोस उपाय करण्याची आवश्यकता होती. चित्र रेखीव व सुस्पष्ट (sharp) दिसण्यासाठी रेषांची संख्या वाढवणे गरजेचे होते. या पूर्वीच्या यांत्रिक टी.व्ही. डिस्कवर सुमारे दोनशे रेषा असायच्या. स्विन्टनने केलेल्या सुधारणेमुळे चित्र खूपच रेखीव आणि स्पष्ट झाले. येथेच यांत्रिक टी.व्ही.ला निरोप द्यावा लागला.

फिलो टी. फार्न्सवर्थ

या सुमारास टी.व्ही.च्या सर्वात लहान वयाच्या शोधकाचे आगमन झाले. फिलो टी. फार्न्सवर्थ (Philo T. Farnsworth) हे त्याचे नाव.विद्युत पत्रिकांचे मनसोक्त वाचन करणा-या या तरुणाने नीपकॉवच्या टी. व्ही. उपकरणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. त्याच्या दृष्टीने नीपकॉवचा टी.व्ही आता मृतावस्थेत होता. १९२२ मध्ये अमेरिकेतील उटाह या प्रांतातील किरकोळ चणीच्या या मुलाने आपल्या शाळाशिक्षकाला आपण खूपच आधुनिक टी.व्ही. बनवू शकेन असे ठामपणे सांगितले. त्याने आपली सारी योजना शाळेतील फळ्यावर उघड करून सांगितली आणि शिक्षकांनी शाबासकी देत त्याला ‘आगे बढो’चा इशारा दिला.
फार्न्सवर्थने जॉर्ज एव्हरसन या एका ओळखीच्या धनवंताकडून मदत घेऊन प्रथम लॉस एंजेलिस आणि नंतर सान फ्रांसिस्को येथे आपल्या कार्यशाळा स्थापन केल्या. त्याच्या या वर्कशॉपच्या खिडक्या सतत बंद असत, आतमध्ये काही संशयास्पद तर चालले नाही ना, म्हणून पोलिसांना संशय येऊन त्यांनी धाड घातली. पण तसे काहीच मिळाले नाही.
त्याच्या या परिश्रमाला १९२७ मध्ये फळ मिळाले. त्याच्या टी.व्ही तील ६० रेषांचे चित्र अत्यंत प्रेक्षणीय ठरले. फार्न्सवर्थने पूर्वी त्रास देत असलेल्या ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या समस्या सोडवण्यात यश संपादन केले. त्याने तत्काळ पेटंटसाठी अर्ज दाखल केला. नवनव्या कल्पनांसाठी जग वाट पाहत असताना फार्न्सवर्थच्या या कामगिरीचे कौतुक झाल्याशिवाय राहिले नाही. त्या काळातील रेडियो कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका (RCA) या बलाढ्य कंपनीच्या डेव्हिड सर्नोफ या मालकाचे फार्न्सवर्थच्या शोधाकडे लक्ष गेले. त्याने फार्न्सवर्थच्या शोधाचा उपयोग करण्याचे ठरवले आणि त्याचे पेटंट खरेदी करण्याची ऑफर पुढे केली.
त्या वेळी आर.सी.ए. कडे, अमेरिकेत १९१९ साली येऊन स्थायिक झालेला एक निष्णात रशियन टेलिव्हिजनवर काम करत होता. व्लादिमिर के. झोरीकीन ( Vladimir K. Zworykin) हे त्या सेंट पीटर्सबर्गच्या इंजिनीअरचे नाव. रशियन वकिलातीत मिळेल ते काम करणारा या रशियन शोधकाने अगोदर यांत्रिक टी.व्ही. वर काम केले होते.

व्लादिमिर के. झोरीकीन
१९२३ मध्ये वेस्टिंगहाउस कंपनीसाठी काम करताना याच इंजिनीअरने एका टेलिव्हिजन कॅमे-साठी पेटंटचा अर्ज केला होता. परंतु पेटंट कार्यालयाने त्याचा अर्ज मंजूर केला नव्हता. ( पुढे पंधरा वर्षांनतर,१९३८ मध्ये त्यावर मंजुरीची मोहर चढली, हा भाग वेगळा.) झोरीकीनने आपले हे काम वेस्टिंगहाउसच्या उच्चांधिका-यांकडे नेले पण त्याचाही काही परिणाम झाला नव्हता. चित्र सुस्पष्ट दिसत नव्हते. प्रतिमा धूसर होत्या. यावर बरेच काही करण्याची गरज होती.
याच क्षणी झोरीकीनच्या मदतीला डेव्हिड सर्नोफ धावून आला. त्याने झोरीकीनला आणखी एक संधी देण्याचे ठरवले. झोरीकीनने आपल्या या कामासाठी एक लक्ष डॉलर्सची गरज असल्याचे सर्नोफला सांगितले. सर्नोफने झोरीकीनची आर.सी.ए. च्या प्रकल्पावर नेमणूक केली.
मध्यंतरी ऑगस्ट १९३० च्या सुमारास, वयाच्या चौवीशीत असलेल्या फार्न्सवर्थला इलेक्ट्रोनिक कॅमेरा ट्यूबचे पेटंट (Dissector) मिळाले होते. या ट्यूबपुढे झोरीकीनची प्रस्तावित कल्पना फिकी पडली. आर.सी.ए. ने ताबडतोब झोरीकीनला त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. झोरीकीनने कॅलिफोर्निया येथे येऊन पाहणी केली आणि या नवीन कल्पनेत काहीच दम नसल्याचे कळवले. तरी सर्नोफला फार्न्सवर्थच्या अधिक चांगल्या शोधाची महती समजल्यावाचून राहिली नाही.
त्याने फार्न्सवर्थला पाचारण केले. तोही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. त्याने आपल्या स्वामित्वधनाच्या मुद्द्यावर सौदा करण्याचे पक्के केले होते. त्याने आर. सी. ए. कडून भरभक्कम रकमेची मागणी केली. पण आर.सी.ए ते मानायला तयार नव्हती. आपल्याला नवल वाटेल पण आर.सी.ए. ने चक्क दहा वर्षे फार्न्सवर्थचा पाठपुरावा केला. आर.सी.ए.ला काहीच हाती लागले नाही. अखेरीस १९३९ मध्ये आर.सी.ए. मागे पडली आणि त्यांना फार्न्सवर्थच्या स्वामित्वधनाची मागणी मान्य करणे भाग पडले.
या चालीवर एकेक अमेरिकन कंपनी यांत्रिक टेलिव्हिजनचा विकास करत राहिली. त्यांना काहीही पर्याय नव्हता. ए. टी. अॅंड टी. (AT & T) कंपनीने न्यू यॉर्क ते वॉशिंगटन या दोनशे मैलांवरची चित्र प्रक्षेपित करण्यात यश मिळवले. जनरल इलेक्ट्रिक कंपनी सुद्धा मागे नव्हती. आर.सी.ए. ने मात्र फार्न्सवर्थ आणि झोरीकीन या दोघांच्या सहयोगाने यांत्रिक आणि इलेक्ट्रोनिक अशा दोन प्रणाली एकत्र करण्याचा एक हायब्रीड प्रयोग करून पाहिला, पण तो फसला.
१९३३ मध्ये झोरीकीन पुनः आर.सी.ए.च्या वरिष्ठांकडे आला आणि आपला इलेक्ट्रोनिक टेलीव्हिजन संच सर्वांच्या समोर दाखवण्याचा इरादा त्याने बोलून दाखवला. त्याने अनेक बाबतीत सुधारणा केल्या होत्या. आर.सी.ए. ने या वेळी नऊ इंचाच्या पिक्चर ट्यूबवर इतर चित्रांसह मिकी माउसच्या प्रतिमेचे प्रक्षेपण केले.
एव्हाना युरोपमध्येही टेलीव्हिजनचे संशोधन जोरात चालू होते. तेथील उत्तमोत्तम प्रयोगशाळांनी आर.सी.ए. चे आव्हान स्वीकारले होते. जर्मनीच्या एका उद्योजकाने १९५३ मध्ये एक नियमित प्रक्षेपण सेवा सुरू केली होती. ब्रिटनच्या इलेक्ट्रिक अॅंड म्युजिकल इंडस्ट्रीजने (EMI), एमीट्रोन नावाचा एक सुधारित टी.व्ही. आणला. त्यात १९३२ मध्ये पेटंट मिळालेली सुधारित कॅमेरा ट्यूब होती. ब्रिटीश सरकारने इ.एम.आय. ला प्रोत्साहन दिले.
तथापि दुस-या महायुद्धाच्या काळात टेलिव्हिजनच्या व्यापारीकरणाला ब-याच प्रमाणात खीळ बसली. मग त्या कालावधीत झोरीकीन व आर.सी.ए. यांनी कॅमेरा ट्यूबच्या सुधारणेला वाव देण्याचे ठरवले. १९४६ सालाच्या अखेरीस दहा इंचाचा टेबल टेलिव्हिजन संच फक्त ३७५ डॉलर्सना मिळू लागला. घरोघर टी.व्ही. संच विकले गेले. जगभरात टी.व्ही. संचांना अभूतपूर्व मागणी आली. विविध टी.व्ही. संचांचे नुसते पेव फुटले. पाश्चिमात्य लोकांना टी.व्ही. ने वेडे करून सोडले. टी.व्ही. पाहात घरातील कोचावर लोळत पडलेल्यांना कोच पोटॅटो (coach potato) ही संज्ञा रूढ झाली.
तरी वादाचा मूळ मुद्दा राहिलाच, टेलिव्हिजनचा खरा जन्मदाता कोण बरे ? तुम्ही जर ब्रिटीश आहात, तर ते श्रेय जॉन बायार्ड याच्याकडे द्याल. कारण त्याने १९२६ मध्ये पहिल्या यांत्रिक टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक सादर केले होते. तुम्ही अमेरिकन माणसाला विचारा, तो झोरीकीनचे नाव घेईल. कारण त्याचे पेटंट १९२३ मधले होते. परंतु तुम्ही जर इतिहासाच्या विद्यार्थ्याला विचारलेत, तर तो फार्न्सवर्थकडे बोट दाखवेल. कारण त्याने इलेक्ट्रोनिक टेलिव्हिजनचे पहिले पेटंट मिळवले होते.
हा टी.व्ही.च्या जनकाचा वाद अखेर १९३२ मध्ये न्यायालयात गेला – फार्न्सवर्थ विरुद्ध झोरीकीन – आणि हा वाद एका न्यायालयातून दुस-या न्यायालयात गाजत राहिला आणि अखेरीस, फार्न्सवर्थ यालाच हा मान मिळाला पाहिजे, अशी नोंद झाली.

0
Answer link
टीव्हीचा शोध जॉन लोगी बेयर्ड यांनी लावला.
जॉन लोगी बेयर्ड हे स्कॉटिश अभियंता, नवसंशोधक आणि उद्योजक होते.
त्यांनी 26 जानेवारी 1926 मध्ये पहिला सार्वजनिक टेलिव्हिजन सादर केला.
त्यामुळे त्यांना 'टेलिव्हिजनचा जनक' मानले जाते.
अधिक माहितीसाठी: