क्रीडा आंतरराष्ट्रीय संबंध सामान्य ज्ञान बुद्धीबळ

बुद्धीबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली?

2 उत्तरे
2 answers

बुद्धीबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली?

8
बुद्धीबळ हा मूळ भारतीय खेळ असून,
प्राचीन काळी तो ‘चतुरंग’ या नावाने
ओळखला जात असे. हा खेळ प्राचीन काळी
भारतातच सुरू झाला, हे आता निर्विवादपणे
सिद्ध झाले आहे. ‘रॉयल एशियाटिक
सोसायटी’चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स,
ऑक्सफर्डचे टॉमस हाइड तसेच मरी, स्टॉन्टन इ.
अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम
भारतातच झाला असल्याचे दाखवून दिले आहे.
सिंहासन बत्तिशी मध्ये व काही पुराणांतही
या खेळाचे उल्लेख सापडतात. इ.स. पाचव्या
शतकापासून या खेळाचे निश्चित उल्लेख
सापडतात. भारतातून हा खेळ इराण,
अरबस्तानमार्गे यूरोपमध्ये तसेच काश्मीरमार्गे
चीनमध्ये जाऊन तेथून कोरिया, जपान इ.
ठिकाणी प्रसृत झाला असावा. रशियात तो
तिबेट, पर्शियामार्गे गेला असण्याचा संभव
आहे. पर्शियन ‘छतरंग’, अरबी ‘शतरंज’, मलायी
‘छतोर’ मंगोल ‘शतर’ चिनी ‘सियांकी; इ. मूळ
संस्कृत चतुरंगाचीच विविध रूपे होत.
भारतात इ.स. पाचव्या व सहाव्या शतकांच्या
सुमारास चतुरंग खेळला जात होता. भारतीय
युद्धातील रथ, हत्ती, घोडे, व पायदळ या
चतुरंग सेनेवरून या खेळाला हे नाव पडले. चतुरंग
केव्हा सुरू झाला असावा, याविषयी अनेक मते
आढळतात.तो इ.स. पू. चार हजार वर्षांपूर्वी
सुरू झाला असावा, असे काही विद्वानांचे
मत आहे. कार्नामक-इ-आर्तखत्री या पेहलवी
भाषेतील ग्रंथात इ.स. ५५० च्या सुमाराला
चतुरंग हा खेळ इराणमध्ये प्रचलित असल्याचा
उल्लेख सापडतो.
हारून-अल्-रशीद बादशहाचा मुलगा मुसासिक
बिल्ला खलीफ याने रचलेला ‘अल्ली शतरंज’
हा डावही प्रसिद्ध आहे. चतुरंग या खेळाचे
शतरंज हे नाव अद्यापही भारताच्या काही
भागांत प्रचलित आहे.
उत्तर लिहिले · 18/12/2017
कर्म · 11700
0

बुद्धीबळ या खेळाची सुरुवात भारतात झाली.

हा खेळ 6 व्या शतकात 'चतुरंग' या नावाने ओळखला जात होता.

कालांतराने हा खेळ जगभर पसरला आणि त्यामध्ये अनेक बदल झाले.

आधुनिक बुद्धीबळाचा खेळ 15 व्या शतकात युरोपमध्ये विकसित झाला.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5280

Related Questions

एन पासंट कोण?
बुद्धीबळ कसा खेळायचा सांगा?
बुद्धीबळातला घोडा कसा चालतो?
तर्कशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?